1. 'फोर्ब्स' या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील 100 सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. 
 2. ' 100 ग्रेटेस्ट लिव्हिंग बिझनेस माईंडस' 100 Greatest Living Business Minds या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
 3.  लक्ष्मी मित्तल,  रतन टाटा आणि  विनोद खोसला अशी या तीन व्यावसायिकांची नावे आहेत. हे तीनही व्यवसायिक फोर्ब्सच्या यादीनुसार लिविंग लिजेंड्स आहेत. 
 4. तसेच यापैकी लक्ष्मी मित्तल हे ' आर्सेलो मित्तल'चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्षआहेत. तर विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टमचे सह-संस्थापक आहेत.
 5. विशेष म्हणजे या यादीत अमेरिकेचे विद्यमान  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे.


 1. 'बाबूजी धीरे चलना'सारख्या गाण्याला पडद्यावर अजरामर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला (वय 82 वर्ष) यांचे मुंबईत निधन झाले.
 2. पन्नास व साठच्या दशकात निरागस चेहर्‍यांची अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. गुरुदत्त यांच्या 'आर-पार', ' सीआयडी' या गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केले होते. 
 3. शम्मी कपूर यांच्यासोबत त्यांनी ' चायना टाऊन' चित्रपटात काम केले होते. आपल्या चौदा वर्षांच्या कारकिर्दीत शकिला यांनी जवळपास  50 चित्रपटांमध्ये काम केले. 
 4. तसेच लग्नानंतर त्या  इंग्लडमध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांना  मिनाज नावाची मुलगी होती. मात्र, 1991 साली मुलीचे निधन झाल्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या.


 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुनर्रचित ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाला मंजुरी दिली. वर्ष 2017-18 ते वर्ष 2019-20 या कालावधीसाठी 1756 कोटी रुपये खर्चाच्या या कार्यक्रमामधून व्यक्तिमत्व विकास,  सामाजिक विकास,  आर्थिक विकास आणि  राष्ट्रीय विकासासाठी एक साधन म्हणून खेळाला मुख्य प्रवाहात आणणे हा यामागे उद्देश आहे
 2. या कार्यक्रमामुळे पायाभूत सुविधा, सामाजिक क्रीडा, गुणवत्ता शोध, प्रशिक्षण स्पर्धा, क्रीडा अर्थव्यवस्था यासह संपूर्ण क्रीडा व्यवस्थेवर परिणाम होईल. अभूतपूर्व अखिल भारतीय क्रीडा शिष्यवृत्ती योजना यामध्ये दरवर्षी निवडक क्रीडा प्रकारातील  1000 प्रतिभावान युवा खेळाडूंना सामावून घेतले जाईल.
 3. योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या प्रत्येक खेळाडूला सलग  8 वर्षे वार्षिक 5 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल. क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या 20 विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणे.
 4. मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यसंबंधी कार्यक्रमामधून  10-18 वर्षे वयोगटातील 200 दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले जाईल.
 5. खेळांच्या संवर्धनासाठी खेळांविषयी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर, प्रतिभावंत खेळाडूंच्या शोधासाठी राष्‍ट्रीय क्रीडा प्रतिभा  शोध सं केतस्थळ,  देशी खेळांकरिता संकेतस्थळ क्रीडाविषयक पायाभूत सुविधांसाठी GIS आधारित माहिती प्रणाली अश्या विविध बाबींचा या कार्यक्रमात समावेश आहे.
 6. या कार्यक्रमामधून खाली दिलेले  उद्देश साध्य करण्यास प्रयत्न केले जातील -
  1. निरोगी जीवनशैलीसह सक्रीय जनसमूह निर्माण करणे.
  2. लिंग समानता आणि सामाजिक सर्वसमावेशकता राखण्यास प्रोत्साहन देणे.
  3. वंचित समाजातील तरुणांना क्रीडा प्रकारात सामावून घेणे.
  4. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धेचा दर्जा उंचावून संघटीत क्रीडा स्पर्धांसाठी त्यांना तयार करणे.
 7. स्पर्धात्मक खेळ सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रतिभावान खेळाडूला यामुळे  दीर्घकालीन विकास मार्ग उपलब्ध होईल आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम खेळाडू निर्माण होतील.
 8.  प्रि  2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती. सुरुवातीच्या काळात या योजनेत मैदानी खेळ, वॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, जूडो, हॉकी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि कुस्ती या खेळांचा समावेश करण्यात आला होता.


 1. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत 7 नोव्हेंबर 2016 ला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) च्या पुनर्रचनेविषयी चर्चा करण्यात आली होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर UNSC च्या सदस्यांनी परिषदेच्या पुनर्रचनेसंबंधी विषयावर चर्चा करण्यासंबंधी ठरावाला मंजूरी दिली.
 2. UNSC मधील पुनर्रचना म्हणजे यात  पाच महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे –
  1. सदस्यांची श्रेणी
  2. पाच स्थायी सदस्यांना दिला गेलेला विटो अधिकार
  3. प्रादेशिक प्रतिनिधीत्व
  4. UNSC चा विस्तारीत आकार आणि त्याची कार्यपद्धती
  5. सुरक्षा परिषद महासभा संबंध
 3. UNSC मधील कोणत्याही सुधारणेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे किमान  दोन तृतीयांश (म्हणजेच 128) सदस्य आणि विटो अधिकार प्राप्त UNSC चे स्थायी सदस्य यांच्या सहमतीची आवश्यकता असते. 
 4. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच UNGA च्या विभिन्न सदस्य राष्ट्रांनी परिषदेची पुनर्रचना करण्यासंबंधी प्रस्तावासाठी लिखित शिफारसी दिलेल्या आहेत. या सुधारणा व्हाव्या यासाठी प्रामुख्याने भारताचा मोठा सहभाग दिसून आलेला आहे. भारताने विविध देशांसह  चर्चा चालवून परिषदेची पुनर्रचना व्हावी यासंबंधी प्रस्तावासाठी लिखित शिफारसी करण्यास प्रोत्साहन दिले आणि स्थायी सदस्यत्वासाठी लागणार्‍या आपल्या मताला पाठिंबा देखील मिळवलेले आहे. आतापर्यंत   200 सदस्यांनी सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्यास आणि विस्तार करण्याची सूचना केलेली आहे. अखेरचा निर्णय UNSC च्या सदस्यांचा असेल.


Top