Prashant Kumar, the CFO of SBI,

 1. प्रशांत कुमार यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या (एसबीआय) मुख्य वित्तीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
 2. या पूर्वी त्यांनी बँकेच्या मानव संसाधन विभाग आणि गुंतवणूक विभागात महत्त्वाच्या पदावर काम पाहिले आहे.
 3. दिल्ली विद्यापीठात विज्ञान शाखेतून पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतलेले कुमार १९८३ मध्ये बँकेत प्रमाणिकृत अधिकारी (पीओ) म्हणून रूजू झाले. त्यापासून त्यांच्या कार्यकाळाचा आलेख हा चढताच आहे.
 4. मानव संसाधन विभागात उप व्यवस्थापकीय संचालक म्हणून एसबीआयच्या २ लाख ७० हजार कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण यंत्रणेची जबाबदारी त्यांच्यावर होती.
 5. कुमार यांनी यापूर्वी एचआर विभागासह, कोलकत्ता येथे सर व्यवस्थापक आणि मुंबई विभागाचे मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे.
 6. कुमार यांच्या नियुक्तीनंतर शेअर बाजारात एसबीआयचा शेअर १.५९ टक्क्यांनी वधारला.
 7. शुक्रवारी २८४.४५ रुपयांवर बंद झालेल्या शेअरच्या किमतीत ४.५५ रुपयांची वाढ झाली.
 8. सोमवारी शेअर २९० रुपयांवर बंद झाला. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयकडे २७.४७ लाख ठेवी आहेत.
 9. बँकेकडे सामान्य कर्ज आणि वाहन कर्जाचा अनुक्रमे ३२ टक्के आणि ३५ टक्के हिस्सा आहे.
 10. एसबीआयच्या सुमारे २२ हजार पाचशे शाखा आहेत. दिवसाला सुमारे २७ हजार नवे ग्राहक एसबीआयशी जोडत असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


Sarpanch, G. Pt Members will soon be honored

 1. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर आता शासनाने सरपंचांचे मानधन आणि सदस्यांचा बैठक भत्ता वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
 2. ग्रामविकास विभागाने १८ सप्टेंबर २०१८ रोजी परिपत्रक काढून एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ या सहा महिन्यांसाठी वाढीव रकमेनुसार सरपंचांचे मानधन आणि सदस्यांचा भत्ता किती होतो याची आकडेवारी मागविली आहे.
 3. सध्या २००० लोकसंख्येच्या गावच्या सरपंचांना ४०० रुपये, ८००० लोकसंख्येच्या गावांच्या सरपंचांना ६०० आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावच्या सरपंचांना ८०० रुपये मासिक मानधन दिले जाते.
 4. आता सदस्यांना प्रतिबैठक भत्ता २५ रुपयांवरुन २०० रुपये होईल.
 5. सुधारित मानधन:-
लोकसंख्या टप्पा मानधन
० ते २००० १०००/-
२००१ ते ८००० १५००/-
८००१ पेक्षा जास्त २०००/-
ग्रामपंचायती २७९३२
सरपंचांची संख्या २७९३२
सदस्य संख्या २.३२ लाख

​​​​​


WHO's '2018 Global Tuberculosis Report'

 1. जागतिक आरोग्य संघटना (WHO) याचा ‘2018 वैश्विक क्षयरोग अहवाल’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. त्यानुसार 2017 साली क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये घट झाली, परंतु 2030 सालापर्यंत ‘एंड TB’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अजूनही प्रयत्न कमी पडत आहेत.
 3. अहवालानुसार, 2000 सालापासून जागतिक पातळीवर 54 दशलक्ष मृत्यू टाळता आले, तरीही क्षयरोग हा जगातला सर्वात घातक संक्रामक आजार आहे.
 4. 2017 साली या रोगामुळे 1.6 दशलक्ष मृत्यू (300 000 HIV पॉझिटिव्ह लोकांसह) झाले.
 5. 2000 सालापासून HIV+ लोकांमध्ये मृत्यूच्या प्रमाणात 44% घट तर HIV- लोकांच्या बाबतीत 29% घट झाल्याचे आढळून आले आहे.
 6. 2017 साली जगभरात अंदाजे 10 दशलक्ष लोकांमध्ये क्षयरोग विकसित झाला.


Kohli gives Khel Ratna award

 1. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला यंदाचा क्रीडा क्षेत्रातील मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
 2. २५ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. विराट कोहलीसोबत महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूचीही यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
 3. मात्र शून्य गुण मिळवूनही विराटला खेलरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे काही जणांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.
 4.  मिळालेल्या माहितीनुसार खेलरत्न पुरस्कारांची नाव अंतिम करणाऱ्या ११ जणांच्या समितीसाठी काही निकष आखून दिलेले असतात.  
 5. यामध्ये खेळाडूने केलेल्या कामगिरीच सुवर्ण, रौप्य आणि कांस्य या ३ गटांमध्ये मुल्यांकन केलं जातं. मात्र समितीला आखून देण्यात आलेले निकष हे फक्त ऑलिम्पीक खेळांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेले आहेत.
 6. क्रिकेट हा खेळ लोकप्रिय असला तरीही तो ऑलिम्पिकमध्ये खेळला जात नाही, याच कारणासाठी विराटला समितीने शून्य गुण दिले होते.
 7. नेमके हे निकष कसे असतात, हे जाणून घ्या…
क्रिडा प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक ८० गुण ७० गुण ५५ गुण
विश्व अजिंक्यपद/विश्वचषक ४० गुण ३० गुण २० गुण
आशियाई खेळ ३० गुण २५ गुण २० गुण
राष्ट्रकुल खेळ २५ गुण २० गुण १५ गुण
 1. निवड समितीमधील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात यावी की नाही यावर मोठी चर्चा रंगली.
 2. खेलरत्नसाठीच्या निकषांमध्ये विराट बसत नसतानाही बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवलं होतं.
 3. मात्र गेल्या एक वर्षात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीला पाहून समितीने बहुमताने विराटची निवड केली आहे.
 4. ११ सदस्यांपैकी ८ सदस्यांनी विराटला खेलरत्न पुरस्कार दिला जावा याला आपला हिरवा कंदील दाखवला आहे.


Announcement of National Sports Awards-2018

 1. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जात आहेत. यावर्षीच्या विविध क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.
 2. पुरस्कार पुढील प्रमाणे:-
 3. राजीव गांधी खेलरत्न-2018:-
  1. एस. मीराबाई चानू- भारोत्तोलन
  2. विराट कोहली- क्रिकेट
 4. द्रोणाचार्य पुरस्कार– 2018:-
  1. सुभेदार चेनंदा अच्चय्या कुटप्पा– मुष्टियुद्ध
  2. विजय शर्मा– भारोत्तोलन
  3. ए. श्रीनिवास राव- टेबल टेनिस
  4. सुखदेव सिंग पन्नू- धावपटू
  5. क्लॅरेन्स लोगो- हॉकी (जीवनगौरव)
  6. तारक सिन्हा- क्रिकेट (जीवनगौरव)
  7. जीवन कुमार शर्मा- ज्युडो ( जीवनगौरव)
  8. व्ही.आर.बीडू- धावपटू (जीवनगौरव)
 5.  अर्जुन पुरस्कार- 2018-
  1. नीरज चोप्रा-धावपटू
  2. नायब सुभेदार जीनसन जॉनसन-धावपटू
  3. हीमा दास- धावपटू
  4. नेलाकुरथी सिक्की रेड्डी- बॅडमिंटन
  5. सुभेदार सतीश कुमार- मुष्टियुद्ध
  6. स्मृती मानधना- क्रिकेट
  7. शुभंकर शर्मा- गोल्फ
  8. मनप्रित सिंग-हॉकी
  9. सविता-हॉकी
  10. कर्नल रवी राठोड- पोलो
  11. राही सरनोबत- नेमबाजी
  12. अंकुर मित्तल- नेमबाजी
  13. श्रेयसी सिंग- नेमबाजी
  14. मनिका बत्रा- टेबल टेनिस
  15. जी. साथियन- टेबल टेनिस
  16. रोहन बोपन्ना- टेनिस
  17. सुमित- कुस्तीपुजा कडियन- वुशू
  18. अंकूर धामा- पॅरा ॲथलिटिक्स
  19. मनोज सरकार- पॅरा बॅडमिंटन
 6. ध्यानचंद पुरस्कार- 2018-
  1. सत्यदेव प्रसाद- तिरंदाजी
  2. भारत कुमार छेत्री- हॉकी
  3. बॉबी अलॉयसियस- धावपटू
  4. चौगले दादू दत्तात्रय- कुस्ती 
 7. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार- 2018:-
  1. उदयोन्मुख आणि युवा प्रतिभेची निवड आणि प्रोत्साहन- राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडकॉर्पोरेट
  2. सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन- जेएसडब्ल्यू स्पोर्टस्विकासासाठी खेळ- इशा आउटरीच
  3. मौलाना अबुल कलाम आजाद चषक 2017-18गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर
 8. राष्ट्रपती भवनात 25 सप्टेंबर 2018 रोजी होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
 9. साडे सात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे स्वरुप आहे.
 10. अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जातील.
 11. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
 12. आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाईल.


Top