Successfully completed CHOGM 2018 of Commonwealth of Nations

 1. 20 एप्रिल 2018 रोजी ब्रिटनच्या लंडन शहरात राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM 2018) संपन्न झाली. ही CHOGMची 25 वी बैठक होती.
 2. या बैठकीचा विषय “टूवर्ड्स ए कॉमन फ्यूचर” हा होता.
 3. या बैठकीत महासागर प्रशासनासंबंधी राष्ट्रकुल ब्लू चार्टर, व्यापार व गुंतवणूकीसाठी कॉमनवेल्थ कनेक्टिव्हीटी एजेंडा, सायबर गुन्हेगारी यावर घोषणा तसेच सदस्य देशांमध्ये निवडणुकांचे अवलोकन याबाबत सुधारित राष्ट्रकुल दिशानिर्देश यासंबंधी मुद्द्यांवर भर दिला गेला.
 4. यावेळी चार मुख्य उद्दिष्टे:-
  1. समृद्धी: राष्ट्रकुल देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढविणे.
  2. सुरक्षा: जागतिक दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि सायबर हल्ले यांसारख्या सुरक्षेसंबंधी समस्यांना दूर करण्यासाठी सहकार्य वाढविणे.
  3. न्याय वर्तन: राष्ट्रकुलमध्ये लोकशाही, मूलभूत स्वातंत्र्य आणि सुशासन यांचा प्रचार करणे.
  4. शाश्वतीकरण: हवामान बदल आणि अन्य जागतिक संकटांच्या प्रभावांना हाताळण्यासाठी लहान आणि संवेदनशील राज्यांची लवचिकता वाढविणे.
 5. ठळक बाबी:-
  1. भारत आणि ब्रिटन यांच्यात आंतरराष्ट्रीय सायबर हालचालींविषयी माहिती सामायिक करण्यासाठी सायबर सुरक्षा क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  2. त्यातच सर्व 53 सहभागी राष्ट्रांच्या नेत्यांनी सायबर सुरक्षेसंबंधी त्यांच्या कार्यचौकटीचे मूल्यांकन करून त्याला बळकट करण्यासाठी सर्वसमावेशकपणे काम करण्याचे मान्य केले आहे. त्यांनी 2020 सालापर्यंत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई करण्यास सहमती दर्शवली. 
  3. बैठकीत राष्ट्रकुलची सायबर सुरक्षा क्षमता मजबूत होण्यास मदत करण्याच्या दृष्टीने ब्रिटनने 15 दशलक्ष पौंड एवढी आर्थिक वचनबद्धता जाहीर केली.
  4. याशिवाय, नेत्यांनी बहुपक्षीय व्यापार प्रणालीला आपला पाठिंबा दर्शविला आणि व्यापार आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी सहा सूत्री संपर्क-जोडणी विषयपत्रिका (agenda) अंगिकारला आहे.
  5. नेत्यांनी हवामानातील बदल, प्रदूषण आणि प्रमाणाबाहेर मासेमारी यांच्या विपरीत परिणामांपासून महासागरांचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली.
राष्ट्रकुल
 1. पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात मोडणाऱ्या पण नंतर स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना ‘राष्ट्रकुल’ म्हणून ओळखली जाते.
 2. ब्रिटनच्या संसदेने स्टॅट्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा करून राष्ट्रकुलाला 1931 साली मान्यता दिली.
 3. त्यामुळे पूर्वीची इम्पीअरिअल कॉन्फरन्स ही संज्ञा कालबाह्य ठरून ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स ही संज्ञा रूढ झाली.
 4. 1947 साली ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ’ या नावातून ब्रिटिश हा शब्द वगळण्यात आला.
 5. पूर्वप्रथेनुसार राष्ट्रकुलाचे प्रमुखपद ब्रिटिश राजमुकुटाकडे असते. 1965 साली राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले. 
 6. राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM) पहिल्यांदा सन 1971 मध्ये सिंगापूरमध्ये भरविण्यात आली होती.
 7. वर्तमानात राष्ट्रकुलमध्ये 53 सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे. राणी एलिजाबेथ द्वितीय या राष्ट्रकुलच्या प्रमुख आहेत.
 8. राष्ट्रकुलच्या 16 सदस्य देशांच्या देखील प्रमुख आहेत, ज्याला राष्ट्रकुल क्षेत्र म्हणून संबोधले जाते. राष्ट्रकुल हा जवळपास 2.4 अब्ज नागरिकांचा प्रदेश आहे.


 Central Government has drafted rules for registration of high security vehicles

 1. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वाहन निर्माता उद्योगांसाठी 1 जानेवारी 2019 पासून सर्व नवीन वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाट्या (HSRP) प्रदान करण्यास सक्तीचे बनविण्यासाठी नव्या नियमांचा एक मसुदा तयार केला आहे.
 2. मोटर वाहनांच्या सर्व वर्गात लावण्यात येणार्‍या HSRP टिकावू पाट्या असतील आणि त्या सुरक्षेसंबंधी इन-बिल्ट सुविधांनी सुसज्जित असतील.
 3. भारतात काही राज्यांमध्ये 2005 साली HSRP सक्तीचे केले गेले होते, मात्र याची योग्य ती अंमलबजावणी केली गेलेली नाही.
HSRP नियम
 1. मोटर वाहन कायद्याच्या कलम 50 अन्वये उच्च सुरक्षा वाहनाच्या नोंदणी क्रमांकाला 15 वर्षांच्या हमीसह तयार केले जाईल.
 2. जर निश्चित कालावधीत नैसर्गिक कारणांमुळे पाट्या खराब किंवा तुटतात तर त्या पाट्या डीलरकडून दुरूस्त करून घेतल्या जातील.
 3. वाहनाच्या मागे-पुढे लावलेल्या पाट्या चोरी जाऊ नये आणि त्यांचा दुसर्‍यांदा वापर टाळण्यासाठी, या पाट्या स्नॅप लॉक सि‍स्‍टमने (कमीतकमी दोन) जोडल्या जातील.
 4. फसव्या पाट्या टाळण्यासाठी 20x20मिमी आकाराच्या क्रोमि‍यमने तयार केलेल्या होलोग्रामला हॉट स्टॅम्पसोबत पाटीच्या कोनाशी वरती डाव्या बाजूला लावले जाईल. होलोग्राममध्ये निळ्या रंगाचे 'चक्र' असणार आहे.
 5. कमीतकमी 10 अंकी कायमस्वरूपी ओळख क्रमांक लेजर ब्रॅंडेड असणार, ज्याला खाली डाव्या बाजूला ठेवले जाणार. क्रमांकाचा आकार 2.5मिमी ठेवला जाणार आहे.
 6. कायमस्वरूपी ओळख क्रमांकामध्ये दोन इंग्रजी अक्षरे असतील, जी वेंडर किंवा उत्पादक किंवा पुरवठा करणार्‍याला दिला जाईल.
 7. पाटीवर इंजन क्रमांक आणि चेसिस क्रमांक देखील असतील. या क्रमांकांना इलेक्‍ट्रॉनि‍कली लिंकने लिहिले जाणार आहे.

 


 Kirti Shiladar as President of 9th Drama Sammelan

 1. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांची निवड करण्यात आली आहे.
 2. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कीर्ती शिलेदार, श्रीनिवास भणगे आणि सुरेश साखवळकर यांच्यात चुरस होती.
 3. ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांनीही नगर येथे झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
 4. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या इतिहासात आई आणि मुलगी अशा दोघींना हा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 5. नाट्य परिषद कार्यकारिणी आणि नियामक मंडळाच्या बैठकीत यावर्षीचे संमेलन १३ ते १५ जून दरम्यान मुंबईत होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
 6. याआधी १९९३साली मुंबईत नाट्य संमेलन झाले होते. आता बरोबर पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये नाट्य संमेलनाचे बिगूल वाजणार आहे.
 7. नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे हे पहिलेच नाट्य संमेलन असणार आहे.
 8. मुंबईत नाट्य संमेलन कुठे घ्यायचे याच्या निवडीचे सर्वाधिकार नियामक मंडळाने प्रसाद कांबळी यांच्याकडे दिले आहेत.


 Allocation of 'Award for Excellence in Public Administration' at the hands of the Prime Ministe

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हे/अंमलबजावणी संस्था आणि अन्य केंद्रीय आणि राज्य संघटनांना निवडक प्राधान्य कार्यक्रम आणि अभिनव कल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
 2. चार प्राधान्य कार्यक्रमांसाठी यंदा 11 पुरस्कार दिले गेले आहेत.
 3. त्यामध्ये दोन पुरस्कार केंद्र/राज्य सरकारच्या संघटनांना नावीन्यपूर्ण संशोधनासाठी दिले गेलेत आणि एक पुरस्कार महत्वाकांक्षी जिल्ह्याला दिला गेला.
 4. याशिवाय जिल्ह्यांसह केंद्रीय, राज्य संघटनांसाठी नवोन्मेष पुरस्कार देखील आहेत.
 5. जिल्हे आणि केंद्र आणि राज्य सरकारांच्या संघटनांनी नागरिकांच्या कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पंतप्रधान पुरस्कारांची स्थापना करण्यात आली.
या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले चार प्राधान्य कार्यक्रम
 1. पंतप्रधान पीक विमा योजना
 2. डिजिटल भरणा करायला प्रोत्साहन
 3. पंतप्रधान आवास योजना-शहरी आणि ग्रामीण
 4. दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना.


Civil Service Day: April 21

 1. दरवर्षी 21 एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिन’ पाळला जातो.
 2. यावर्षी नवी दिल्लीत 12 व्या नागरी सेवा दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 3. यानिमित्त, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘एम्यूलेटिंग एक्सलेंस-टेकअवेज फॉर रिप्लिकेशन' हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 4. 1947 साली 21 एप्रिलला स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेट्काफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते.
 5. या दिनाच्या स्मृतीत 2006 साली नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमापासून नागरी सेवा दिन नियमितपणे साजरा होत आहे.


World creativity and innovation day: 21st of April

 1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात 21 एप्रिल 2018 रोजी पहिला अधिकृत ‘जागतिक कल्पकता आणि अभिनवता दिन (WCID)’ पाळला जात आहे.
 2. हा दिवस शाश्वत भविष्याच्या दृष्टीने कल्पक बहुशास्त्रीय विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी पाळला जात आहे.
 3. 21 एप्रिल 2002 रोजी जगातील 50 पेक्षा जास्त देशांमध्ये पहिल्यांदा जागतिक कल्पकता आणि अभिनवता दिन (WCID) पाळला गेला होता.
 4. 2006 साली WCID सप्ताह (15-21 एप्रिल) पाळण्यात आला होता.
 5. 15 एप्रिल हा लिओनार्डो द व्हींची यांचा वाढदिवस देखील आहे.
 6. कला आणि विज्ञान विषयांमध्ये त्यांच्या कल्पकतेसाठी लिओनार्डो द व्हींची यांना एक आदर्श मानले जाते.


Top