SWARA MAHABALESWARKAR GYMNASTICS

  1. भारतात प्रथमच घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ह्रदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवडमधील कोया फिटनेस अकादमीच्या मुलींनी सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाई केली आहे.

  2. स्वरा महाबळेश्‍वरकरने 10 वर्षांखालील वयोगटात एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले. तसेच 12 वर्षांखालील वयोगटात रूही कौलगीकरने कांस्यपदक पटकावले. काशवी ठाकोर, अवनी नहार, यावी मेहता, आदिश्री कुलकर्णी, धानवी चोरडिया, सई दानी, शालवी शहा, रिदम मुथ्था, केया खैरनार व प्रेरणा धर्मानी आदी खेळाडूंनी नैपुण्य दाखवले.

  3. सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व परीक्षक आदिश्री राजपूत व संस्थेचे सहायक प्रशिक्षक रश्‍मी पर्णीकर यांनी मार्गदर्शन केले. तर या स्पर्धेत भारतासह एकूण 6 देशांचा सहभाग होता.


D K JAIN BCCI NEW OFFICER

  1. सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) लवाद अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायालयाने ‘बीसीसीआय’वर नेमलेले ते पहिले लवाद अधिकारी आहेत. BCCI

  2. न्यायमूर्ती एस.ए. बोबडे आणि ए.एम. सप्रे यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले आहे की, ‘दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.’

  3. खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयातील सहा माजी न्यायमूर्तीची नावे ठेवण्यात आली होती. यापैकी जैन यांना प्राधान्य देण्यात आले. खंडपीठाने जैन यांच्या नावाविषयी विचारले असता सर्व वकिलांनी अनुकूलता दर्शवली.

  4. राज्य क्रिकेट संघटनांमधील खेळाडूंचे प्रश्न आणि आर्थिक समस्या सोडवण्याची जबाबदारी लवाद अधिकाऱ्यांवर असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

  5. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 9 ऑगस्ट 2018च्या निकालात लोकपालांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंडय़ा व लोकेश राहुल वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना त्यांच्या निलंबनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी लोकपालांची गरज तीव्रतेने भासली होती.


Top