Ministry of Urban Welfare will implement 'living index program' in 116 cities

 1. भारत सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाने शहरांसाठी ‘शहर राहणीमान निर्देशांक कार्यक्रम’ (City Liveability Index Scheme) राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. प्रारंभी देशातल्या 116 शहरांमध्ये लोकांचे राहणीमान जाणून घेतल्या जाणार आहे. भारतीय शहरांना अधिक गुणवत्तेसह राहण्याजोगे बनविणे या कार्यक्रमाचा उद्देश्य आहे.
 3. IPSOS रिसर्च प्रायवेट लिमिटेड आणि अथेना इन्फोनोमिक्स इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या सहकार्याने इकॉनॉमीक इंटेलिजन्स युनिट (EIU) ऑफ इकॉनॉमी (लंडन) मार्फत मूल्यांकन केले जाणार आहे.
 4. प्रमुख मानके - शहरांना वीज, पानी, रस्ते, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा सहित अन्य मूलभूत सुविधांसह ई-सुविधा, सार्वजनिक परिवहन व रहदारी सवलतींची अबाध्य व सहज उपलब्धता, पर्यावरण व ऊर्जा संवर्धन उपाययोजना.
शहर राहणीमान निर्देशांक कार्यक्रम
 1. कार्यक्रमामध्ये सामील 116 शहरांमध्ये 99 स्मार्ट शहरांसह 1 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या काही इतर शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
 2. त्यामध्ये उत्तरप्रदेशची 14, तामिळनाडू आणि महाराष्ट्र मधील प्रत्येकी 12, कर्नाटक आणि मध्यप्रदेश मधील प्रत्येकी 7, गुजरातची 6 आणि बिहारची 4 शहरे तसेच दिल्लीच्या 3 नगरपालिका आणि नवी दिल्ली नगरपालिका परिषद यांचा समावेश आहे.
 3. निश्चित केल्या गेलेल्या 79 मानकांमध्ये शहरांच्या अश्या संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक आणि भौतिक पैलूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे लोकांचे राहणीमान प्रभावित होतो आणि शहर राहण्याजोगे बनते.
 4. शहरांच्या वर्तमान परिस्थितीचे आकलन करणे आणि तेथील रहिवासींचे राहणीमान उंचावण्यासाठी मार्ग प्रशस्‍त करण्यासाठी एक समन्वयित किमान रूपरेखा विकसित करण्याच्या हेतूने मंत्रालयाने भारतीय शहरांच्या दृष्टीने प्रासंगिक मानल्या जाणार्‍या ‘राहणीमान मानकांचा’ एक समूह विकसित केला आहे, जेणेकरून ‘राहणीमान निर्देशांक’ तयार केला जाऊ शकणार आणि शहरांना क्रमवारी प्रदान केली जाऊ शकणार आहे.


Launch of the scheme to provide quality for garbage-free cities under Swachh Bharat Abhiyan (Urban)

 1. गोव्यात गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान (शहरी) अंतर्गत ‘कचरा मुक्त शहरांसाठी स्टार क्रमवारीता’ या उपक्रमासाठी पाळावयाच्या शिष्ठाचाराचे (प्रोटोकॉल) अनावरण करण्यात आले आहे.
 2. स्वच्छ भारत अभियान (शहरी) द्वारा तयार ‘स्टार क्रमवारीता’ उपक्रमांतर्गत देशातल्या शहरांना घनकचरा व्यवस्थापनासंबंधी विविध घटकांच्या आधारावर सप्ततारांकित (7-star) क्रमवारी प्रणालीच्या आधारावर क्रमांक प्रदान केले जाणार आहे.
 3. घनकचरा व्यवस्थापनासंबंधी विविध स्वच्छता निर्देशकांमध्ये दारोदार कचरा गोळा करणे, मोठ्या प्रमाणात कचरा निर्मितीसंबंधी अनुपालन, सुरवातीलाच कचर्‍याची विभागणी, निस्सारण, कचऱ्यावरील शास्त्रीय प्रक्रिया, शास्त्रीय जमिनीचा भरणा, प्लास्टीक कचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि उध्वस्त करण्यासंबंधी व्यवस्थापन, थकलेल्या कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया आणि नागरिक तक्रार निवारण प्रणाली आदींचा समावेश आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
 1. शहरांना निर्दिष्ट शिष्टाचारसंबंधी अटी पाळण्याच्या आधारावर 1, 2, 3, 4, 5 आणि 7 तारांकित म्हणून क्रम प्रदान केला जाणार आहे. हागणदारी मुक्त असल्यास शहरांना 3 वा त्यापेक्षा अधिकचे तारांकित म्हणून दिले जाऊ शकणार आहे.
 2. शहरे स्वतःला 1, 2 किंवा 4 तारांकित घोषित करु शकतात, मंत्रालय या शहरांना 3, 5 किंवा 7 तारांकित म्हणून प्रमाणित करण्यासाठी स्वतंत्र निर्देशित संस्थेमार्फत अतिरिक्त सत्यापनाची प्रक्रिया करणार आहे.
 3. एकापेक्षा जास्ती शहरांना उच्चतम तारांकित दर्जा प्राप्त असू शकणार आहे. शहरांना त्यांचा दर्जा कायम ठेवण्यासाठी दरवर्षी शहरांना स्वत:ला प्रमाणित करून घेणे आवश्यक असेल.
 4. शहरांच्या एकूणच स्वच्छतेसाठी आणि कचरा मुक्त दर्जा मिळविण्यासाठी असलेल्या अनेक घटकांचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करण्याच्या ऐवजी शहरांच्या स्वच्छतेला क्रम देण्यासाठी एकच संरचना भागधारकांना प्रदान करते.
 5. SMART क्रमवारीता (सिंगल मेट्रिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिगरस व्हेरिफिकेशन, टार्गेटेड टूवर्ड्स आऊटकम्स) विश्वस्त मंडळाकडून दर्शविला जातो आणि मॉडेल आणि शाश्वतपणा सत्यापित करते, जो दरवर्षी मंजूर केला जाणार आहे.
 6. स्वच्छतेमध्ये उच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी शिष्टाचारात सर्व भागधारक आणि सामान्य नागरिकांचा सहभाग समावेश असेल.


In the United States after 2013 again the shutdown of the shutdown

 1. सरकारी खर्चांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या विधेयकाला खासदारांची मंजुरी मिळू न शकल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारवर शटडाऊनची नामुष्की आली आहे.
 2. शटडाऊन झाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडणार आहेत तसेच लाखो कर्मचाऱ्यांची नोकरीही जाणार आहे.
 3. निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकारतर्फे ‘स्टॉप गॅप बिल’ मांडले जाते. त्याला अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाची आणि सिनेट सदस्यांची मंजुरी बंधनकारक असते.
 4. स्टॉप गॅप बिल हे अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने मंजूर केले होते. मात्र सिनेट सदस्य याबाबत चर्चा करत असतानाच रात्रीचे १२ वाजले आणि त्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळाली नाही.
 5. त्यामुळे आता अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अॅक्ट लागू झाला असून, त्याचमुळे अमेरिकेवर शटडाऊनची वेळ आली आहे.
 6. त्यामुळे सोमवारपासून (२२ जानेवारी) अत्यावश्यक सेवा वगळता अमेरिकन प्रशासनाचे बहुतांशी विभाग बंद ठेवावे लागणार आहेत.
 7. शटडाउनचा नागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेवर काहीही परिणाम होणार नाही. ते कर्मचारी काम करतील मात्र निधीची व्यवस्था होईपर्यंत त्यांना पगार दिला जाणार नाही.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. शटडाउनची ही समस्या अमेरिकेत पहिल्यांदा उद्भवलेली नाही. याआधी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना २०१३मध्येही अशी वेळ होती.
 2. २०१३मध्ये दोन आठवडे सरकारी कामकाज पूर्णपणे बंद होते. त्यामुळे ८ लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले.
 3. त्याचप्रमाणे १९८१, १९८२, १९९०, १९९५ आणि १९९६ या वर्षांमध्येही अमेरिकेवर शटडाउनची नामुष्की ओढवली होती.


'Prime Minister's Safe Motherhood Campaign (PMSMA)' crossed the 1 million mark

 1. भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री  सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA)’ ने गर्भवतींच्या तपासणीमध्ये एक कोटींचा टप्पा गाठला आहे.
 2. आतापर्यंत या मोहिमेत एक कोटी गर्भवतींची तपासणी करण्यात आली  आहे, ज्यात अतिदुर्गम भागातल्या 25 लाख  गर्भवतींचा समावेश आहे.
 3. देशभरात प्रत्येक महिन्याच्या 9 व्या दिवशी गर्भवती महिलांना निश्चित गुणवत्तेची हमी देणारी ‘गर्भवती स्त्रियांसाठी संपूर्ण काळजी (ANC)’ सेवा प्रदान करण्यासाठी 2016 साली ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA)’ सुरू केले गेले.
‘प्रधानमंत्री  सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA)’

अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवा:- 

 1. गर्भवतींसाठी तपासणी, लसीकरण  
 2. मोफत औषधी सेवा पुढाकार,
 3. मोफत निदान सेवा पुढाकार,
 4. जिल्हा रुग्णालय बळकटीकरण आधार,
 5. व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा पुरविणे,
 6. गुणवत्ता हमी कार्यक्रम,
 7. कायाकल्प पुरस्कार.


New Chief Election Commissioner P. Appointed as Rawat

 1. भारतीय निवडणूक आयुक्तालय (ECI) चे निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.
 2. पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांच्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
 3. रावत यांच्या जागी ECI चे निवडणूक आयुक्त म्हणून माजी अर्थसचिव अशोक लवासा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 4. भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व निम-न्यायिक संस्था आहे.
 5. ECI ची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली.
 6. आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात.
 7. ECI वर संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.
 8. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.
 9. पूर्वी आयोग एक सदस्य असलेले मंडळ होते, परंतु 1989 सालानंतर दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्त पद निर्माण करण्यात आले.


World Cup win over India

 1. विजेता संघ - भारत.
 2. प्रतिस्पर्धी संघ - पाकिस्तान.
 3. स्पर्धेचे ठिकाण - शारजा (संयुक्त अरब अमिराती).
 4. अंतिम लढतील विशेष उपस्थिती - आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन, भारताचा माजी विकेटकीपर सय्यद किरमाणी आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार झहीर अब्बास.
 5. दृष्टिहीनांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वषचकावर आपले नाव कोरले.
 6. पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारतीय संघाने ८ गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकात पूर्ण केले.
 7. पाकिस्तानकडून बदर मुनीर याने सर्वाधिक ५७ तर रियासत खान ४८ आणि कर्णधार निसार अली याने ४७ धावांचे योगदान दिले. याच्या जोरावर पाकिस्तानने ३०८ धावांची मजल मारली.
 8. भारताकडून सुनील रमेशने ९३ आणि अजय रेड्डीने ६२ धावांची खेळी केली.
 9. पाकिस्तानने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा १५६ धावांनी पराभव केला होता. तर भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशला सात गडी राखून हरवले होते.
दृष्टिहीनांचा वर्ल्डकप
 1. पार्श्वभूमी:-
 2. या खेळाचे आत्तापर्यंत तीनदा विश्वचषकासाठी सामने आयोजित केले गेले आहेत.
 3. दृष्टिहीनांसाठीचा पहिला क्रिकेट विश्वचषक नवी दिल्ली, भारत  येथे इ.स. १९९८ साली, दुसरा विश्वचषक चेन्नई, भारत येथे इ.स. २००२ साली तर तिसरा विश्वचषक इस्लामाबाद, पाकिस्तान येथे इ.स. २००६ साली आयोजित करण्यात आला होता.
 4. यंदाचा संयुक्त अरब अमीराती येथे पार पडला.


Top