रामनाथ कोविंद: भारताचे 14 वे राष्ट्रपती

 1. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाची निवडणूक 2017 मध्ये विजय झाला आहे.
 2. या विजयासोबत ते भारताचे 14 वे राष्ट्रपती असतील.
 3. भारताचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्याकडून राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर ते 26 जुलै 2017 रोजी माननीय प्रणब मुखर्जी यांच्याकडून कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील.

निवडणुक:-

 1. 17 जुलै 2017 रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्व राज्यांच्या विधानसभांचे 4,109 सदस्य (आमदार) आणि संसदेचे 771 सदस्य (खासदार) अश्या एकूण 4,880 वैध मतदारांपैकी 99.49% लोकांनी मतदान केले होते.
 2. या निवडणुकीत रामनाथ कोविंद आणि मीरा कुमार या दोन व्यक्तींची उमेदवारी होती.
 3. 20 जुलै 2017 रोजी झालेल्या मतमोजणीनुसार, रामनाथ कोविंद यांनी 7,02,044 मूल्यासह 2,930 मते (65.65%) मिळाली
 4. मीरा कुमार यांना 3,67,314 मूल्यासह 1,844 मते (35%) मिळाली.
 5. तसेच 77 मते अवैध ठरलेली आहेत.

रामनाथ कोविंद :- 

 1. 1 ऑक्टोबर 1945 रोजी उत्तरप्रदेशच्या कानपूर देवघाट जिल्ह्यातील पाराउंख गावात जन्मलेल्या रामनाथ कोविंद यांनी वाणिज्यशास्त्राची पदवी आणि त्यानंतर कायदा शिक्षण (LLB) घेतलेले आहे.
 2. 72 वर्षीय रामनाथ कोविंद 12 वर्षे राज्यसभेचे सदस्य होते आणि अनेक संसदीय मंडळांचा भाग होते.
 3. त्यांनी भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष देखील होते.
 4. त्यांनी सन 1982-1984 या काळात दिल्ली उच्च न्यायालयात केंद्रीय सरकारतर्फे वकील होते. 
 5. के. आर. नारायणन यांच्यानंतर हे दुसरे दलित  राष्ट्रपती आहेत.

भारतीय राष्ट्रपती पद :-

 1. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये असे म्हटले आहे की, भारताचे एक राष्ट्रपती असतील.
 2. केंद्राचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीला निहित केले जाईल.
 3. ते देशाचे प्रमुख असतील आणि राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील.
 4. भारतीय संसदीय लोकशाहीमधे, राष्ट्रपती हे पहिले नागरिक आहेत आणि देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून ते कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत.


महापालिका नगरसेवकांच्या मानधनात वाढ

 1. महाराष्ट्रातील महापालिका नगरसेवकांच्या मानधनात वाढकरण्याच्या निर्णयास नगरविकास विभागाने १५ जुलै रोजी मंजुरी दिली.
 2. नगरविकासाच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या नगरसेवकास प्रतिमहिना २५ हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे.
 3. त्याचबरोबर मुंबईवगळता इतर वर्गवारीतील महापालिका नगरसेवकांच्या मानधनातही वाढ झाली आहे.
 4. या वाढलेल्या मानधनाचा आर्थिक भार त्या त्या महापालिकांच्या तिजोरीवर पडणार आहे.
 5. राज्यात २७ महापालिका आहेत.
 6. या महापालिकांचे वर्गीकरण अ, ब, क आणि ड अशा चार विभागांत केले आहे. यापैकी मुंबई महापालिका ‘अ प्लस’ वर्गवारीत मोडते.
 7. यापूर्वी मुंबई महापालिका सदस्यांचे २००८ मध्ये तर मुंबई वगळून इतर महापालिका सदस्यांचे २०१० मध्ये मानधन वाढवण्यात आले होते.

नगरसेवकांचे सुधारित मानधन :-

महापालिका प्रकार

पूर्वीचे मानधन (रु.)

सुधारित मानधन (रु.)

अ प्लस

१५,००० २५,०००

७,५००

२०,०००

७,५००

१५,०००

७,५००

१०,०००

७,५०० १०,०००

 


एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार : व्यंकय्या नायडू

 1. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
 2. राजकारणाचा २५ वर्षांचा अनुभव असलेले नायडू सध्या केंद्र सरकारमध्ये नगरविकास व माहिती प्रसारण मंत्री आहेत.
 3. वाजपेयींच्या काळात त्यांनी ग्रामविकास खात्याची धुरा सांभाळली होती.
 4. नायडू प्रथम १९७८ आणि १९८३ साली आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. १९९३मध्ये भाजपचे सरचिटणीस झाले.
 5. नायडू यांनी आतापर्यंत गृह, अर्थ, कृषी, संसदीय कामकाज तसेच परराष्ट्र व्यवहार या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे.
 6. काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’कडून यापूर्वीच महात्मा गांधी यांचे नातू व माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांना काँग्रेससह १८ इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
 7. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्टला होणार आहे. त्याच दिवशी मतदान होईल आणि त्याचदिवशी मतमोजणीही केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै आहे.
 8. देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या १० ऑगस्ट रोजी संपणार आहे.


फेडररचे विश्वविक्रमी आठवे विम्बल्डन जेतेपद

 1. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने क्रोएशियाच्या मरिन चिलिचवर सहज मात करत विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेच्या ऐतिहासिक जेतेपदावर नाव कोरले.
 2. अकराव्यांदा विंबल्डनची अंतिम फेरी गाठणाऱ्या फेडररने अंतिम फेरीत चिलिचचा ६-३, ६-१, ६-४ असा तीन सरळ सेटमध्ये पराभव केला.
 3. ३५ वर्षे आणि ३४३ दिवस वय असलेला फेडरर विम्बल्डन जेतेपद जिंकणारा वयस्कर खेळाडू ठरला आहे.
 4. यापूर्वी १९७६ मध्ये आर्थर ऍश यांनी वयाच्या ३२व्या वर्षी विम्बल्डन विजेतेपद मिळविले होते.
 5. विम्बल्डन पुरुष एकेरीचे हे रॉजर फेडररचे आठवे जेतेपद आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.
 6. फेडररने याआधी २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००९ आणि २०१२मध्ये विम्बल्डन जेतेपद पटकावले होते.
 7. त्याने विल्यम रेनशॉ आणि पीट सॅम्प्रस यांचा ७ जेतेपदांचा विक्रम मोडला आहे.
 8. पुरुष एकेरीत सर्वाधिक १९ ग्रँड स्लॅम जेतेपद फेडररच्या नावावर आहेत. यानंतर स्पेनच्या राफेल नदालच्या नावावर १५ ग्रँडस्लॅमची नोंद आहे.
 9. एकही सेट न गमावता विम्बल्डन जेतेपद पटकावणारा तो ब्योन बोर्ग नंतर तो पहिला खेळाडू ठरला.
 10. बोर्ग यांनी ४१ वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती.
 11. एका ग्रँडस्लॅम स्पर्धेचे आठ वेळा जेतेपद पटकावणारा फेडरर हा दुसरा खेळाडू आहे.
 12. राफेल नदालने फ्रेंच खुली स्पर्धा १० वेळा जिंकली आहे.
 13. याशिवाय २९वा ग्रँडस्लॅम अंतिम सामना खेळणारा फेडरर हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यानंतर नदालने २२ तर सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचच्या २१ ग्रँडस्लॅम अंतिम सामने खेळले आहेत.


पंचगव्याच्या अभ्यासासाठी समिती

 1. गाईपासून मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थापासून कोणते फायदे होतात याचा शास्त्रीय आधाराने अभ्यास करण्यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे.
 2. ‘सायंटिफिक व्हॅलिडेशन अँड रिसर्च ऑन पंचगव्य’ असे या प्रकल्पाचे नाव असून, गाईपासून मिळणाऱ्या पदार्थाबाबत वैज्ञानिक संशोधनावर आधारित फायद्यांची माहिती ही समिती गोळा करणार आहे.
 3. गाईपासून मिळणाऱ्या पदार्थाचा वापर पोषण, आरोग्य व कृषी क्षेत्रात कशा प्रकारे होतो व त्याला वैज्ञानिक आधार काय आहे हे सांगण्याचे काम समिती करणार आहे.
 4. गाईचे शेण, मूत्र, गाईचे दूध, दही व तूप यांच्या मिश्रणास पंचगव्य म्हणतात. त्याचे जे लाभ आहेत त्यांना वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्न यात केला जाईल.
 5. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या सदस्यांचा समावेश आहे.

समितीची कार्यकारिणी:-

 1. समितीचे अध्यक्ष – डॉ. हर्षवर्धन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री
 2. समितीचे सहअध्यक्ष - विजय भटकर विज्ञान भारतीचे अध्यक्ष, दिल्ली

सदस्य:-

 1. रघुनाथ माशेलकर - सीएसआयआरचे माजी संचालक
 2. प्रा. रामगोपाल राव - आयआयटी दिल्लीचे संचालक
 3. प्रा. व्ही के विजय - आयआयटीच्या ‘सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी’
 4. ए जयकुमार - विज्ञान भारतीचे सरचिटणीस, दिल्ली
 5. सुनील मानसिंघका - गो विज्ञान अनुसंधान केंद्र


Top