विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारत-रशिया यांच्या भागीदारीला 10 वर्ष पूर्ण

 1. 20 जून 2017 रोजी भारत-रशिया एकात्मिक तंत्रज्ञान व्यवसायिक कार्यक्रमाची सांगता झाली.
 2. यासोबतच भारताचे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (DST) आणि रशियाचे रशियन फाऊंडेशन फॉर बेसिक रिसर्च (RFBR) यांच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य संबंधांना 10 वर्षे पूर्ण झाली.
 3. शिवाय हे वर्ष भारत आणि रशिया यांच्या राजनैतिक संबंधांचे 70 वे वर्ष आहे.
 4. याप्रसंगी, दोन करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
 5. महत्वपूर्ण बाबी:-
 6. जागतिक स्तरावर स्पर्धात्मकता वाढवून लहान उद्योजकांना याद्वारे पाठबळ पुरवणे, तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासाठी DST आणि रशियाच्या फाऊंडेशन फॉर असिस्टंट टू स्मॉल इनोव्हेटिव्ह इंटरप्राईजेस (FASIE) यांच्यात सामंजस्य करार
 7. दोन्ही देशांमधील युवा (39 वर्षापेक्षा कमी) शास्त्रज्ञांना संशोधन क्षेत्रात सहयोगाने कार्य करण्यास मदत करण्यासाठी DST आणि रशियन सायन्स फाऊंडेशन (RSF) यांच्यात सामंजस्य करार
 8. यावेळी दोन्ही देशांनी स्टार्ट-अप उपक्रमांसाठी कार्य करणे आणि अभिनव उपक्रमांसाठी संयुक्तपणे कार्ये करण्यास मान्य केले आहे.
 9. इतिहास
 10. DST आणि RFBR यांच्यातील संबंधांना 2007 साली रशियन अकॅडेमी ऑफ सायन्स सोबत चालवल्या जाणार्या एकात्मिक दीर्घकालीन कार्यक्रम (ILTP) यापासून सुरुवात झालेली आहे.
 11. आज हा कार्यक्रम मूलभूत विज्ञान क्षेत्रातील सहयोगासाठी एक भक्कम व्यासपीठ बनले आहे.
 12. पुढेही मूलभूत विज्ञान क्षेत्रात सहयोग सुरू ठेवण्यात येईल. सध्या DST आणि RSF कडून संयुक्तपणे 17 प्रकल्पांवर काम सुरू आहे.
 13. या दशकात दोन्ही संस्थांकडून 254 संशोधन प्रकल्पांना सहयोग प्रदान करण्यात आले आहे.
 14. या प्रकल्पांवर जवळपास 800 शोधप्रबंध प्रकाशित झाले आहेत.


Top

Whoops, looks like something went wrong.