1. २१ नोव्हेंबर २०१७ रोजी 'सागर कवच' या तटरक्षण सरावाला सुरुवात झालेली आहे. केरळ आणि लक्षद्वीप बेटांच्या संरक्षणार्थ भारतीय तटरक्षक दलाने 'सागर कवच' हा तीन दिवसांचा तटीय सुरक्षा कार्यक्रम आयोजित केला आहे.
 2. तटीय सुरक्षा यंत्रणेच्या मूल्यांकनासाठी आणि मानक क्रियान्वयन प्रक्रियांच्या प्रमाणीकरणासाठी हा एक अर्धवार्षिक कार्यक्रम आहे.
 3. भारतीय तटरक्षकाच्या नेतृत्वात भारतीय नौदल, तटीय पोलीस, पोलीस विशेष शाखा, इंटेलिजन्स ब्यूरो, कस्टम्स, बंदरे विभाग, मत्स्यपालन विभाग, प्रकाशगृहांचे महानिदेशक आणि हलके जहाजे आणि मच्छिमार समुदाय या सगळ्यांचा सक्रिय सहभाग या सरावात आहे.


 1. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुंशी यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. ते गेल्या नऊ वर्षापासून कोमात होते.
 2. दक्षिण कोलकाता लोकसभा क्षेत्रातून प्रियरंजन दासमुंशी यांनी पहिल्यांदाच वर्ष १९७१ मध्ये संसदेत प्रवेश केला. त्यांना १९८५ साली पहिल्यांदा राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद सोपवले गेले होते.
 3. २००४ साली संसदीय निवडणूक जिंकल्यानंतर २००८ साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तेव्हापासून कोमात होते.


 1. अफगाणिस्तानने संभाव्य विजेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानला १८५ धावांनी पराभूत करत १९ वर्षांखालील मुलांच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकाविले.
 2. अफगाणिस्तानने इक्रम अलीच्या १०७ धावांच्या खेळीच्या जोरावर ७ बाद २४८ धावांपर्यंत मजल मारली. पण पाकिस्तानचा डाव तर अवघ्या ६३ धावांतच आटोपला. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब झदरानने १३ धावांत ५ बळी घेत पाकिस्तानला गुंडाळले.
 3. मुजीबने पाच सामन्यांतून २० बळी घेतले आहेत. त्याआधी, अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाझ (४०) व इब्राहिम झदरान (३६) यांनी छान सुरुवात करून देत ६१ धावांची सलामी दिली. ही जोडी फुटल्यावर इक्रम अलीने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेतला.
 4. एकट्यानेच अफगाणिस्तानला २००चा टप्पा ओलांडून दिला. अफगाणिस्तानने आपले पहिले 'अंडर-19 आशिया चषक' जिंकले.


 1. चीनने 'डाँगफेंग-41' (डीएफ-41) या अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतल्याचे वृत्त तेथील प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
 2. या क्षेपणास्त्राचा पल्ला १२००० ते १५००० किलोमीटर असून एकावेळी अनेक अण्वस्त्रे जगाच्या कोणत्याही भागात डागण्याची त्याची क्षमता आहे.
 3. त्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दहापट असल्याने अमेरिका व अन्य देशांच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांना चकवा देऊन लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची त्याची क्षमता आहे. हे क्षपणास्त्र पुढील वर्षी चीनच्या सेनादलांच्या ताफ्यात दा खल होण्याची शक्यता असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
 4. चीनच्या ताफ्यात यापूर्वीच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असून अत्याधुनिक डाँगफेंग-४१ हे क्षेपणास्त्र विकसित करण्याचे काम तेथे १९९० च्या दशकापासून सुरू आहे.
 5. या क्षेपणास्त्राच्या २०१२ पासून सात चाचण्या झाल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात चीनच्या पश्चिमेकडील वाळवंटातून त्याची आठवी चाचणी घेण्यात आली, असे वृत्त 'साऊथ चायना मॉर्निग पोस्ट' या वृत्तपत्राने दिले आहे.
 6. तसेच हे क्षेपणास्त्र 2018 सालापर्यंत चीनच्या सेनादलांच्या ताफ्यात दाखल होईल, असे चीनच्या सकारी मालकीच्या 'ग्लोबल टाइम्स' या वृत्तपत्राने म्हटले आहे.


 1. देशी बनावटीचे पहिले विमान बनविणारे मुंबईचे अमोल यादव यांच्या टीएसी 003 या विमानाची अखेर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने नोंदणी केली असून तसे प्रमाणपत्रही दिले. त्यामुळे यादव यांचे विमान निर्मितीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
 2. वैमानिक अमोल यादव यांनी चारकोप येथील घराच्या गच्चीवर २०११ मध्ये विमान बनविले. मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहात ते प्रदर्शित केले. यादव हे थ्रस्ट इंडिया या त्यांच्या कंपनीमार्फत महाराष्ट्रात विमानांची निर्मिती करणारा उद्योग उभारतील.
 3. भारतीय बनावटीचे विमान बनविण्याचा त्यांचा संकल्प पाहता राज्य सरकारने त्यांच्या कंपनीस सहकार्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १९ आसनी विमान बनविण्यासाठी जमीन देण्याचेही राज्य सरकारने मान्य केले आहे


Top