MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावरचा कसोटी सामना हा संस्मरणीय ठरणार आहे.

2. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला भारतीय गोलंदाजांनी 106 धावांवर माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या दिवसाच्या खेळात 32 वी धाव काढत
अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

3. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने 5 हजार धावा काढणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

4. तसेच त्याने 86 डावांमध्ये ही कामगिरी करत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडला आहे. रिकी पाँटींगने 97 डावांमध्ये याआधी अशी कामगिरी करुन दाखवली होती.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे.

2. 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.

3. आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी, 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल.

4. याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. जे. लांबा (1996, अटलांटा) यांनी ऑलिम्पिक अश्वारोहमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

5. ऑगस्ट महिन्यात अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या फवादने सहा पात्रता प्रकारांमध्ये एकूण 64 गुण कमावले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. एकवीस वर्षीय मंयक प्रताप सिंह हा तरुण विधी सेवा परीक्षा 2018 उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे तो आता देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कोर्टाचे कामकाज पाहणार आहे.

2. तर 21 व्या वर्षीच तो आता कोर्टात निकाल सुनावणार आहे. या अभुतपूर्व यशासाठी त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

3. तसेच मयंकने सन 2014 मध्ये राजस्थान विद्यापीठातून पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. त्याचा हा कोर्स याच वर्षी पूर्ण झाला आहे.

4. सन 2018 पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयाची किमान वयोमर्यादा 23 वर्षे होती. मात्र, 2019 मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा 21 वर्षे केली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट, वन रोड (ओबोर) प्रकल्पाबाबत अमेरिकेने भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. अब्जावधी डॉलरच्या या महाकाय प्रकल्पामागील आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट नसल्यामुळे भारताला वाटणारी चिंता रास्तच आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

2. अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विषयक प्रधान उपसहसचिव अॅलिस वेल्स यांनी ही भूमिका मांडली आहे. ‘वुड्रो विल्सन इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्स’ या थिंक टँकसमोर त्या बोलत होत्या.

3. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध करणारा भारत हा एकमेव मोठा देश आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र (सीपीईसी) पाकव्याप्त काश्मीरमधून जाते आणि हा भाग आपला असल्याचे भारताने वारंवार ठणकावून सांगितले आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतामध्ये दररोज सुमारे २५ हजार टनांपेक्षा अधिक प्लास्टिकचा कचरा जमा होतो. त्यापैकी ४० टक्के कचरा गोळाही केला जात नाही. तो रस्ते आथवा अन्यत्र ठिकाणी पडून असतो. या कचऱ्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तरोच्या काळात दिली.

2. केंद्रीय पर्यावर नियंत्रण मंडळाने देशातील ६० मुख्य शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार येथे दररोज ४,०५९ टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो.

  • देशात ४,७७३ नोंदणीकृत प्लास्टिक पुनर्प्रक्रिया केंद्र आहेत.
  • रोज जमा होणाऱ्या एकूण प्लास्टिकच्या कचऱ्याच्या ६० टक्के म्हणजेच १५,३८४ टन कचरा गोळा करून त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यापासून विविध उत्पादने तयार केली जातात.
  • उर्वरित ४० टक्के अर्थात सुमारे १०,५५६ टन कचरा गोळाच केला जात नाही.
  • स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात; २०२२पर्यंत एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा केंद्राचा मानस आहे.
  • २०१६मध्ये केंद्र सरकारने प्लास्टिकच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी नियमावली तयार केली होती.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

2. २०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

3. १८८५: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. 

4. १९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

5. १९५७: नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन.


Top

Whoops, looks like something went wrong.