The announcement of the 2018 Man-Booker Prize

 1. ‘मॅन बुकर 2018’ पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
 2. यावर्षी हे पुरस्कार चार महिला आणि दोन पुरुष लेखकांना दिले जाणार आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत -
  1. ‘एव्रीथींग अन्डर’ पुस्तक - 27 वर्षीय डेझी जॉन्सन (ब्रिटन), सर्वात कमी वयाची/चा बूकर विजेता
  2. ‘मिल्कमॅन’ – अॅना बर्न्स (अमेरिका)
  3. ‘द लॉन्ग टेक’ - रॉबिन रॉबर्टसन (ब्रिटन)
  4.  ‘द मार्स रूम’ - राहेल कुशनर (अमेरिका)
  5.  ‘द ओवरस्टोरी’ - रिचर्ड पावर्स (अमेरिका)
  6.  ‘वॉशिंग्टन ब्लॅक’ - इजी एज्युग्यन (कॅनडा)
 3. मॅन बुकर पुरस्कार इंग्रजी भाषेत लिहिणार्या कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या लेखकासाठी आणि ब्रिटन व आयर्लंडमध्ये प्रकाशित होणार्या पुस्तकांसाठी खुला आहे.
 4. 1969 साली पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला होता.


ASRajiv appointed Mahabank as president

 1. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या आणि पुण्यात मुख्यालय असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (महाबँक) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ए. एस. राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. सध्या ते इंडियन बँकेत कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.
 3. राजीव यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, ते एक डिसेंबरपासून पदभार हाती घेण्याची शक्यता आहे.
 4. बँक ऑफ महाराष्ट्रसह सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि सीईओंच्या नियुक्त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट मंत्र्यांच्या समितीने बुधवारी जाहीर केल्या.
 5. स्टेट बँकेच्या पाच उपव्यवस्थापकीय संचालकांपैकी मृत्युंजय महापात्रा आणि पद्मजा चंद्रू यांची अनुक्रमे सिंडिकेट बँक आणि इंडियन बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 6. महापात्रा आणि चंद्रू यांचा कालावधी अनुक्रमे ३१ मे २०२० आणि ३१ ऑगस्ट २०२१पर्यंत असणार आहे.
 7. या शिवाय स्टेट बँकेच्या पल्लव मोहपात्रा, जे. पकिरीसामी आणि कर्नाम शेखर या अन्य तीन उपव्यवस्थापकीय संचालकांची अनुक्रमे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक आणि देना बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 8. या तिघांपैकी मोहपात्रा आणि पकिरीसामी यांचा कार्यकाल २८ फेब्रुवारी २०२१ला संपुष्टात येईल, तर शेखर यांचा कार्यकाल ३० जून २०२०ला संपुष्टात येईल.
 9. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेच्या पाच उपव्यवस्थापकीय संचालकांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग अन्य बँकांसाठी करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणातील थकित कर्जांचे प्रमाण कमी करण्यासाठी होईल, या उद्देशाने हा खांदेपालट करण्यात आल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
 10. याशिवाय एस. एस. मल्लिकार्जुन राव यांची तीन वर्षांसाठी अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओपदी नेमणूक करण्यात आली आहे.
 11. त्यांचा कार्यकाल ३१ जानेवारी २०२२ला संपणार आहे.
 12. राव सध्या सिंडिकेट बँकेचे कार्यकारी संचालक आहेत. या शिवाय अतुलकुमार गोयल आणि एस. हरिशंकर यांची अनुक्रमे युको बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 13. गोयल आणि हरिशंकर सध्या युनियन बँक आणि अलाहाबाद बँकेत कार्यकारी संचालकपदी कार्यरत आहेत.
 14. या शिवाय अशोककुमार प्रधान यांची युनायडेड बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या युनायडेड बँकेत कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहे.
बँका नवनियुक्त एमडी
बँक ऑफ महाराष्ट्र ए. एस. राजीव
सिंडिकेट बँक मृत्युंजय महापात्रा
इंडियन बँक पद्मजा चंद्रू
सेंट्रल बँक ऑफ इंडिया पल्लव मोहपात्रा
आंध्र बँक जे. पकिरीसामी
देना बँक कर्नाम शेखर
अलाहाबाद बँक मल्लिकार्जुन राव
युको बँक अतुलकुमार गोयल
पंजाब अँड सिंध बँक एस. हरिशंकर

युनायडेड बँक

अशोककुमार प्रधान


prahaar-short-range-missile-successfully-test-fired-by-india

 1. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच 'डीआरडीओ'ने प्रहार या बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी केली.
 2. ओडिशा येथील बालासोर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथून ही चाचणी घेण्यात आली.
 3. याबाबतची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली. गुरुवारी दुपारी ही चाचणी घेण्यात आली.
 4. प्रहार एकाच वेळी विविध टार्गेटला नेस्तनाबुत करू शकते. तसेच उन्हाळा,पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये लक्ष भेदू शकते.
 5. मोबाईल लॉन्चरद्वारे या मिसाईला लॉन्च करण्यात आले असून याची मारक क्षमता १५० किमी आहे.
 6. मिसाईलची लांबी ७.३२ मीटर असून तिचा व्यास ४२० मिलीमीटर आहे. मिसाईलचे वजन १.२८ तर ही मिसाईल २०० किलो वजन वाहून नेऊ शकते.
 7. प्रहारच्या चाचणीवेळी सेना प्रमुख जनरल बिपिन रावत,तीश रेड डीआरडीओ प्रमुख डॉ. जी स्डी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


'Land of Gandhi' in Incredible India

 1. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाणार आहे.
 2. या निम्मिताने ‘गांधींची भूमी’ या शब्दाचा अतुल्य भारतच्या लोगोमध्ये समावेश करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पर्यटन मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 3. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०१८ ते ३० मार्च २०१९ दरम्यान भारतासह संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार आहे.
 4. त्यामुळे सरकारने सर्व मंत्रालयाला याबाबत एक कार्यक्रम सूची तयार करायला सांगितले होते.
 5. याचाच भाग म्हणून ‘गांधींची भूमी’ या शब्दाचा समावेश पर्यटन मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम असलेल्या अतुल्य भारतच्या लोगोमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.
 6. वर्मा यांनी याबाबत म्हटले की, "महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रमांची आम्ही योजना आखली आहे.
 7. अतुल्य भारतच्या लोगोमध्ये लवकरच ‘गांधींची भूमी’ या शब्दाचा समावेश करणार आहोत.
 8. तसेच हा लोगो पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे."


Launch of 'Aasara' Mobile App

 1. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या 'आसरा' (AASRA) या मोबाईल ॲपचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
 2. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली.
 3. ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीतमध्ये या ॲपचे सादरीकरण करण्यात आले होते.
 4. या अॅपमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिक पारदर्शी आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
 5. 'आसरा' हे ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असणार असून या ॲपद्वारे विविध सोयी सुविधा आणि योजनांची माहिती मिळणार आहे. यामुळे प्रत्येक सामान्य व्यक्तीला या ॲपचा लाभ होणार आहे.
 6. त्याचबरोबर सामान्य झोपडीधारक आपली झोपडी व झोपडपट्टीसंबंधित झोपडी क्रमांक, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, स्लम क्लस्टर २०१६ आदी माहिती ॲपद्वारे घेऊ शकतील.


Top