C-Vision 2019: Study of the largest coastal protection practice of the Indian Navy so far

 1. भारतीय सागरी किनारपट्टीला संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने, "26/11"च्या हल्ल्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी, दिनांक 22 जानेवारी 2019 रोजी भारतीय नौदलाने ‘सी व्हिजील 2019’ (SEA VIGIL) नावाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तटीय संरक्षण सराव अभ्यासाला सुरुवात केली.
 2. सर्व समुद्री भागधारक, कोळी आणि तटीय समुदाय यांच्या सहकार्याने भारताला लाभलेली 7516.6 किलोमीटरची संपूर्ण किनारपट्टी आणि भारताचे विशिष्ट आर्थिक क्षेत्र तसेच 13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.
 3. या सरावादरम्यान भारतीय विकास क्षेत्र आणि लागून असलेल्या बेटांच्या सुरक्षिततेबाबत सागरी पाळत व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सागरी पोलीसांच्या समर्थनाने भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल एकत्र येवून हा कार्यक्रम चालवत आहेत.


Tata Mumbai Marathon 2019: Workhites Alemu and Cosmos Lagaat win title

 1. ‘इन्सपायर टू बी बेटर’ या संकल्पनेवर 16वी टाटा मुंबई मॅरेथॉन पार पडली. यंदाच्या स्पर्धेत केनिया-इथिओपियाचे धावपटू अव्वल ठरले.
 2. स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे आहे -
  1. पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन - कॉसमस लॅगट (केनिया)
  2. महिलांची पूर्ण मॅरेथॉन - वोर्केश अलेमू (इथिओपिया)
  3. पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन (भारतीय) - नितेंद्रसिंग रावत
  4. महिलांची पूर्ण मॅरेथॉन (भारतीय) - सुधा सिंग
  5. पुरुषांची अर्ध मॅरेथॉन – श्रीनू बुगाथा  
  6. महिलांची अर्ध मॅरेथॉन – मीनू
 3. स्पर्धेविषयी -
  1. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही मुंबई मॅरेथॉनची प्रायोजक आहे.
  2. ही दरवर्षी जानेवारीच्या तिसर्‍या रविवारी मुंबईत आयोजित केली जाणारी वार्षिक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आहे.
  3. 2004 साली पहिला कार्यक्रम आयोजित केला गेला.
  4. यात पूर्ण मॅरेथॉन (42.195 किमी), अर्ध मॅरेथॉन (21.097 किमी), ड्रीम रन (6 किमी), ज्येष्ठ नागरिक (4.3 किमी), दिव्यांग (2.4 किमी) आणि टाइम्ड 10K अश्या विविध गटांमध्ये विजेता घोषित केला जातो.
  5. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन्स (IAAF) याने ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ला ‘गोल्ड लेबल’ हा दर्जा प्रदान केला आहे.
  6. 16वी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ ही देशातली एकमेव ‘गोल्ड लेबल’ मॅरेथॉन ठरली.
  7. मुंबई मॅरेथॉनच्या पुरस्कारांची एकूण रक्कम $4,05,000 आहे, ज्यामध्ये पूर्ण मॅरेथॉन जिंकणार्‍या इंटरनॅशनल धावकाला $45000, जेव्हा की भारतीय धावकाला 5 लक्ष रुपयांची बक्षिसाची रक्कम ठेवली आहे.


Rail security force deployed for women safety in Guwahati

 1. आसामच्या गुवाहाटी शहरात भारतीय रेल्वेच्या 'जोयमती बहीणी' या महिला सुरक्षा दलाच्या नव्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
 2. गुवाहाटीच्या कामाख्या रेल्वे स्थानकावर एका कार्यक्रमात या पथकाचे औपचारिकपणे उद्घाटन करण्यात आले. 
 3. आसाममध्ये लुमदिंग विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने ईशान्य क्षेत्रातल्या रेल्वेच्या परिसरात आणि गाड्यांमध्ये महिलांची सुरक्षा बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हे पथक तयार केले.


ICC Cricket Awards 2018

 1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘ICC क्रिकेट पुरस्कार 2018’ या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे.
 2. त्यात भारताचा विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासात पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने सर्वोच्च तीन पुरस्कार पटकावले आहेत.
 3. ते म्हणजे –
 4. ICC वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू (सर गारफील्ड सोबर्स चषक)
 5. ICC वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी खेळाडू
 6. ICC वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू
 7. यासोबतच, ICC पुरस्कारांमध्ये ‘क्लीन स्वीप’ प्राप्त करणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू ठरला.
 8. शिवाय ICC कसोटी संघ व ICC एकदिवसीय (ODI) संघाचा कर्णधार म्हणूनही त्याची निवड करण्यात आली आहे.
 9. इतर पुरस्कारांचे विजेते-
  1. ICCचा वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू - ऋषभ पंत (भारत)
  2. फॅन्स मोमेंट ऑफ द इयर – भारत (19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला म्हणून)
  3. वर्षातील सर्वोत्तम पंच - कुमार धर्मसेना (श्रीलंका)
  4. ICC खिलाडूवृत्तीचा पुरस्कार - केन विल्यम्सन (न्यूझीलँड)
  5. ICC वर्षातील सर्वोत्तम टी-20I कामगिरी - एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) (जुलै 2018 मध्ये हरारे येथे झिंबाब्वेविरुद्ध केलेल्या 172 धावांसाठी)
 10. ICC वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ (फलंदाजी क्रमानुसार) - टॉम लॅथम (न्यूझीलँड), दिमुथ करुणारत्ने (लंका), केन विल्यम्सन (न्यूझीलँड), विराट कोहली-कर्णधार (भारत), हेन्री निकोल्स (न्यूझीलँड), ऋषभ पंत-यष्टीरक्षक (भारत), जेसॉन होल्डर (विंडीज), कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया), जसप्रीत बुमराह (भारत), मोहम्मद अब्बास (पाकिस्तान).
 11. ICC वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ (फलंदाजी क्रमानुसार) - रोहित शर्मा (भारत), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), विराट कोहली-कर्णधार (भारत), जो रुट (इंग्लंड), रॉस टेलर (न्यूझीलँड), जोस बटलर-यष्टीरक्षक (इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), मुस्तफिजूर रहमान (बांग्लादेश), रशीद खान (अफगाणिस्तान), कुलदीप यादव (भारत), जसप्रीत बुमराह (भारत).
 12. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) 
  1. हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन मंडळ आहे.
  2. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती.
  3. सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
  4. ICC चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या दुबई शहरात आहे. 
  5. ICC मध्ये 105 सदस्य संघ आहेत आणि त्यात 12 पूर्ण सदस्य आहेत, जे कसोटी सामने खेळतात.


India and Mauritius agree to an important partnership in different areas

 1. 20-28 जानेवारी या काळात मॉरिशस देशाचे पंतप्रधान प्रावीण जुगनौथ भारताच्या अधिकृत भेटीवर आले आहेत. त्यांच्यासोबत 350 लोकांचे प्रतिनिधीमंडळ देखील आहे.
 2. वाराणसीमध्ये झालेल्या द्वैपक्षीय बैठकीनंतर, दोन्ही देशांमध्ये द्वैपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी आरोग्य सेवा, आपत्तीचे व्यवस्थापन व ऊर्जा अश्या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण भागीदारी प्रकल्पांसाठीच्या नवीन प्रस्तावांवर सहमती देण्यात आली.
 3. नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढविण्यासाठी मार्गांविषयी देखील चर्चा झाली.
 4. याव्यतिरिक्त, दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी मुंबईत पंतप्रधान प्रावीण जुगनौथ यांच्या हस्ते ‘स्टेट बँक ऑफ मॉरीशस (SBM)’ याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीचे उद्घाटन केले गेले.
 5. स्टेट बँक ऑफ मॉरीशस ही परदेशी बँकेच्या शाखा म्हणून त्याऐवजी होल्ली ओन्ड सब्सिडरी (WOS) पद्धतीच्या माध्यमातून भारतात सार्वभौमिक बँकिंग व्यवसाय स्थापित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवाना प्राप्त करणारी पहिली परदेशी बँक ठरली आहे.
 6. मॉरीशस आफ्रिका खंडाच्या तटावरील दक्षिण-पूर्व क्षेत्रातला एक बेट राष्ट्र आहे.
 7. पोर्ट लुईस हे राजधानी शहर आहे आणि मॉरीशस रुपया हे चलन आहे.


Top