IRCTC ने खानपानसंबंधी नवीन धोरण जाहीर

 1. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने ट्रेनवरील सुरू असलेल्या खानपान सेवेला मोकळीक देत नवीन खानपान धोरण तयार केले आहे. म्हणजेच या धोरणामधून अन्नाचे वितरण आणि स्वयंपाक या दोन्ही व्यवस्थांना वेगळे करण्याची प्रक्रिया तयार करण्यात आली आहे.
 2. नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) ने प्रकाशित अहवालात स्थानकावर आणि ट्रेनमध्ये पुरवल्या जाणार्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर टीका केली होती.
 3. त्यांच्यानुसार ट्रेनमध्ये पुरविले जाणारे अन्न खान्यालायक नाही आणि ट्रेनमधील खानपानसंबंधी व्यवस्थेकडून पाळले जाणारे स्वच्छता मानक हे अगदी खालच्या दर्जाचे आहेत.

धोरणामधील मुख्य बाबी:-

 1. धोरणानुसार, IRCTC सर्व चलित उद्योगांवर खानपान सेवांचे व्यवस्थापन करेल आणि पेंट्री कारसंबंधी कंत्राट देखील रेल्वेच्या खानपान विभागाकडे पुनः सोपविण्यात येईल.
 2. IRCTC नविन स्वयंपाकघर स्थापन करणार आणि विद्यमान स्वयंपाकघरांना अद्ययावत सोयीसुविधांनी विकसित करणार.
 3. फूड प्लाझा, फूड कोर्ट्स, फास्ट फूड केंद्रांच्या व्यवस्थापनासाठी IRCTC जबाबदार असेल.
 4. प्रवाशांकडून नियमितपणे अभिप्राय घेतले जातील आणि विक्रेत्यास दिलेल्या देयकासंबंधी कार्यवाहीला जोडणे अनिवार्य असेल.
 5. IRCTC ला खाजगी परवानाधारकांना खानपान सेवांच्या तरतुदीसाठी परवाना देण्यास किंवा नियुक्त करण्याचा अधिकार नसणार आहे.
 6. दररोज दोन कोटीहून अधिक प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात आणि रेल्वे दररोज जवळपास 11 लाख प्रवाशांना भोजन पुरवते, त्यापैकी 10 लाख लोकांना जागेवर जेवण दिले जाते.


ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन

 1. आकाशगंगा, भालू, आम्ही जातो अमुच्या गावा, प्रेमासाठी वाट्टेल ते अशा मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे १९ जुलै रोजी निधन झाले.
 2. साठ व सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांतून उमा भेंडे यांनी संस्मरणीय भूमिका केल्या.
 3. त्यांनी तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते.
 4. कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
 5. त्यांची आई रमादेवी कोल्हापूरला प्रभात कंपनीत काम करत असे, तर वडील श्रीकृष्ण साक्रीकर अत्रे यांच्या कंपनीत होते.
 6. लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिले होते. त्यांचे मूळ नाव अनसुया साक्रीकर होते.
 7. त्यांनी मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरतनाट्यमचे शिक्षणही घेतले होते.
 8. त्यांनी स्वत:ची श्री प्रसाद चित्र ही संस्था सुरू करून चित्रनिर्मिती केली.
 9. भालू, चटकचांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार हे चित्रपट त्यांनी बनविले.
 10. त्यांनी भालजी पेंढारकर, वसंत जोगळेकर, राजदत्त, माधवराव शिंदे, कमलाकर तोरणे, मुरलीधर कापडी, हिंदीत सत्येन बोस अशा अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केले.
 11. ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
 12. २०१२ साली उमा भेंडे यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


पेनसिल्व्हेनियात जगातले पहिले बालकाच्या हातांचे प्रत्यारोपण यशस्वी

 1. ‘द लॅन्सेट चाईल्ड अँड अॅडोलसेंट हेल्थ’ पत्रिकेमधील अहवालानुसार, जुलै 2015 मध्ये झालेल्या दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर 18 महिन्यांनंतर 10 वर्षीय झीयोन हार्वे हा मुलगा स्वतः लिहू, जेवू आणि आपले कपडे परिधान करू शकतो आहे.
 2. पेनसिल्व्हेनियातील ‘चिल्ड्रन्स हॉस्पिटल ऑफ फिलाडेल्फिया’ येथे ही शस्त्रक्रिया झाली होती.

शस्त्रक्रियेनंतरचा घटनाक्रम:-

 1. चौथ्या व सातव्या महिन्यांमध्ये आठवेळा शरीराने प्रत्यारोपण नाकारले होते. मात्र शरीराला प्रत्यारोपणाला नकारण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी इम्युनोसप्रेशन औषधे देण्यात आली.
 2. य उपचारादरम्यान हार्वेला चार इम्युनोसप्रेशन औषधे आणि स्टिरॉइड देण्यात आली. या औषधांमुळे मधुमेह, कर्करोग आणि संसर्ग अश्या रोगांचा धोका असतो.
 3. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांत हार्वेला असे आढळून आले की तो बोट हलवू शकतो. मज्जातंतुंच्या निर्मितीमुळे हाताचे स्नायू हलवू शकण्यास तो सक्षम ठरला आणि सुमारे सहा महिन्यांतच त्याला स्पर्श जाणवू लागला.
 4. आठ महिन्यांनंतर, हार्वे कात्री वापरत होता आणि क्रेयॉनने चित्र काढत होता.
 5. एका वर्षाच्या आत, तो दोन्ही हात वापरून बेसबॉलची बॅट फिरवू शकला.
 6. मनोचिकित्सक आणि सामाजिक कार्यकर्त्याबरोबर नियमित प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जात होते.


गोळाफेकपटू मनप्रीत कौर उत्तेजक सेवन चाचणीत दोषी

 1. भारताची आघाडीची गोळाफेकपटू मनप्रीत कौर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था म्हणजेच ‘नाडा’ने केलेल्या उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळलेली आहे.
 2. आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चीनमध्ये मनप्रीत कौरच्या लघवीचे नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले होते.
 3. या तपासणीत स्टिम्युलेंट डायमिथाईल ब्युटाईल अमाईन या उत्तेजकाचे नमुने सापडल्याचे समोर आले आहे.
 4. मनप्रीतच्या पटियाला येथील हॉस्टेलवर धाड टाकली असतानाही नाडाच्या अधिकाऱ्यांना याच उत्तेजकांचे नमुने आढळले होते.
 5. सलग दुसऱ्या चाचणीत मनप्रीत दोषी आढळल्याने मनप्रीतवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
 6. पुढील चौकशी होईपर्यंत मनप्रीतला लंडन येथे होणाऱ्या आगामी वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघातूनही वगळ्यात आले आहे.
 7. नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत मनप्रीत कौरने गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.
 8. उत्तेजक सेवन प्रकरणात आता मनप्रीत कौरची चौकशी करण्यात येणार आहे, त्यात मनप्रीतला आपलं निर्दोषत्व सिद्ध करावे लागणार आहे. असे न झाल्यास मनप्रीत कौरचे सुवर्णपदकही काढून घेण्यात येईल.
 9. मनप्रीतने चीनमध्ये झालेल्या आशियाई ग्रॅण्डप्रिक्समध्ये १८.८६ मीटर गोळाफेक करीत लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपसाठी पात्रता सिद्ध केली होती.


Top