1. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली येथील स्पेशल सेंटर फॉर मॉलेक्युलर मेडिसिनच्या संशोधकांच्या चमूने क्षयरोगाच्या जीवाणूला मारण्यासाठी एक नवीनच मार्ग शोधून काढला आहे.
  2. खरेतर, “बेर्जेनिन” चा वापर करून ६० दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी उंदराच्या फुफ्फुसांमधील क्षयरोगाच्या जीवाणूंमध्ये १०० पटीची कमतरता आढळून आली आहे.“बेर्जेनिन” हे सखुआ किंवा शाला (शोरे रोबस्टा) झाडाच्या पानापासून मिळणारा फायटोकेमिकल आहे.
  3. क्षयरोगासाठी वापरण्यात येणार्या पारंपरिक प्रतिजैविक औषधांच्या विपरीत, “बेर्जेनिन” संयुग मॅक्रोफॅगेस (पांढरी रक्त पेशी) यामध्ये आढळणार्या जीवाणूंना मारण्यासाठी रोगप्रतिकारक प्रणालीला नियंत्रित करते.अभ्यासाचे परिणाम जर्नल फ्रंटियर इन सेल्युलर आणि इन्फेक्शन मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
  4. “बेर्जेनिन” संयुग हे क्षयरोगाच्या जिवाणूला थेट नष्ट करु शकले नाही. मात्र, इन-विट्रो तंत्रज्ञान अभ्यासाच्या बाबतीत, संक्रमित पेशींमध्ये आढळणार्या जीवाणूला मारण्यास “बेर्जेनिन” सक्षम होते.
  5. इन-विट्रो अभ्यासात, उंदरामध्ये हे संयुग केवळ मॅक्रोफॅजेसच नव्हे तर इतर पेशी (T पेशी) सक्रिय केल्या, ज्यामुळे जीवाणू अधिक प्रभावीपणे मारली गेलीत.संयुगाने उपचार केलेल्या जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रॅन्युलॅमिक लेशनच्या संख्येत प्रभावी कमतरता आढळून आली.


  1. अमेरिकेच्या नासा या संस्थेने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शोधून काढलेल्या एका नव्या जीवाणूला दिवंगत माजी राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत हा जीवाणू हा फक्त आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातच आढळला असून त्याचे पृथ्वीवर अस्तित्व नाही.
  2. जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या संशोधकांनी म्हटले होते, की आंतरग्रहीय पातळीवर फिरणाऱ्या एका अवकाशयानात म्हणजेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात फिल्टरमध्ये हा जीवाणू सापडला होता. त्याचे नाव सोलिबॅसिलस कलामी असे ठेवण्यात आले आहे. त्यात भारतीय वैज्ञानिक कलाम यांच्या स्मृती जागत्या ठेवण्यात आल्या आहेत. कलाम यांनी केरळात थुंबा येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र सुरू करण्याच्या कामात सहभागी होण्याच्या आधी नासात १९६३ मध्ये प्रशिक्षण घेतले होते. सॉलिबॅसिलस हे प्रजाती नाव असून हा स्पोअर निर्माण करणारा जीवाणू आहे, असे जेपीएलचे वैज्ञानिक डॉ. कस्तुरी व्यंकटेश्वरन यांनी सांगितले.
  3. अवकाश स्थानकाच्या ज्या फिल्टरवर हा जीवाणू सापडला तो फिल्टर ४० महिन्यांपासून तेथे आहे. तो हाय एफिशियन्सी पार्टक्यिुलेट अरेस्टन्स फिल्टर म्हणजे एइपीए फिल्टर आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात स्वच्छता ठेवण्यासाठी फिल्टर वापरले जातात. फिल्टरचे विश्लेषण केल्यानंततर व्यंकटेश्वरन यांनी इंटरनॅशनल जर्नल ऑफ सिस्टीमॅटिक अँड इव्होल्यूशनरी मायक्रोबायोलॉजी या नियतकालिकात शोधनिबंध लिहून नवीन जीवाणूचा शोध जाहीर केला होता.
  4. व्यंकटेश्वरन यांच्या मते अवकाश स्थानक पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवरून भ्रमण करीत असले, तरी तेथे अनेक जीवाणू, बुरशी आहेत. ते अवकाशस्थानकात अवकाशवीरांबरोबर राहतात. व्यंकटेश्वरन यांनी सांगितले, की सोलिबॅसिलस कलामी हा जीवाणू पृथ्वीवर आढळलेला नाही, त्यामुळे तो बाहेरील ग्रहावरचा असावा असे मानले जाते. हा जीवाणू अवकाश स्थानकातील प्रतिकूल स्थितीत टिकून आहे. व्यंकटेश्वरन व त्यांच्या चमूने त्या जीवाणूला त्यांच्याच राज्यातील वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव दिले कारण कलाम यांनी अवकाश क्षेत्रात दिलेले योगदानही मोठे होते.
  5. विश्वात आपण एकटेच आहोत का, असा प्रश्न विचारणाऱ्या गटाचे व्यंकटेश्वरन हे पुरस्कत्रे आहेत. मार्स क्युरिअसिटी रोव्हर ही बग्गीसारखी गाडी सोडण्यात आली, तेव्हा ती पूर्णपणे र्निजतुक करण्याची जबाबदारी व्यंकटेश्वरन यांच्यावर होती. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पृथ्वीवरचे विषाणू व जीवाणू मंगळ किंवा इतर ग्रहांवर जाऊ नयेत यासाठी काळजी घेणे आवश्यक असतेच शिवाय तसे केल्याने पृथ्वीशिवाय वेगळे जीवाणू कुठले आहेत हे नंतर समजत असते.


Top