1. जागतिक बँकने “फेअर प्रोग्रेस? एज्यूकेशनल मोबिलिटी अराऊंड द वर्ल्ड” या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या अहवालाच्या माहितीवरून, पिढ्यानपिढ्या चालत आलेले दारिद्र्य चक्र तोडण्यासाठी कृतीची आवश्यकता आहे, असा सल्ला दिला आहे.  
 2. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, 1960 सालापासून गरीबी आणि असमानता यामधील तफावत कमी करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यास महत्त्वपूर्ण असलेल्या क्षेत्रांमधील प्रगतीचा अभाव आहे.

अहवालामधील ठळक मुद्दे:-

 1. शिक्षणामध्ये पिढ्यानपिढ्या झालेली वाढ गेल्या अर्ध-शतकापासून प्रतीक्षेत आहे. 1980 च्या दशकात सरासरी विकसनशील अर्थव्यवस्थेत जन्मलेली सुमारे अर्धी लोकसंख्येला आपल्या पालकांपेक्षा अधिक शिक्षण मिळालेले आहे, जे असे दर्शवते की 1960 च्या दशकात जन्माला आलेल्यांच्या तुलनेत काहीही सुधारणा नाही. 
 2. अहवालात असे नमूद केले गेले आहे की, जर जग आपल्या मुलांमध्ये गुंतवणूकीचे मार्ग बदलणार नाहीत, विशेषत: कमी सुखवस्तू कौटुंबिक पार्श्वभूमीतून येणारे लोक, तर आतापासून केले जाणारे मूल्यांकन 10 वर्षांनंतर भिन्न असेल आणि त्यावेळी 2030 सालापर्यंत अत्यंत दारिद्र्य मिटवणे हे आणखी मोठे आव्हान होईल.
 3. उच्च गतिशीलतेचे कमी पातळी विकसनशील देशांमध्ये, विशेषतः उप-सहारा आफ्रिकामध्ये, विशेषत: स्पष्ट झालेली आहे. उदाहरणार्थ, काही उप-सहारा आफ्रिकन अर्थव्यवस्थांमधील आजच्या (तुलनेने 1980 च्या दशकात जन्मलेले) तरुण प्रौढांमध्ये केवळ 12% लोकांचे शिक्षण त्यांच्या पालकांपेक्षा अधिक आहे, जेव्हा की पूर्व आशियातील काही भागात याच गटात हे प्रमाण 80% पेक्षा जास्त आहे.
 4. सर्व 15 अर्थव्यवस्था, जेथे लोकांच्या शिक्षणाचा स्तर त्यांच्या पालकांच्या शैक्षणिक स्तराशी मेळ खातो, त्या विकसित अर्थव्यवस्था आहेत.
 5. सुरुवातीच्या वर्षांमधील पूर्व बालपण विकास, शिक्षणास प्रवेश आणि गुणवत्ता, माता व बाल आरोग्य, पोषण, पायाभूत सुविधा, पाणी व स्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या सेवांमध्ये गुंतवणूक ही गतिशीलता सुधारण्यासाठी आणि मनुष्यबळाला उभारण्यासाठी महत्वपूर्ण आहे. 
 6. पैश्याच्या अभावापायी दारिद्रयात राहणारे लोक आवश्यक पावले उचलण्यास सक्षम नसतात. त्यामुळे धोरणे आणि कार्यक्रमांमधून विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्यांना चांगल्या प्रकारे सेवा पोहोचविण्यासाठी त्यांना अंतर्भूत करणे महत्त्वाचे आहे.
 7. लोकांच्या आसपास असणारे वातावरण देखील एखाद्या व्यक्तीच्या पालकांची सामाजिक स्थितीत प्रभाव टाकू शकतो.  स्थानिक स्तरावर कृती आवश्यक आहे. चांगल्या वातावरणामुळे मुलांची शिकण्याची, वाढण्याची आणि भरभराटीची क्षमता वाढू शकते. 


 1. विजयी पक्ष - जपानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान शिन्जो आबे यांच्या सत्तारूढ युतीचा विजय झाला आहे.
 2. या विजयासोबतच आबे यांना जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवलेले नेते म्हणून हा मान मिळू शकतो.
 3. आबे यांच्या लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षासह असलेल्या युतीने संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील 465 जागांपैकी दोन तृतीयांश जागांनी बहुमताने आपली आघाडी राखली.
 4. हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव या सभागृहात चार वर्षासाठी सदस्यांची निवड करण्यासाठी जपानमधील ही 48 वी सार्वत्रिक निवडणूक होती.
 5. जपान हा आशिया खंडातला चार मोठ्या आणि अनेक छोट्या बेटांचा एक समूह देश आहे.
 6. ही बेटे प्रशांत महासागर प्रदेशात आहेत.
 7. या देशात बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे.
 8. या देशाची राजधानी टोकियो शहर असून या देशाचे चलन  जापानी येन हे आहे.


 1. संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या युनेस्कोच्या महासंचालक पदावर फ्रान्सच्या माजी सांस्कृतिक ऑड्री आझूले यांची नियुक्ती झाली आहे.
 2. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत, आझूले यांनी अंतिम टप्प्यात कतारचे उमेदवार हमाद बिन अब्दुल अझीझ अल कवारी यांचा ३० विरुद्ध २८ अशा केवळ दोन मतांनी पराभव केला.
 3. युनेस्कोच्या विद्यमान महासंचालक आयरिना बोकोव्हा (बल्गेरिया) यांच्याकडून  ऑड्री आझूले पदभार स्वीकारतील.
 4. २००९पासून युनेस्कोच्या महासंचालक आयरिना बोकोव्हा यांना त्यांच्या कारकिर्दीत आर्थिक संकटे तसेच  पॅलेस्टाइनला युनेस्कोचे दिलेले पूर्ण सदस्यत्व यामुळे टीकेला सामोरे जावे लागले.
 5. तसेच युनेस्को इस्राईलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत अमेरिकेने १३ ऑक्टोबर २०१७ रोजी युनेस्कोतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

 ऑड्री आझूले:- 

 1. पॅरिसमध्ये जन्मलेल्या आणि डाव्या विचारांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढलेल्या ऑड्री आझूले या युनेस्कोचे प्रमुखपद भूषवणाऱ्या पहिल्या ज्यू आहेत.
 2. तसेच रेने महेऊ (युनेस्को महासंचालक १९६१-७४) यांच्यानंतर युनेस्कोच्या महासंचालक पदावर नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या फ्रेंच नागरि   आहेत. 
 3. त्यांचे वडील अँड्रे हे मोराक्कोचे राजे मोहम्मद यांचे सल्लागार होते. त्यांच्या आई कटिया बरामी या लेखिका असून मोरक्कन आहेत.
 4. फ्रान्समधील प्रसिद्ध अशा  ‘ईएनए’ विद्यापीठातून त्या विशेष प्रावीण्याने पदवीधर झाल्या. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमध्ये त्यांनी काम केले आहे.
 5. फ्रान्सच्या चित्रपट उद्योगातील प्रमुख अशा सीएनसी (नॅशनल सेंटर फॉर सिनेमा अँड दि मूव्हिंग इमेज)  च्या अर्थ वि क संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 
 6. समाजवादी विचारांचे फ्रान्सिस्को ओलांद हे फ्रान्सचे अध्यक्ष असताना आझूले यांनी  सांस्कृतिक मंत्रालयाची जबाब दारी सांभा ळली आहे.
 7. कलाकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे तसेच फ्रान्समधील ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण व्हावे यासाठी आझूले यांनी कायदा केला.

 युनेस्को:-

 1. UNESCO :  The United Nations Educational, Scientific and Cultural Organization (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था)
 2. युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे.
 3. तिची स्थापना  ६ नोव्हेंबर १९४५ मध्ये करण्यात आली.
 4. ही संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.
 5. युनेस्कोचे मु ख्यालय पॅरिसमध्ये असून जगभरात ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत.
 6. जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देणारी संस्था म्हणून ती जगाला परिचित आहे.


Top