GI tag for Bihar's 'Shahi Lichi'

 1. बिहारच्या ‘शाही लिची’ला विशिष्ट भौगोलिक संकेतक म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे. शाही लिचीचे उत्पादन मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण्य, वैशाली, समस्तीपूर आणि बेगूसराई जिल्ह्यात घेतले जाते.
 2. ही जीआय नोंदणी लिची ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ बिहारच्या नावावर करण्यात आली आहे. बिहारमध्ये देशातील ४० टक्के लिची उत्पादित केली जाते.
 3. भौगोलिक संकेतक (जीआय)
 4. जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक संकेतक. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
 5. उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी पेटंटची, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक संकेतक (जीआय)ची मान्यता दिली जाते.
 6. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातली उत्पत्ती आणि त्यामुळे विशिष्ट गुणधर्म आणि लौकिक प्राप्त झालेल्या उत्पादनांना जीआय टॅग दिला जातो.
 7. यामुळे उत्पादनाला दर्जा आणि त्या भौगोलिक प्रदेशामुळे निर्माण झालेले वैशिष्ट्य यांची खात्री प्राप्त होते.
 8. एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक संकेतक या नावाने मिळतो.
 9. या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ अथवा वस्तू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
 10. भौगोलिक संकेतक नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
 11. जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक संकेतक नोंदणी कायदा हा एक आहे.
 12. आजवर जगातील १६० देशांनी जीआयला मान्यता दिली आहे. हे संकेतक मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.
 13. २००४मध्ये दार्जीलिंग चहा या उत्पादनातला देशातला पहिला जीआय टॅग मिळाला. भारतात जीआय टॅग मिळालेली एकूण ३२५ उत्पादने आहेत.
 14. एकूण २५ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य आहे.
 15. शेतकरी, विणकर, कारागीर यांना उत्पन्नाची जोड मिळून दुर्गम भागातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांना जीआय उत्पादनामुळे लाभ होऊ शकतो.
 16. पारंपारिक पद्धतीद्वारे आपल्या ग्रामीण कारागीरांकडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आगळे कौशल्य आणि कला येत असते, त्याला प्रोत्साहन देऊन या कलांचे जतनही आवश्यक आहे.
 17. मानांकनाचे फायदे:-
  1. जागतिक बाजारात मुल्यवर्धी.
  2. देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख.
  3. देशांतर्गत बाजारातही योग्य भाव.


ICICI CEO and MD Sandeep Bakshi

 1. भारतीय रिझर्व बँकेने आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदावर संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
 2. ते चंदा कोचर यांची जागा घेतील. व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांनी आपल्या सीईओ व एमडीपदाचा राजीनामा दिला होता.
 3. व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देताना अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी चंदा कोचर यांची बँकेच्या अंतर्गत समितीमार्फत चौकशी होणार आहे.
 4. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण या वादग्रस्त कर्ज प्रक्रियेची चौकशी करणार आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत चंदा कोचर रजेवर असतील.
 5. संदीप बक्षी सध्या आयसीआयसीआय प्रुडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.
 6. बक्षी यांच्या जागी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे सीईओ व एमडी म्हणून बँकेचे कार्यकारी संचालक एन. एस. कन्नन यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
 7. आयसीआयसीआय बँक:-
  1. स्थापना: १९५५
  2. मुख्यालय: मुंबई
  3. आयसीआयसीआय (इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्वेस्टमेंट कारपोरेशन ऑफ इंडिया) हा भारताची बहुराष्ट्रीय बँक आहे.
  4. २०१४मध्ये बाजार भांडवलाच्या आधारे, आयसीआयसीआय बँक देशातील तिसरी सर्वात मोठी बँक होती.
  5. आयसीआयसीआय बँकेच्या एकूण ४४५० शाखा तर १३,९९५ एटीएम आहेत. ही बँक भारतासह १९ देशांमध्ये कार्यरत आहे.
  6. अमेरिका, सिंगापूर, बहरीन, हाँगकाँग, श्रीलंका, कतार, ओमान, चीन आणि दक्षिण अफ्रिका येथे आयसीआयसीआय बँकेच्या शाखा आहेत.


The name of the four Himalayan peaks is named by former Prime Minister Atal Bihari Vajpayee

 1. हिमालयाच्या प्रदेशात गंगोत्री या हिमनदीच्या जवळ असलेल्या चार पर्वतशिखरांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.
 2. हे चार शिखर:-
  1. ‘अटल-1’ - 6,557 मीटर
  2. ‘अटल-2’ - 6,566 मीटर
  3. ‘अटल-3’ - 6,160 मीटर
  4. ‘अटल-4’ - 6,100 मीटर
 3. हिमालय ही आशिया खंडात पसरलेली जगातली सर्वांत उंच पर्वतरांग आहे. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते.
 4. येथे ‘एव्हरेस्ट’ (उंची 8848 मीटर) हे जगातले सर्वोच्च शिखर आहे. ह्या पर्वतरांगेची लांबी 2400 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे.
 5. ही पर्वतरांग भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भुटान या देशांमधून जाते.


olly official mascot for the Hockey World Cup

 1. पुरुष हॉकी विश्वचषक २०१८ स्पर्धेसाठी ओल्ली नावाच्या कासवाची अधिकृत शुभंकर (मॅस्कॉट) म्हणून निवड करण्यात आली आहे.
 2. ऑलिव्ह रिडले कासवाच्या संरक्षणासाठी जागरुकता पसरविणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
 3. ही प्रजाती ओडिशा राज्यात गाहिरमाथा तटावर आढळते आणि ती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
 4. पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या १४व्या आवृत्तीचे आयोजन २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे होणार आहे.
 5. या स्पर्धेत १६ देश सहभागी होतील. कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर येथे ही स्पर्धा आयोजित केली जाईल.
 6. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारे संघ: भारत, इंग्लंड, चीन, मलेशिया, कॅनडा, पाकिस्तान, बेल्जियम, जर्मनी, न्यूझीलंड, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, अर्जेंटिना, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका.


international-silk-fair-begins-in-new-delhi

 1. नवी दिल्लीतील प्रगती मैदानात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति ईरानी यांनी आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे उद्घाटन केले.
 2. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान या ३ दिवसीय मेळाव्याचे आयोजन इंडियन सिल्क एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने केले होते.
 3. या मेळाव्यात देशातील रेशीम उत्पादनांच्या १०८ प्रदर्शकांनी भाग घेतला. या वेगवेगळ्या देशांतील २१८ खरेदीदारांनी देखील भाग घेतला.
 4. पार्श्वभूमी:-
  1. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रेशीम उत्पादक देश आहे. तर चीन जगातील सर्वात मोठ्या रेशीम उत्पादक देश आहे.
  2. रेशीम कृषी आधारित उद्योग आहे. रेशीम उद्योगामुळे देशभरात सुमारे ८० लाख कारागीर आणि विणकरांना ग्रामीण भागांमध्ये रोजगार प्राप्त होतो.
  3. भारतात मलबेरी, एरी, तसर आणि मुगा या ४ प्रमुख रेशीम प्रकारांचे उत्पादन घेतले जाते. एकूण रेशीम उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन मलबेरी रेशीमचे घेतले जाते.
  4. मलबेरी रेशीमचे उत्पादन मुखत्वे दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये घेतले जाते.
  5. भारतात एकूण रेशीम उत्पादनापैकी ९७ टक्के उत्पादन कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडु, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर या फक्त ५ राज्यांमध्ये होते.


Top