LALIT ACADEMY AWARDS

 1. ललित कला अकादमीच्या 60व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील 15 कलावंतांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, सचिन चौधरी, डगलस जॉन, जीतेंद्र सुतार यांचा समावेश आहे.

 2. या पुरस्कारांचे वितरण मुंबईत होणार आहे. ललित कला अकादमी हे प्रतिभावंत कलाकार व कलांचा गौरव करणारे व त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारे व्यासपीठही आहे.

 3. कला मेळ्यातील प्रदर्शनासाठी कलाकृतींची निवड करणाऱ्या समितीत, तज्ज्ञ, समीक्षक व ज्येष्ठ कलावंतांचा समावेश होता.

 4. तसेच भगवान चव्हाण, जयप्रकाश जगताप, जयंत गजेरा, किशोर ठाकूर, मदन लाल, मनीषा राजू व ओपी खरे यांनी कलाकृतींची निवड केली आहे.


NAVY APPOINTMENT

 1. व्हाइस ऍडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. विद्यमान नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा हे 30 मे रोजी निवृत्त होत असूनते करमबीर यांच्याकडे सूत्रे सोपवतील. ही नियुक्ती करताना पारंपरिक सेवा ज्येष्ठतेचा निकष न लावता सद्यपरिस्थितीत आवश्‍यक असलेल्या गुणांच्या जोरावर निवड केल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

 2. व्हाइस ऍडमिरल करमबीरसिंह हे सध्या विशाखापट्टणम येथे नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख आहेत. करमबीर हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) विद्यार्थी आहेत. ते जुलै 1980 मध्ये नौदलात दाखल झाले होते.

 3. 1982 मध्ये नौदलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी चेतक आणि कामोव्ह हेलिकॉप्टरमधून अनेक उड्डाणे केली आहेत. नौदलाचे नेतृत्व करणारे ते कदाचित पहिलेच वैमानिक ठरतील, असे एका नौदल अधिकाऱ्याने सांगितले.

 4. तसेच त्यांना आतापर्यंत उत्कृष्ट सेवेसाठी परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तटरक्षक दलाची नौका चांदबीबी, आयएनएस विजयदुर्ग, आयएनएस राणा आणि आयएनएस दिल्ली या नौकांचे नेतृत्व केले आहे.


BJP APPOINTMENT

 1. ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतीच घोषणा केंद्रीय मंत्री जेपी नड्डायांनी केली आहे.

 2. उमा भारती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवली आहे. 2016 मध्ये उमा भारती यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते. 22 मार्च रोजी याबाबत त्यांनी निर्णय घेतला आहे.

 3. ‘उमा भारती यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना पक्षासाठी काम करायचे आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे’, असे जेपी नड्डा यावेळी म्हणाले.

 4. नवी जबाबदारी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘जर मी लोकसभा निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती’. माझ्या मतदारसंघातील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानतात.

 5. 2016 मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे, पुढील दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार आहे.


DIN VISHESH

 1. 24 मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन‘ म्हणून पाळला जातो.

 2. सन 1855 मध्ये आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

 3. अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच सन 1896 मध्ये रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले.

 4. सन 1923 यावर्षी ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

 5. भारतीय हॉकी खेळाडू ‘एड्रियन डिसूझा‘ यांचा जन्म 24 मार्च 1984 मध्ये झाला


Top