Premanand Gajvi presidents of the Marathi Natya Sammelan

 1. 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे.
 2. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 3. संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावे चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
 4. याची घोषणा 23 नोव्हेंबर रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या तालीम हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली.
 5. 99व्या नाट्य संमेलनाच्या स्थळासाठी परिषदेकडे 12 ठिकाणांहून प्रस्ताव आले.
 6. त्यापैकी नागपूर, लातूर, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा अंतिम टप्प्यात विचार करण्यात आला. वरील ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे.
 7. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल.
 8. संमेलन फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान होईल, अशी माहिती प्रसाद कांबळी यांनी दिली.


Close 60 million mobile SIM cards in India

 1. रिलायन्स जिओच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारतीय एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी किमान किमतीचे प्लान बाजारात आणले आहेत.
 2. यामुळे आता अनेकांना दोन-दोन सिम कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही.
 3. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत अधिकचे सिम कार्ड वापरण्याचा ट्रेंड कमी होण्याची शक्यता आहे.
 4. त्यातून सुमारे 60 दशलक्ष सिम कार्ड बंद होतील, असे दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
 5. ऑगस्ट महिन्यातील मिळालेल्या आकडेवारीनुसार भारतात 1.2 अब्ज मोबाइलचे वापरकर्ते आहेत.
 6. यापैकी केवळ एक सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या 730 ते 750 दशलक्ष इतकी आहे. उरलेल्या ग्राहकांकडे दोन-दोन सिम कार्ड आहेत.
 7. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) महासंचालकराजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, बंद होऊ शकणारे आणि नव्याने दिले जाऊ शकणारे सिम कार्ड यांचा एकत्रित विचार केल्यास आगामी सहा महिन्यांत दूरसंचार कंपन्यांची ग्राहकसंख्या 25 ते 30 दशलक्षांनी कमी होईल, असे मला वाटते.
 8. डेलॉइट इंडियाचे भागीदार हेमंत एम. जोशी यांनी सांगितले की, विविध कंपन्यांच्या प्लानमध्ये असलेला फरक आणि कंपनीकडून दिल्या जाणार्‍या सेवेचा दर्जा यांचा लाभ घेता यावा यासाठी लोक दोन-दोन सिम कार्ड वापरत असतात.
 9. आघाडीच्या तीन मोठ्या कंपन्यांचे दर आणि दर्जा आता समान झाल्यामुळे लोक एकच सिम कार्ड वापरण्यास प्राधान्य देतील, असा अंदाज आहे.


Jeziro Vivara's choice to cast rover on Mars

 1. नासाने 2020 मध्ये मंगळावर रोव्हर गाडी उतरवण्याचे ठरवले असून त्यासाठी 3.6 अब्ज वर्षांपूर्वीच्या जुन्या विवराची जागा निश्चित करण्यात आली आहे.
 2. 19 नोव्हेंबर रोजी याबाबतची घोषण करण्यात आली असून जेथे ही रोव्हर गाडी उतरवली जाणार आहे, त्या विवराचे नाव जेझिरो असे आहे.
 3. पाच वर्षे शोध घेतल्यानंतर मंगळावरील साठ ठिकाणांतून या विवराची निवड रोव्हर गाडी उतरवण्यासाठी करण्यात आली.
 4. जुलै 2020 मध्ये ही रोव्हर गाडी मंगळावर पाठवली जाणार असून त्यासाठी ठिकाण निवडण्यासाठी मंगळ मोहिमेतील चमूने चर्चा केली.
 5. मंगळावर पूर्वी असलेल्या जीवसृष्टीचे पुरावे गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश असून तेथे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व शोधण्यासाठी मातीचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत.
 6. नासा व युरोपीयन स्पेस एजन्सी यांनी मंगळावरील मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याचे निश्चित केले असून त्यासाठी ठिकाण निश्चित केले आहे.
 7. नासाचे मोहीम संचालक थॉमस झुरबुशेन यांनी सांगितले, की जेझिरो विवर हे भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून ते 3.6 अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याने त्याच्या संशोधनातून ग्रहांची निर्मिती व खगोलजीवशास्त्रातील काही बाबींवर प्रकाश पडणार आहे.
 8. एका विशिष्ट ठिकाणचे नमुने गोळा करण्याने मंगळाबाबत विचारात क्रांतिकारक बदल होणार आहे.
 9. जेझिरो विवर हे मंगळाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे इसिडीस प्लॅनिशिया या पठाराच्या पश्चिम कडेला आहे.
 10. इसिडिस भाग हा जुना व मंगळाबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकणारा आहे.


Now the free 'incoming call' will be closed

 1. भारतीय दूरसंचार क्षेत्रात रिलायंस जिओ आल्यापासून बऱ्याच कंपन्या  डबघाईला लागल्या, तर अनेक कंपन्या कशाबशा बाजारात तग धरुन आहेत.
 2. परिणामी अनेक दूरसंचार कंपन्या लवकरच मोबाइल धारकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
 3. जिओने स्वस्त इंटरनेट पॅक उपलब्ध करून दिल्याने आपला ग्राहक वर्ग टिकवण्यासाठी इतर सर्वच कंपन्यांनीही स्वस्त दरात इंटरनेट पॅक उपलब्ध करुन दिले.
 4. जिओने डेटा आणि दरयुद्ध छेडल्यानंतर इतर कंपन्यांनीही कॉल दर कमी केले. पण यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
 5. परिणामी आता या कंपन्यांनी ‘इनकमिंग कॉल’साठी शुल्क आकारण्याची तयारी सुरु केल्याचे समजते.
 6. जिओच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल सारख्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
 7. त्यामुळे ग्राहकांना आता मोफत इनकमिंग कॉल सुविधा न देण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत या कंपन्या आहेत.
 8. सध्या तरी अनेक युजर्स असे आहेत की, फक्त इनकमिंग कॉलसाठी मोबाईल वापरतात.
 9. एके काळी मोबाईल कंपन्या आऊटगोइंगच नव्हे, तर इनकमिंगसाठी शुल्क आकारत होत्या.
 10. आता ग्राहकांना इनकमिंग कॉलसाठी महिन्याला (28 दिवस) 35 रुपयांचा रिचार्ज करावा लागण्याची शक्यता आहे. अन्यथा आउटगोइंगच नव्हे, तर इनकमिंग सेवाही बंद केली जाऊ शकते.


PAN card will now be available without the father's name

 1. सरकारी कागदपत्रांसाठी आपली सर्व माहिती देणे आवश्यक असते. आपली ओळख पटविण्यासाठी आपल्या नावाबरोबरच अडनाव,  आई आणि वडिलांचे नाव आवश्यक असते.
 2. पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असून ते काढण्यासाठीही आपली सर्व माहिती द्यावी लागते. मात्र आता त्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
 3. त्यामुळे आपली ओळख पटवण्यासाठी आता वडिलांच्या नावाचा संदर्भ देण्याची आवश्यकता नाही.
 4. आयकर विभागाने या नव्या नियमाबाबत माहिती दिली असून या नव्या नियमामुळे येत्या काळात ही सर्व प्रक्रिया काही प्रमाणात सोपी होण्याची शक्यता आहे.
 5. ज्यांचे आई-वडिल विभक्त झाले असतील त्यांना पॅनकार्ड काढण्यासाठी काही अडचणी येत असत.
 6. पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव बंधनकारक असल्याने या अडचणींचा सामना करावा लागतो.
 7. या सर्व अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागाने अशा लोकांना पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव देण्याचा नियम शिथिल केला आहे.
 8. तर याअंतर्गत आयकर विभागाने आयकर काद्यातील 114व्या नियमात बदल करत पॅन कार्डसाठी वडिलांऐवजी आईचे नाव देण्यास मान्यता दिली आहे किंवा वडिलांच्या नावाचा संदर्भ देणे बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे.
 9. त्यामुळे अनाथ मुले किंवा इतरही अनेकांचे प्रश्न यामुळे सुटणार आहेत. 
 10. हा नवीन नियम येत्या 5 डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे सिंगल पॅरेंट असणाऱ्यांनाही अडचणी येणार नाहीत.


Top