The first experiment in the state of 'Black Rice' production is successful

 1. पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीची भात शेती कमी उत्पादनामुळे किफायतशीर ठरत नसल्यामुळे कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकांच्या रोवणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील 70 एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
 2. या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या लोंब्या(ओंबी) आल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. संपूर्ण शेत काळ्या लोंब्यांनी बहरले आहे.
 3. सर्वसाधारण पारंपरिक भात:-
  1. पिकापासून12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या'आत्मा'अंतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा,उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा 70 एकरामध्ये हा प्रयोग राबविण्यात आला.
  2. ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगड राज्यातून मागविण्यात आले असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
  3. या उपक्रमासाठी 10 बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव नसल्याचे सिद्ध झाले आहे.
  4. ‘ब्लॅक राईस’चे उत्पादन 110 दिवसात घेतल्या जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य झाले आहे.
  5. शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल,असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
 4. शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढीसाठी आत्मांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.
 5. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा, यासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.
 6. ‘ब्लॅक राईस’च्या भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिलसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.
 7. दैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’(काळे तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे.
 8. फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव Forbidden Rice असे ठेवण्यात आले.
 9. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.
 10. भारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे.
 11. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी10 बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात केली आहे.
 12. यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्तAnthocyanin Antioxident गुणधर्म आहेत.
 13. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’खाणे आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळत आहे.
 14. त्यामुळे ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याची माहिती 'आत्मा'च्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.


Economy of the whole country in the whole state of Maharashtra

 1. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन म्हणजेच CBDTने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी आहे.
 2. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्ली ही दोन राज्ये देशाला आर्धा इनकम टॅक्स देतात.
 3. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (सीबीडीटी)च्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2017-18 मध्येही इनकम टॅक्स कलेक्शनमध्ये पूर्वेकडील राज्यांनीच बाजी मारली आहे.
 4. 2017-18 या आर्थिक वर्षात प्रमुख 5 राज्यांनी दिलेले योगदान (टक्केवारीमध्ये)-
  1. महाराष्ट्र - 38.3%
  2. दिल्ली -13.7%
  3. कर्नाटक - 10.1%
  4. तमिलनाडु - 6.7%
  5. गुजरात - 4.5%
 5. सर्वाधिक आयकर जमा करणारी पूर्वेकडील प्रमुख 5 राज्ये:
  1. मिझोराम - 41%
  2. नागालँड - 32.1%
  3. सिक्किम - 26%
  4. त्रिपुरा - 16.7%
  5. मेघालय - 12.7%


Organized 4-Day International Dance Festival in Gwalior

 1. भारतात, उझबेकिस्तानचे राजदूत फरहोद अर्जीव यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे चार दिवसीय आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव "उद्भव उत्सव-2018" चे उद्घाटन केले.
 2. सहभागी होणारे संघ :-
  1. भारत, बुल्गारिया, तुर्की आणि श्रीलंकामधील असे एकूण 25 नृत्य संघ सहभागी होतील.
 3. महोत्सवाचा उद्देश :-
  1. मुख्य हेतू रचनात्मक संप्रेषण सादर करणे, विविध देशांमध्ये नवीन प्रतिभा सादर करणे आणि राष्ट्रीय संस्कृती आणि कला सादर करण्यासाठी कलाकारांना संधी देणे आहे.


Organizing the Fourth Lecture of niti Commission in New Delhi

 1. नीति आयोगाचे चौथे व्याख्यानमाला नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली
 2. नीति आयोगाने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे नीति व्याख्यानमालाचे चौथे पर्व आयोजित केले.
 3. मुख्य अतिथी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी
 4. मुख्य भाषण :- NVIDIA कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक जेन्सेन हुआंग
 5. चौथ्या व्याख्यानमालाचा विषय #Theme : "AI for ALL: Leveraging Artificial Intelligence for Inclusive"
 6. मंत्री, नीति आयोगाचे तज्ज्ञ उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग होता.
 7. थोडक्यात महत्त्वाचे :-
 8. NITI- National Institution for Transforming India
 9. नीति आयोग उपाध्यक्ष- राजीव कुमार,
 10. CEO- अमिताभ कांत.


Strategic Partnership Agreement between Russia and Egypt

 1. रशियाच्या सोची शहरात रशिया आणि इजिप्त या देशांमध्ये व्यापार, सैन्य आणि इतर संबंध वृद्धींगत करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी करारांवर स्वाक्षर्या केल्या आहेत. 
 2. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्ताह अल-सिसी हे रशियाच्या दौर्यावर आहेत.
 3. रशिया :-
  1. हा पूर्व यूरोप आणि उत्तर एशिया प्रदेशात स्थित एक विशाल आकार असलेला देश आहे. हा एकूण 17075400 चौ. किमी. क्षेत्रफळ असलेला जगातला सर्वात मोठा देश आहे. आकाराच्या दृष्टीने हा भारताच्या पाच पट आहे.
  2. या देशाची राजधानी मॉस्को शहर असून देशाचे चलन रशियन रूबल हे आहे.
  3. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे आहेत.
 4. इजिप्त:-
  1. इजिप्त हा उत्तर आफ्रिकेतला प्रजासत्ताक देश आहे.
  2. कैरो ही देशाची राजधानी आहे.
  3. इजिप्शियन पाऊंड (EGP) हे राष्ट्रीय चलन आहे.


Top