PM Narendra Modi Launches Rs 100 Coin To Honour Atal Bihari Vajpayee

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 100 रुपयांचं नवीन नाणं जारी केलं. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं. 
 2. संसदेच्या अॅनेक्सी भवनात या नाण्याचं अनावरण करण्यात आलं. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची उद्या जयंती आहे.
 3. सरकार वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त 25 डिसेंबर हा दिवस 'सुशासन दिवस' म्हणून साजरा करण्यात येईल.
 4. याच वर्षी वाजपेयींची ही पहिलीच जयंती आहे. गेल्या 16 ऑगस्टला वाजपेयींचं 93व्या वर्षी निधन झालं.
 5. 100 रुपयाचे नाणे-
  1. 100 रुपयाचे नाणे चांदी (50%), तांबे (40%), जस्त (5%) आणि निकेल (5%) यांपासून बणविलेले आहे.
  2. या नाण्याचे वजन 135 ग्रॅम आहे.
  3. नाण्याच्या एका बाजूवर अशोक स्तंभ आसून त्याच्या खालील बाजूस ‘सत्यमेव जयते’ असे कोरलेले आहे.
  4. नाण्याच्या डाव्या बाजूवर देवनागरी लिपी मध्ये ‘भारत’ असे असून, उजव्या बाजूवर इंग्रजी भाषेत ‘India’ हे शब्द दर्शवतिल.


'Kaliya' scheme for farmers in Odisha

 1. अलीकडेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्याच्या शेतकऱ्यांसाठी ‘कालिया’ (KALIYA) योजना मंजूर केली आहे.
 2. KALIYA - Krishak Assistance for Livelihood and Income Augmentation.
 3. या योजनेअंतर्गत 92% शेतकऱ्यांना सामावून घेण्यात येईल. या योजनेसाठी ओडिशा सरकारने 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.
 4. ही रक्कम पुढील 3 वर्षांत खर्च केली जाईल. या योजनेमुळे राज्यातील सुमारे 30 लाख लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
 5. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला खरीप पिकांसाठी 5,000 रुपये आणि रब्बी पिकांसाठी 10,000 रुपये आर्थिक मदत देण्यात येईल.
 6. याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 50,000 रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज व्याजमुक्त करण्याचेही जाहीर केले आहे.


GST reduction on TVs, computers and tyres

 1. टीव्ही, संगणक, टायर, 100 रुपयांवरील सिनेमाची तिकिटे यांवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली आहे.
 2. हा जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली.
 3. अलीकडेच जीएसटी परिषदेची 31 वी बैठक पार पडली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
 4. जीएसटी परिषदेची 31 वी बैठक पार पडली. या बैठकीत महसूल या विषयावर मोठी चर्चा झाली. दोन समित्यांनी त्यांची त्यांची मतं मांडली असेही जेटली यांनी म्हटले आहे.
 5. GST28 टक्के कर असलेल्या 28 च वस्तू त्या टॅक्स स्लॅबमध्ये उरल्या आहेत असेही अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. सिमेंट आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये ही जीएसटीची कपात करण्यात आली आहे.
 6. ऑटोमोबाइल सेक्टरमधल्या 13 वस्तूंवरचा कर हा 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. तर सिमेंटवरचा करही 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे असेही जेटली यांनी म्हटले आहे.
 7. तर ज्या वस्तूंवरचा कर 28 टक्क्यावरून 18 टक्के करण्यात आला त्या वस्तूंवर 1 जानेवारी 2019 पासून 18 टक्के जीएसटी आकारण्यात येईल असेही जेटली यांनी म्हटले आहे.
 8. एकूण 33 वस्तूंवरच्या जीएसटीत कपात करण्यात आल्याचे अरूण जेटली यांनी सांगितले आहे.
 9. 26 वस्तूंवरचा जीएसटी 12 ते 5 टक्के असा करण्यात आला आहे. तर बाकी सहा वस्तूंवरचा जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.


Bala Rafiq Shaikh win title of Maharashtra Kesari

 1. गुणांच्या जोरावर बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेता अभिजित कटकेला पराभूत केले. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अभिजितला अपयश आले. 11-3 अशा गुणाने त्याने अभिजितला पराभूत केले.
 2. लढतीच्या सुरुवातीलाच अभिजितने एक गुणांची कमाई केली होती. आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते.
 3. परंतु, नंतर बाला रफिकने ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली. बालारफीने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अभिजितला पुनरागनाची संधीच लाभली नाही.
 4. बुलडाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले. तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला चीतपट केले होते.
 5. तसेच बाला रफिक शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
 6. बाला रफिकने मानाची गदा पटकावल्यानंतर त्याचे 65 वर्षीय वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते.
 7. त्यांना हा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. अत्यंत भावुक होऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला.


Develop GPS-based solutions to track disaster management trains

 1. आपत्ती व्यवस्थापन ट्रेनचा मागोवा घेण्यासाठी GPS-आधारित उपाययोजना विकसित केली.
 2. भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागाने आपत्ती व्यवस्थापन ट्रेनचे ठराविक स्थान आणि वेग निश्चित करण्यासाठी GPS-आधारित उपाययोजना विकसित केली आहे. 
 3. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ही सुविधा सर्व अॅक्सिडेंट रिलीफ ट्रॅन (ARTs), अॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट (ARME) आणि सेल्फ प्रोपेल्ड अॅक्सिडेंट रिलीफ ट्रॅन (SPARTs) मध्ये बसविण्यात आली आहे.


Top