National Voters Day: 25 January

 1. 2011 सालापासून दरवर्षी 25 जानेवारीला भारतात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जात आहे. 
 2. यावर्षी 'अॅक्सेसीबल इलेक्शन्स (देण्यायोग्य निवडणुका)' या संकल्पनेखाली आठवा 'राष्ट्रीय मतदाता दिवस' साजरा केला जात आहे.
 3. 25 जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे.
 4. या दिवशी आयोजित विविध कार्यक्रमामधून विशेषत: नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
 5. या दिवशी निवडणूक प्रक्रियेतील प्रभावी सहभागासाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली जाते.
 6. निवडणूक जगतातली व्यवस्थापनेसंबंधी सर्वात मोठी घटना म्हणजे, एप्रिल-मे 2009 मध्ये पार पाडलेल्या 15 व्या लोकसभेच्या निवडणुकीत 714 दशलक्ष मतदार, 8.35 लक्ष मतदान केंद्र, 12 लक्ष EVM आणि 11 दशलक्ष मतदान कर्मचार्‍यांनी भाग घेतला होता.
 7. आयोगाला असे आढळून आले की, मतदारांच्या यादीतून 18 वर्षांच्या नव्या मतदारांची नावे वगळली गेलीत.
 8. या समस्येला पाहता तेव्हापासून देशभरात 8.5 लक्ष मतदान केंद्रांवर दरवर्षी 1 जानेवारीला 18 वर्ष पूर्ण करणार्‍या सर्व मतदारांची ओळख केली जाते आणि त्यांचे नोंदणी केली जाते.

भारतीय निवडणूक आयोग (ECI)

 1. भारतीय निवडणूक आयोग ही भारतीय संविधानाद्वारे स्थापित केलेले एक स्वायत्त प्राधिकरण आहे आणि हे देशातील लोकसभा, राज्यसभा, राज्याच्या विधानसभा, आणि राष्ट्रपती व उप-राष्ट्रपती यांची कार्यालये यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असते.
 2. 1962 साली मतदानाची प्रक्रि‍या कागदी मताद्वारे केले जात होते. वर्ष 2004 पासून मतदानासाठी इलेक्‍ट्रॉनि‍क व्होटर यंत्रांचा (EVM) वापर होत आहे.
 3. ECI ची अधिकृत स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून ही तारीख घोषीत केली गेली.
 4. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे. ओम प्रकाश रावत हे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त आहे.


Researchers of IIT Bombay developed an electronic nose

 1. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बेच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातल्या संशोधकांनी इलेक्ट्रॉनिक "नाक" विकसित केले आहे.
 2. या शोधाची पोलीसांना स्फोटक द्रव्ये आणि अमली पदार्थांचा सुगावा घेण्यास मदत होईल.
गंध घेण्याची प्रक्रिया
 1. गंध घेण्याच्या प्रक्रियेसंदर्भात दोन सिद्धांत मांडले गेले आहेत - आकार सिद्धांत आणि कंपन सिद्धांत.
 2. आकार सिद्धांताप्रमाणे, एखाद्या विशिष्ट रेणूचा आकार "मुख्य" मानले जाते आणि जे नाकामध्ये गेल्यास संवेदकामुळे गंध ओळखता येतो.
 3. दुसरीकडे कंपन सिद्धांताप्रमाणे, नाक फक्त आकाराचेच आकलन करत नसून तर गंध असलेल्या रेणूच्या कंपन ऊर्जेला सुद्धा ओळखतो.
 4. मात्र केवळ कंपन सिद्धांताच्या आधारे IIT च्या संशोधकांनी इनइलॅस्टिक क्वांटम मेकॅनिक्स टनेलिंग तंत्राला वापरून एक कृत्रिम "नाक" तयार करून दाखवले आहे.
 5. जे गंध असलेल्या रेणूंच्या कंपन ऊर्जेमधील फरक ओळखू शकते.
 6. इलेक्ट्रॉनिक नाकमध्ये प्रत्यक्षात एक-आयामी "रेझोनंट टनेलिंग डायोड" आहे, जे एक क्वांटम उपकरण आहे, जे केवळ विद्युत ऊर्जेच्या विशेष डिस्क्रीट वॅल्यूमुळे सक्रिय होते.


63rd Filmfare Award Ceremony

 1. 2017 या वर्षात सादर करण्यात आलेल्या कलाकृतींचा गौरव करण्यासाठी चित्रपटसृष्टी मुंबईत अलीकडेच 63 वा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
 2. फिल्मफेअर पुरस्कार बाबत:-
  1. फिल्मफेअर पुरस्कार समारंभ भारतीय सिनेमामधील सर्वात जुन्या कार्यक्रमांपैकी एक आहे.
  2. याची सुरुवात 1954 सालापासून झाली, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची देखील स्थापना याच वर्षी झाली.
  3. हा पुरस्कार लोकमताने आणि पंचाच्या मतांच्या आधारावर दरवर्षी दिला जातो. 
63 वा फिल्मफेअर पुरस्कार विजेते
 1. सर्वोत्कृष्ट चित्रपट - हिंदी मीडियम
 2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
 3. सर्वोत्कृष्ट अभिनेता - इरफान खान (हिंदी मीडियम)
 4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - विद्या बालन (तुम्हारी सुलू)
 5. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- राजकुमार राव (बरेली की बर्फी)
 6. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)
 7. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण - कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गूंज)
 8. सर्वोत्कृष्ट संगीत - जग्गा जासूस
 9. सर्वोत्कृष्ट गीतकार - अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा)
 10. सर्वोत्कृष्ट गायक - अरिजित सिंग (रोके ना रुके नैना- बद्रीनाथ की दुल्हनिया)
 11. सर्वोत्कृष्ट गायिका - मेघना मिश्रा (नचदी फिरा – सिक्रेट सुपरस्टार)
 12. जीवनगौरव पुरस्कार - माला सिन्हा, बप्पी लहिरी
 13. सर्वोत्कृष्ट मूळ कथा - अमित मसुरकर (न्यूटन)
 14. सर्वोत्कृष्ट संवाद - हितेश केवलया (शुभ मंगल सावधान)
 15. सर्वोत्कृष्ट पटकथा - शुभाषिश भुतियानी (मुक्ती भवन)
 16. सर्वोत्कृष्ट अॅक्शन - टॉम स्ट्रथर्स (टायगर जिंदा है)
 17. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - प्रितम (जग्गा जासूस)
 18. सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - पारुल सोंध (डॅडी)
 19. सर्वोत्कृष्ट वेशभूषा - रोहित चतुर्वेदी (अ डेथ इन द गूंज)
 20. सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण - अनिश जॉन (ट्रॅप्ड)
 21. सर्वोत्कृष्ट संकलन - नितीन बैद (ट्रॅप्ड)
 22. सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - विजय गांगुली, रुएल दुसाम वरिंदीयानी (गल्ती से मिस्टेक - जग्गा जासूस)
 23. सर्वोत्कृष्ट छायांकन - स्रिशा रॉय (अ डेथ इन द गुंज)
 24. सर्वोत्कृष्ट लघुपट (कल्पनारम्य) - ज्यूस
 25. सर्वोत्कृष्ट लघुपट (विना कल्पनारम्य) – इनव्हिजीबल विंग्स

 

समीक्षक पुरस्कार:-

 1. सर्वोत्कृष्ट चित्रपट- न्यूटन
 2. सर्वोत्कृष्ट अभिनेता- राजकुमार राव (ट्रॅप्ड)
 3. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- झायरा वसिम (सिक्रेट सुपरस्टार)


India's fifth most attractive market for investment

 1. जागतिक सल्लागार कंपनी PwC च्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारत गुंतवणुकीच्या दृष्टीने वर्ष 2018 मध्ये भारत जपानला मागे टाकत पाचवी सर्वात आकर्षक बाजारपेठ म्हणून तयार झालेली आहे.
 2. सर्वेक्षणानुसार, गुंतवणुकीच्या दृष्टीने अमेरिका सर्वात पसंतीची बाजारपेठ आहे.
 3. त्यानंतर अनुक्रमे चीन आणि जर्मनी, ब्रिटन आणि भारत या देशांचा क्रमांक लागतो.
 4. भारत सरकारने पायाभूत सुविधा, निर्माण आणि कौशल्य यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये संबंधित समस्यांना दूर करण्याकरिता प्रयत्न केलेत.
 5. व्यापारस अनुकूलता दिसूनही CEO यांची व्यापार, सामाजिक आणि आर्थिक धोक्यांशी संबंधित चिंता वाढत आहे.
 6. जवळजवळ 40% CEO भु-राजनैतिक अनिश्चितता आणि सायबर सुरक्षा संदर्भात तर 41% CEO दहशतवादाला घेऊन चिंतित आहेत.


Top