golden lion award given to amit pate

 1. नासा गर्ल स्वीटी पाटे यांचे बंधू अमित पाटे यांच्या कंपनीला कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘वर आधारित स्पोर्ट टेक्‍नॉलॉजीसाठी मोबाईल श्रेणीकरिता तब्बल दोन ‘गोल्डन लॉयन‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 2. हा पुरस्कार मिळविताना त्यांनी गुगल, ऍपल, टोयोटा, ऑडी, वेरिझॉन, पी अँड जी, ऑरेन्ज, नायकी, केएफसी, द टाइम्स आदी नव्वद देशांच्या हजारो नामांकित कंपन्यांना मागे टाकले.
 3. अमित पाटे यांना मोबाईल टेक्‍नॉलॉजीसाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘ श्रेणीत सादर केलेल्या ‘स्नॅप्टीव्हिटी‘ या तंत्रासाठी गोल्डन लायन पुरस्कार प्राप्त झाला.
 4. उच्च गतीचे रोबोटिक कॅमेरे खेळपट्टीवर चालविण्याऐवजी क्रीडाप्रेमींवर फोकस करून जिवंत क्रीडा प्रकाराचा त्यांना अनुभव यावा, यासाठी ‘स्नॅप्टीव्हिटी‘ हे तंत्र अमित पाटे यांच्या स्नॅप्टीव्हिटी लि. या कंपनीने विकसित केले आहे.


mallikarjun kharge appoited as maharashtra congress leader

 1. काँग्रेसने 22 जून रोजी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले असून महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांची उचलबांगडी करत लोकसभेतील पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती केली आहे.
 2.  खर्गे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. 
 3. आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा महत्वपूर्ण बदल केला आहे.
 4. तसेच या बदलाबरोबरच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी जे डी सिलम आणि महेंद्र जोशी यांना पक्षाचे सरचिटणीस आणि शशिकांत शर्मा यांना सहसरचिटणीस म्हणून नियुक्त केले आहे.


maharashtra government given permission to water

 1. राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, तापी, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी नद्या व महानदी खोऱ्यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
 2. राज्यातील सर्वच खोऱ्यांच्या एकत्रित एकात्मिक जल आराखड्याचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.
 3. ‘सह्याद्री‘ अतिथिगृहात झालेल्या या परिषदेच्या बैठकीस परिषदेचे उपाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते.
 4. राज्यात गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी नद्या व महानदी या सहा खोऱ्यांचा अभ्यास करून स्वतंत्रपणे जल आराखडे तयार करण्यात आले. यापैकी गोदावरी खोऱ्याच्या जल आराखड्यास 30 नोव्हेंबर 2017 रोजी मान्यता देण्यात आली होती, तर उर्वरित पाच आराखड्यांचे सादरीकरण परिषदेच्या बैठकीत करण्यात आले.
 5. सर्व खोऱ्यांचा एकात्मिक जल आराखडा मंजूर होईपर्यंत प्रत्येक खोरेनिहाय आराखड्याची अंमलबजावणी करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
 6. जल आराखडे मंजूर झाल्यामुळे सिंचन प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.


India and Cuba have two Memorandent Treaties

 1. भारत आणि क्युबा यांनी दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी दोन सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.
 2. ते आहेत -
  1. पारंपारिक औषधे आणि होमिओपॅथी विषयांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी
  2. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी
 3. शिवाय, औषधीनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान उत्पादनांसाठी भारताचे कलाम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ टेक्नॉलॉजी आणि क्युबाची बायोक्युबाफार्मा कंपनी यांच्यात हेतूपत्रावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.
 4. क्यूबा हा कॅरिबियन प्रदेशामधील एक द्वीप-देश आहे.
 5. हवाना ही क्यूबाची राजधानी आहे.
 6. स्पॅनिश नाविक ख्रिस्तोफर कोलंबस येथे इ.स. 1492 मध्ये पहिल्यांदा दाखल झाले.
 7. स्पॅनिश ही देशाची अधिकृत भाषा आहे.
 8. क्युबा पेसो आणि क्युबन परिवर्तनीय पेसो ही राष्ट्रीय चलने आहेत.


 Yo-Yo Test: National Examination for National Cricket

 1. IPL मध्ये जवळपास 600 धावा काढणारा अंबाती रायुडू यो-यो चाचणीत अपयशी ठरला. त्याला अपेक्षित 16.1 इतके गुण या चाचणीत मिळविता आले नाहीत.
 2. त्यावर भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी टीका करत  या चाचणीला अतिमहत्त्व दिले जात असल्याचे म्हटले होते. 
 3. मात्र टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा या चाचणीला पूर्ण पाठिंबा आहे.
 4. यो-यो चाचणी:-
  1. खेळाडूची तंदुरूस्ती, सहनशीलता, तग धरण्याची क्षमता तपासण्याचा मापदंड म्हणजे यो-यो चाचणी होय.
  2. डेन्मार्कचा माजी फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक जेन्स बँग्स्बो यांनी यो-यो चाचणीची संकल्पना दिली होती.
  3. भारतीय क्रिकेट संघासाठी या परीक्षेची सुरुवात करणारे माजी भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे होते. 
  4. या परीक्षेत दोन – प्राथमिक आणि प्रगत – चाचणी घेतल्या जातात, ज्यामध्ये 20 मीटर लांबीच्या खेळपट्टीवर त्याला वेळेआधी धावून पूर्ण फेरी करावी लागते.
  5. BCCI ने परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खेळाडूंसाठी 19.5 गुणांची मर्यादा निश्चित केली आहे.


Top