World Tuberculosis Day: 24 March

 1. दरवर्षी 24 मार्चला जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिवस (World TB Day)’ पाळला जातो.
 2. या दिनानिमित्त क्षयरोगाचे (TB) जगभरातील ओझे तसेच प्रतिबंधात्मक व निगा राखण्याचे प्रयत्न याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते.
 3. यावर्षी हा दिवस “वॉन्टेड: लीडर्स फॉर ए टीबी-फ्री वर्ल्ड” या विषयाखाली पाळण्यात येत आहे.
 4. न्यूयॉर्कमध्ये आगामी क्षयरोगावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या उच्चस्तरीय बैठकीचे राजकीय महत्त्व दर्शविणारा हा विषय सर्व सभासद देशांच्या प्रमुखांना एकत्र आणणार आहे.
 5. 16-17 नोव्हेंबर 2017 रोजी मॉस्कोत यशस्वीपणे पार पडलेल्या क्षयरोग निर्मूलनावरील मंत्रिस्तरीय परिषदेच्या पाठपुराव्याच्या परिणाम स्वरूप हा विषय ठरविण्यात आला.
 6. परिषदेत क्षयरोगाला रोखण्यासंबंधी प्रगतीची गती वाढविण्यासाठी 120 देशांमधील मंत्री आणि इतर नेत्यांकडून उच्चस्तरीय वचनबद्धता दर्शविण्यात आली होती.
 7. 1995 साली प्रथम जागतिक क्षयरोग दिवस पाळण्यात आला.
 8. 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक - ‘TB बॅसीलस’ – या जिवाणूचा शोध लागला.
 9. क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस जीवाणूमुळे होतो. क्षयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे.
 10. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णास DOTS प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.

भारतामधील परिस्थिती आणि उपाययोजना

 1. जगभरात 6-7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत आणि क्षयरोगामुळे दरवर्षी जवळजवळ 2.5-3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.
 2. भारतात दर तीन मिनिटाला दोन क्षयरोगींचा मृत्यू होतो, तर दररोज 40 हजार लोकांना याचे संक्रमण होते.
 3. भारतात जवळजवळ 92% इतक्या उच्च प्रमाणात HIV बाधित क्षयरोग रुग्ण आहेत, ज्यांना अॅंटी-रेट्रोव्हायरल थेरपी दिली जात आहे.
 4. भारतात वर्षभरात सुमारे 18 लाख लोकांना क्षयरोग (3-4 रूग्णांचा मृत्यू) होतो.
 5. केंद्र शासन क्षयरोगाच्या जलद व गुणवत्तापूर्ण निदानासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक याप्रमाणे एका वर्षात 500 हून अधिक CBNAAT यंत्र रुग्णालयाला देत आहे.
 6. औषध प्रतिरोधक क्षयरोगावरील उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी नवीन क्षयरोगाविरोधी औषध “बेडाक्युलाइन” सशर्त प्रवेश कार्यक्रम (CAP) अंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
 7. रोगासंबंधी खाजगी डॉक्टर शोधण्यासाठी “ई-निक्षय” व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.


 Africa's 44 countries' agreement for the establishment of a free trade zone in Africa

 1. 21 मार्च 2018 रोजी आफ्रिकेतील 44 देशांनी रवांडाची राजधानी किगालीमध्ये आयोजित आफ्रिका संघ (AU) याच्या शिखर परिषदेत आफ्रिका खंड मुक्त व्यापार क्षेत्र (AfCFTA) याच्या स्थापनेसाठी एका करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.
 2. ज्या देशांनी आतापर्यंत या करारावर स्वाक्षर्‍या केलेल्या नाहीत, त्यामध्ये बोत्सवाना, लेसोथो, नामिबिया, झांबिया, बुरुंडी, इरिट्रिया, बेनिन, सिएरा लिऑन आणि गिनी बिसाऊ, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
 3. सहभागी देश आपापल्या न्यायिक प्रक्रियेनुसार या कराराची पुष्टी करणार आहे.
 4. 22 देशांकडून या कराराला मान्यता दिल्यानंतर हा करार प्रभावी होणार आहे.
 5. हा करार प्रभावी झाल्यास, तो जगातल्या सर्वात मोठ्या व्यापारी करारांपैकी एक ठरणार आहे.
 6. असे असूनही आफ्रिकेतील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेनी म्हणजेच नायजेरियाने या करारावर स्वाक्षरी केलेली नाही.
 7. कराराबाबत:-
  1. आफ्रिका हा जवळपास 1.2 अब्जावधी लोकांचे घर आहे आणि याचे सामूहिक सकल देशांतर्गत उत्पन्न USD 2 लक्ष कोटींचा आहे.
  2. मालाच्या वाहतुकीसाठी एकल खंडीय बाजारपेठ समुद्धीस आणण्याने आफ्रिकेमधील अंतर्गत व्यापाराळा चालना मिळण्यास मदत मिळणार आहे.
  3. AfCFTA याचे शाश्वत आर्थिक विकास, दारिद्र्य निर्मूलन, रोजगारास प्रोत्साहन आणि खंडाचे एकीकरण याबाबतीत महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे.
  4. या मुक्त व्यापारासाठी सर्वाधिक मजबूत संपर्क जाळे असणे गरजेचे आहे, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित आहे.
  5. समग्र रस्ते-रेल्वे संपर्क तयार करणे ही या कराराची सर्वात मोठी अडचण आहे.

आफ्रिका खंड

 1. वैशिष्ट्ये:-
 2. आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड (एकूण क्षेत्रफळ: 3.02 कोटी चौ. किलोमीटर) आहे.
 3. हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.
 4. आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत.
 5. आग्नेयेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे.
 6. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.


 Union Government's approval for 'Mahila Shakti Kendra Scheme' 2019-20

 1. ग्रामीण महिलांना सामुदायिक सहभागातून सक्षम बनविण्यासाठी सन 2017-18 ते सन 2019-20 या कालावधीसाठी ‘महिला शक्ती केंद्र योजना’ सुरू ठेवण्यास भारत सरकारने त्यांची मान्यता दिली आहे. 
 2. विभागीय पातळीवरच्या पुढाकारांचा भाग म्हणून 115 सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांत महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवकांच्या माध्यमाने सामुदायिक सहभाग साधला जात आहे.
 3. 2017-18 या आर्थिक वर्षात 50 सर्वात मागास जिल्हे (जिल्ह्यात प्रत्येकी 8 गट) समाविष्ट केले गेले आहेत. 
 4. विभागीय पातळीवर उपक्रमांचा वार्षिक अर्थसंकल्प प्रत्येक विभागाला 35.36 लक्ष रुपये याप्रमाणे आहे.
 5. योजनेत टप्प्याटप्प्याने 640 जिल्ह्यांमध्ये (2017-18 साली 220 जिल्हे, 2018-19 साली आणखी 220, 2019-20 साली उर्वरित 200) महिलांसाठी नवीन जिल्हा पातळी केंद्रांचीही कल्पना आहे. प्रत्येक जिल्हा पातळी महिला केंद्रासाठी 12.30 लक्ष रुपये वार्षिक अर्थसंकल्प आहे. 
 6. भारत सरकारने 2017 साली देशभरात “प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र (PMMSK)” योजना सुरू केली.
 7. ही संपूर्ण योजना महिला व बाल विकास मंत्रालयाच्या छत्राखाली लागू आहे.
 8. या योजनेंतर्गत ग्रामीण महिलांना सशक्त बनविण्यासाठी उभारलेली केंद्रे महिला-केंद्रीत योजनांना चालना देण्यासाठी गाव, विभाग आणि राज्य पातळीवरील एक दुवा म्हणून काम करतील आणि जिल्हा पातळीवर बेटी पढाओ बेटी बचाओ (BBBP) कार्यक्रमाला भक्कम पाया पुरवतील.


'Football for Friendship (F4F) International Children's Social Project' launched

 1. गेजप्रॉम या संस्थेनी 23 मार्चला ‘फूटबॉल फॉर फ्रेंडशिप (F4F) आंतरराष्ट्रीय बालकांचा सामाजिक प्रकल्प’ (Football for Friendship International Children's Social Project) या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.
 2. 211 देशांमधील बालकांसाठी आयोजित F4F उपक्रमाची ही सहावी आवृत्ती आहे.
 3. या सत्राचे अंतिम सामने 8 जून ते 15 जून 2018 या काळात मॉस्को (रशिया) येथे आयोजित केले जाणार आहेत.
 4. गेजप्रॉम 2018 FIFA विश्वचषकाचा अधिकृत भागीदार आहे.
 5. शांती, सर्वांसाठी समानता व सन्मानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवविला जात आहे.
 6. शिवाय भारतीय युवा फुटबॉलपटूंना या वैश्विक आयोजनात खेळण्यास संधी प्राप्त झाली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA)
 1. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) हा एक खाजगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रीडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो.
 2. FIFA फुटबॉलच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संघटनासाठी, विशेषत: विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून) यांसाठी जबाबदार आहे.
 3. 1904 साली FIFA याची स्थापना करण्यात आली.
 4. याचे झुरिच (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे आणि त्याच्या सदस्यत्वामध्ये आता 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.


Recognition of the jackfruit of Kerala as the state of Kerala

 1. केरळमध्ये दरवर्षी ३० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते 
 2. वरून काटे व आत गोड, रसाळ गरे असलेल्या फणसाला केरळ राज्याने राज्यफळाचा मान बहाल केला.
 3. राज्याचे कृषिमंत्री व्ही. एस. सुनीलकुमार यांनी विधानसभेत ही घोषणा केली.
 4. केरळमध्ये दरवर्षी ३० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादनहोते. 
 5. केरळचा फणस आणि त्यापासून बनविलेल्या उत्पादनांचा देशभर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे सांगून सुनीलकुमार म्हणाले की, यातून सुमारे १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. 
 6. झाडाला लागणारे सर्वांत मोठे फळ अशी ओळख असलेल्या फणसाला हा मान देणारे केरळ हे पहिले राज्य असले तरी फणसाच्या उत्पादनात केरळचा देशात सहावा क्रमांक लागतो. 
 7. देशभरात वर्षाला सुमारे १९०० हजार टन फणसाचे उत्पादन होत असले तरी त्यापैकी सुमारे ३० टक्के फणस ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधीच सडून जातात.
 8. म्हणूनच फणसावर प्रक्रिया करून टिकाऊ उत्पादने तयार करण्यास खूप वाव आहे. 
 9. २० राज्यांमध्ये फणस पिकत असले तरी त्रिपुराचा क्रमांक त्यात पहिला आहे.
 10. त्याखालोखाल ओरिसा, आसाम, प. बंगाल, कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, झारखंड व मध्य प्रदेश ही सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत.
 11. उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात १५वा क्रमांक लागतो.


 Martin Wykrara - The new President of Peru

 1. पेरूचे उपराष्ट्रपती मार्टिन विजकार्रा यांनी 23 मार्चला देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. ते सन 2021 पर्यंत या पदावर राहतील.
 2. भ्रष्टाचाराचा आरोप लागलेल्या (माजी) राष्ट्रपती पेड्रो पाब्लो क्यूझिंस्की यांनी महाभियोग टाळण्यासाठी 21 मार्चला राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला.
 3. पेरु हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनार्‍यावर स्थित एक देश आहे.
 4. पेरूच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत.
 5. अ‍ॅमेझॉनचा उगम पेरूच्या दक्षिण भागातील नेव्हादो मिस्मी ह्या अँडीझमधील एका शिखरावर होतो.
 6. टिटिकाका हे दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठे सरोवर देशाच्या आग्नेय भागात बोलिव्हियाच्या सीमेवर स्थित आहे.
 7. लिमा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि नुएव्हो सोल हे राष्ट्रीय चलन आहे. देशाची अधिकृत भाषा स्पॅनिश ही आहे.


Top