The Civil Aviation Ministry is preparing the travel code

 1. भारत सरकारचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय एक प्रवासी संहिता तयार करीत आहे आणि त्याचा मसुदा नुकताच प्रसिद्ध केला गेला आहे.
 2. या दस्तऐवजानुसार, हवाई प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना अनेक सवलती दिल्या जाणार आहेत.
 3. भारतात संचालित सर्व स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सेवा कंपन्यांना उड्डाणादरम्यान विमानात इंटरनेट व मोबाइल सेवा देण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यासाठी कंपन्यांना नागरी उड्डयन मंत्रालयाकडून परवाना घ्यावा लागणार आहे.
 4. ठळक वैशिष्ट्ये:-
 5. विमान सेवेकडून उड्डाणामध्ये विलंब झाल्यास किंवा उड्डाण रद्द झाल्यास प्रवाश्यांना तिकिटाच्या पूर्ण रकमेसह अतिरिक्त भरपाई दिली जाईल. ओळखपत्र म्हणून ‘आधार’ अनिवार्य नाही आणि प्रवासादरम्यान वाय-फाय कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल.
 6. स्थानिक मार्गांवर तिकिट आरक्षित केल्यानंतर 24 तासांच्या आत तिकिट रद्द केल्यास किंवा तारीख-वेळ यामध्ये बदल केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीत.
 7. उड्डाणाला 4-12 तासांचा विलंब झाल्यास, विमान सेवा कंपनीला प्रवाश्याला भरपाई म्हणून 10000 रुपये द्यावे लागणार.
 8. 12 तासांहून अधिक विलंब झाल्यास आणि या कारणामुळे प्रवाश्याचे लागून असलेले उड्डाण पकडू न शकल्यास, भरपाई म्हणून ही रक्कम दुप्पट होऊन ती 20000 रुपये असेल.
 9. भरपाईवरुन उद्भवलेल्या विवादीत स्थितीत उड्डयन महासचिवालय (DGCA) यांचा निर्णय सर्वमान्य असेल.
 10. जर प्रवाश्याला दोन आठवड्यांच्या एक दिवसाआधी उड्डाण रद्द झाल्याची माहिती दिली गेली, तर अश्या परिस्थितीत विमान सेवा कंपनीला अश्या पर्यायी उड्डाणाबद्दल प्रस्ताव मांडावा लागणार, जी आरक्षित केल्या गेलेल्या उड्डाणाच्या दोन तासांच्या आत उडणारी असेल. असे शक्य न झाल्यास प्रवाश्याला तिकीटाची पूर्ण रक्कम परत दिली जाणार.
 11. उड्डाणाला विलंब झाल्याची माहिती उड्डाणाच्या 24 तासांआधी दिली गेली असल्यास आणि उड्डाणाला 4 तासाहून अधिक काळ विलंब झाल्यास पूर्ण रक्कम परत केली जाणार.
 12. उड्डाणाला विलंब होण्याचे कारण हवामान परिस्थिती असल्यास कंपन्यांना जबाबदार ठरवल्या जाणार नाही.
 13. जर एखाद्या व्यक्तीला बोर्डिगसाठी नाकारल्यास, अश्या परिस्थितीत कंपनी त्याला कमीतकमी 5000 रुपये भरपाई देईल.
 14. कंपनी विशेषताः दिव्यांगांना बसण्यासाठी उपयुक्त आणि आरक्षित आसनांवर सामान्य प्रवाश्यांची बुकिंग करू शकत नाही. या आसनांना तोपर्यंत खाली ठेवले जाणार, जोपर्यंत विमानाचे दरवाजे उड्डाणासाठी बंद केले जात नाहीत.
 15. दिव्यांग प्रवाश्यांकडून अश्या विशेष आसनांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.


ESC Policy Magazine with reference to electronics and computer software export

 1. सन 2022 पर्यंत देशाची सॉफ्टवेअर निर्यात USD 178 अब्जपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स व संगणक सॉफ्टवेअर निर्यात प्रोत्साहन परिषदेने (ESC) एक धोरण पत्रिका तयार केली आहे.
 2. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत ESC ने पारंपरिक बाजारपेठांमधील या संदर्भात निर्यात वाढविण्यासोबतच आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि राष्ट्रकुल देशांमध्ये भारताचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी या पत्रिकेमध्ये अनेक विषयांवर विकासात्मक भर दिला आहे.
 3. ठळक बाबी:-
 4. या पत्रिकेमध्ये अत्यावश्यक धोरणात्मक पातळीवरील बदलांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
 5. भारतातून सॉफ्टवेअर आणि संबंधित माहिती तंत्रज्ञान सेवांच्या निर्यातीत व्यापक बदल घडवून आणण्यासाठी सक्षम असलेले धोरणात्मक उपाय, बाजारपेठा आणि इतर उपयुक्त माहिती देखील यात समाविष्ट करण्यात आली आहे.
 6. अमेरिकासह व्हिसा संदर्भात असलेली समस्‍या सोडवणे, युरोपीय देशांमध्ये व्यवसायिकांचा प्रवेश वाढवणे, अमेरिकासोबत एकात्मिक करार करणे, संगोपन केंद्रांची स्‍थापना करणे आणि प्रमुख माहिती तंत्रज्ञान हब अश्या विविध बाबी संदर्भात धोरणात्मक बदल करण्यास प्राथमिकता दिली गेली आहे.
 7. सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर यांचे योग्य पद्धतीने एकात्मिकरण, नवीन निर्यात केंद्र उभारणे, वित्तीय प्रोत्साहन देणे आणि देश-निहाय सॉफ्टवेयर निर्यातीस प्रोत्साहन देणे हे यात स्पष्ट केलेल्या विशिष्ट उपायांपैकी काही आहेत.
 8. सद्यस्थितीत, भारत मुख्‍यत: उत्‍पादन उपाय प्रदान करीत असल्याने आफ्रिका आणि मध्‍य-पूर्व यासारख्या उदयोन्मुख देशांसाठी एक भिन्‍न मॉडलची आवश्‍यकता आहे.
 9. अमेरिका आणि युरोप याकडे सॉफ्टवेयर व ITeS निर्यातच्या व्‍यापक शक्यता आहेत, मात्र अभिनव व तांत्रिक क्षेत्रात नेतृत्व करण्यामध्ये व्‍यापक तफावत दिसून येत असल्यामुळे छोट्या कंपन्या अपेक्षानुरूप कामगिरी करू शकत नाही आहेत.
 10. इलेक्ट्रॉनिक्स व संगणक सॉफ्टवेअर निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अधिकाधिक उद्योगांना प्रेरित करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न चालू आहेत.


 AB DIVILIERS 'OUT OF INTERNATIONAL CRICKET

 1. दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिव्हीलियर्सने २३ मे रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.
 2. गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे क्रिकेट सामने खेळतो आहे, त्यामुळे थकलो असल्याचे सांगत डीव्हिलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
 3. मैदानात ३६० अंशांमध्ये फटकेबाजी करणारा फलंदाज अशी ओळख असलेला डीव्हिलियर्स रिव्हर्स स्विप, पॅडल स्विप, अपर कट यासारखे एकाहून एक सरस फटके सहज खेळतो.
 4. मैदानात स्वभावाने शांत असलेल्या डिव्हीलियर्सची फलंदाजीतली कारकिर्द मात्र चांगलीच आक्रमक राहिलेली आहे.
 5. एबीडीने आतापर्यंत कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळून २०,०१४ पटकावल्या आहेत.
 6. एबीडीने २००४साली कसोटी क्रिकेटमध्ये, २००५साली वन-डे क्रिकेटमध्ये व २००६साली टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले.
 7. यानंतर आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपदही भूषविले. मात्र आपल्या संघाला विश्वचषक मिळवून देण्यात तो अयशस्वी ठरला.
डिव्हीलियर्सचे विक्रम
 1. एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद अर्धशतक. (१६ चेंडूंमध्ये)
 2. एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद शतक (३१ चेंडूंमध्ये) व सगळ्यात जलद दीडशतक (६४ चेंडूंमध्ये).
 3. कसोटीमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
 4. आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये सगळ्यात जास्त गुण कमावणारा तो दक्षिण अफ्रिकन खेळाडू आहे. (९३५ गुण)
 5. ‘साउथ अफ्रिकन क्रिकेटर ऑफ दी इयर’ हा मानाचा पुरस्कार एबीडीने २०१४ व २०१५ असा दोन वेळा पटकावला आहे.
 6. सर्वाधिक धावांच्या बाबतीत चौथा दक्षिण अफ्रिकन खेळाडू आहे.
 7. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो जॅक कॅलिस खालोखाल धावा करणारा दुसरा अफ्रिकन आहे.
 8. ४० मिनिटांत १०० धावा आणि १९ मिनिटांत ५० धावांची खेळी.
 9. एका सामन्यात सर्वाधिक १६ षटकार ठोकण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्मासोबत डिविलियर्सच्या नावावर जमा आहे.
 10. ३३८.६३ हा वनडेतील सर्वाधिक स्ट्राइक रेट एबीडीच्या खात्यावर जमा आहे.

 

एबी डिव्हीलियर्सची कारकीर्द
  सामने धावा सर्वोच्च धावसंख्या सरासरी शतक अर्धशतक
कसोटी ११४ ८७६५ २७८* ५०.६६ २२ ४६
वन-डे २२८ ९५७७ १७६ ५३.५० २५ ५३
टी-२० ७८ १६७२ ७९* २६.१२ - १०


 The well-known economist Dr. D. Ra Pendse's death

 1. सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. टाटा समूहाचे वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.
 2. ६ सप्टेंबर १९३० रोजी पुणे येथे जन्मलेल्या डॉ. पेंडसे यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व गणित विषयातील बी.ए. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली.
 3. पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापाठीतून बी.ए. (ऑनर्स) करून १९५७मध्ये याच विद्यापीठातून एम.ए. केले.
 4. १९६७मध्ये टाटा समूहात वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून ते दाखल झाले होते. सुमारे २० वर्षे टाटा उद्योगसमूहाचे अर्थसल्लागार होते.
 5. टाटा समूहात सामील होण्याआधी भारत सरकारच्या वित्त, व्यापार व उद्योग मंत्रालयामध्येही डॉ. पेंडसे यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या.
 6. आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या असामान्य गुणवत्तेमुळे अनेक शेअर बाजार व वायदेबाजारांच्या संचालक मंडळांवर संचालक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.
 7. डॉ. पेंडसे यांच्या अर्थशास्त्राची भाषा मात्र, सहज आणि प्रत्येकास सहज आकलन होईल एवढी सोपी होती.
 8. डॉ. द. रा. पेंडसे यांची ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी अ‍ॅडव्हाइस’ ही संस्था वित्तीय सल्लागार क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर होती.


Top

Whoops, looks like something went wrong.