1. पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. 
 2. साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. 
 3. अरुण साधू यांनी के सरी, मा णूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. 
 4. 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता. 
 5. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 
 6. तसेच साधू यांनी झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. 


 1. रोजी नवी दिल्लीत गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शहरातल्या प्रभावी घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘माय होम-माय नेबरहुड (किंवा ‘घर भी साफ और पड़ोसी भी साफ’ किंवा ‘घरही स्वच्छ आणि शेजारीही स्वच्छ ’)’ मोहिमेचा शुभारंभ केला.

 2. शेजारीचा अर्थ निवासी परिसर, मोहल्ला आणि बाजारपेठ आदीचा समावेश होतो. भारताची राजधानी शहर संपूर्णपणे स्वच्छ राखण्याच्या प्रयत्नात ‘ स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेला सुरुवात केली गेली आहे. याप्रसंगी दक्षिण महानगरपालिकेद्वारा कचरा उचलणारी/छानणारी आधुनिक यंत्राचे अनावरण केले गेले.

 3. कचरा उचलताना त्याच ठिकाणी कचर्‍याचे विभाजन करणे, परिसर/शेजारी/क्षेत्र येथेच ओल्या कचर्‍यामधून कम्पोस्ट खत तयार करणे, सुक्या कचर्‍याचा पुनर्वापर करणे, खुल्यावर मल-मुत्राच्या विसर्जनापासून शेजार्‍यांना मुक्त ठेवणे.

 4. खुल्यावर कचरा न फेकण्यास शेजार्‍यांना प्रेरित करणे,कचर्‍याचे संकलन आणि त्याचे विभाजन करण्यासाठी जवळच्या उद्यान वा खुल्या जागेला निश्चित करणे.

 5. मोहिमेअंतर्गत योजलेल्या कृती आराखड्यामुळे कचरा संकलित केल्या जात असलेल्या जागेकडे जाणार्‍या घन कचर्‍याच्या प्रमाणात कमतरता येईल. शिवाय, कम्पोस्ट खत बनविण्यास आणि कचर्‍यापासून वीज निर्मिती करण्यास सुलभता येणार.

 6. तसेच स्वच्छ भारत अभियानाला 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ही ‘नेबरहुड कृतीयोजना’ देशभरातली सर्व गाव आणि शहरांमध्ये सुरू केले जाणार आहे.

 


 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'दीनदयाळ ऊर्जा भवना'चे 25 सप्टेंबर रोजी लोकार्पण केले. यावेळी त्यांनी प्रत्येक घरात वीज येणार असल्याची घोषणा केली. 
 2. दरम्यान, ' प्रधानमंत्री सहज बिजली योजने'चे (सौभाग्य) त्यांनी उद्घाटन केले. देशातील सुमारे 4 कोटी जनतेला या योजनेंतर्गत मोफत वीज जोडणी उपलब्ध होणार आहे.
 3. पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्याच्या  70 वर्षांनंतरही 4 कोटी लोकांच्या घरात अद्यापही वीज उपलब्ध नाही. थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लाऊन सव्वाशे वर्षे लोटली तरी भारतात आजही अनेकांच्या घरात बल्बचा उजेड नव्हे तर मेणबत्ती, कंदीलाचा उजेडच दिसतो आहे.
 4. याचा परिणाम घरातील महिलांवर होत आहे. या योजनेद्वारे सरकार लोकांच्या घरी येऊन  मोफत वीज कनेक्शन देणार आहे. वीज  कनेक्शनसाठी गरिबांना आता सरकारी कार्यालयांत जाऊन खेटे घालावे लागणार नाहीत.
 5. यासाठी  16 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. वीज जोडणीसाठी कोणत्याही गरीब व्यक्तीला एकही रुपया द्यावा लागणार नाही. गरीबांच्या या सौभाग्याचा संकल्प आम्ही करणार आहोत.
 6. तसेच आर्थिक जनगणनेत ज्यांचे नाव आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. ज्यांचे नाव या योजनेत नाही त्यांना  500 रुपये भरुन या वीज जोडणी घेता येणार आहे.


 1. मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला सागरी महामार्गाचा नव्या वर्षात श्रीगणेशा होणार आहे. 
 2. मुंबईतील पहिला सागरी मार्ग बांधण्यासाठी 17 कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. या प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांची मंजुरी, ना हरकत प्रमाणपत्रही मिळाले आहे. 
 3. निविदा प्रक्रियाही  अंतिम टप्प्यात आहे. या सागरी मार्गामुळे वाहतुकीच्या कटकटीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.
 4.  मुंबईतील  वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी सागरी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली होती. पण मुंबईकरांसाठी असलेल्या या महात्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत अनेक आक्षेपही घेण्यात आले होते. 
 5.  गिरगाव चौपाटीला या प्रकल्पाचा धक्का बसेल म्हणून मुंबई पुरातन वास्तू समितीने यावर आक्षेप घेतला होता. मात्र भू-तांत्रिक सर्वेक्षण सकारात्मक झाल्याने या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. 
 6. सागरी मार्गात तिवरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याने पर्यावरण खात्याची परवानगी मिळवणे पालिकेसाठी आव्हानात्मक ठरले. मात्र काही  अटींवर ही मंजुरी मिळाली. असे सर्व सरकारी अडथळे पार करीत हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.


Top