NASA's New Year Calendar

 1. नासाच्या २०१९च्या वार्षिक कॅलेंडरवर जगभरातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र लावण्यात आली आहेत. या कॅलेंडरच्या मुखपृष्ठावरील चित्र उत्तर प्रदेशातील दिपशिखा हिने रंगवलं असून एकूण तीन भारतीय मुलांनी रेखाटलेली चित्र या कॅलेंडरमध्ये झळकली आहे.
 2. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नासाने बारा महिन्यांचं एक थीम कॅलेंडर काढलं आहे.
 3. अंतराळ विज्ञान ही थीम असलेल्या या कॅलेंडरमध्ये तीन भारतीय विद्यार्थ्यांची चित्र समाविष्ट करण्यात आली आहे.
 4. दिपशिखाने रेखाटलेले अंतरिक्षातील वैज्ञानिक आश्चर्यांकडे कुतुहलाने पाहणाऱ्या मुलीच्या चित्राची निवड मुखपृष्ठासाठी करण्यात आली आहे.
 5. तर महाराष्ट्रातील इंद्रयुद्ध आणि श्रीहन या दोघांनी काढलेल्या चित्रही या कॅलेंडरमध्ये निवडलं गेलं आहे.
 6. अंतराळावीरांचे अंतराळातील आयुष्य आणि कार्य यात रंगवलं आहे.
 7. तर तामिळनाडूतील थेमूकिलिमनने रंगवलेलं स्पेस फूड हे चित्रही या कॅलेंडरमध्ये झळकलं आहे.
 8. याशिवाय जगातील इतर ही देशातील मुलांची चित्र या कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यावर्षी या कॅलेंडरसाठी नासाने चित्रकला स्पर्धाच आयोजित केली होती.


Launch of the country's largest double-decker bridge

चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. युद्धप्रसंगात रणगाडे सुद्धा सहज या पूलावरुन जाऊ शकतात.

पायाभरणीनंतर तब्बल २१ वर्षांनी आज बोगीबील पूलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आसामच्या ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला हा भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल आहे. पाच किलोमीटरच्या या पूलावर रस्ते आणि रेल्वे मार्ग आहे.

बोगीबील पूलामुळे आसामचा दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील ढेमजी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत.

या पूलामुळे चार तासाचा वेळ वाचणार आहे. चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे.

युद्धप्रसंगात रणगाडे सुद्धा सहज या पूलावरुन जाऊ शकतात अशी या पूलाची बांधणी करण्यात आली आहे.

१) बोगीबील पूलाची रचना स्वीडन आणि डेन्मार्कमधल्या पूलासारखी आहे. युरोपियन पूलाच्या धर्तीवर बोगीबील पूलाची बांधणी करण्यात आली आहे.

२) रेल्वे आणि रस्ते मार्ग असलेला आशियातील हा दुसरा सर्वात मोठा पूल आहे. १२० वर्ष या पुलाचे आयुष्य असेल.

३) या पूलाच्या लोअर डेकवर दोन लाईनचा रेल्वे ट्रॅक असेल आणि सर्वात वरच्या डेकवर तीन मार्गी रस्ता असेल. या पूलामुळे दिल्ली ते दिब्रुगड ट्रेन प्रवासाची वेळ तीन तासांनी कमी होणार आहे.

४) ४.९ किलोमीटर लांबीच्या या पूलासाठी ५,९०० कोटी रुपये खर्च आला आहे. आधी ४.३१ किलोमीटरच्या या पूलासाठी ३,२०० कोटी रुपयांचे बजेट होते.

५) २२ जानेवारी १९९७ रोजी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते या पूलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २१ एप्रिल २००२ रोजी या पूलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

६) चीनच्या सीमेजवळ असलेला हा पूल युद्ध प्रसंगात अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या पूलाची बांधणी इतकी भक्कम आहे की, यावरुन रणगाडे सुद्धा सहज जाऊ शकतात तसेच या पूलाच्या तिन्ही मार्गावर एअर फोर्सची लढाऊ विमाने सुद्धा उतरु शकतात.


GI tag to Bihar's 'Silla Khaja' dessert

 1. बिहारच्या ‘सिलाव खाजा’ या मिष्ठान्नाला विशिष्ट भौगोलिक संकेतक म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे.
 2. सिलाव खाजा या पदार्थाची सुरुवात उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील आणि बिहारच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमधून झाली होती.
 3. गव्हाचे पीठ, मैदा, साखर आणि वेलची इत्यादी पदार्थांपासून हे मिष्ठान्न बनवले जाते. सध्या हे मिष्ठान्न बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश इ. राज्यांमध्ये लोकप्रिय आहे.
 4. यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये बिहारच्या ‘शाही लिची’लादेखील यांनाही जीआय टॅग देण्यात आला होता.
 5. भौगोलिक संकेतक (जीआय) -
  1. जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक संकेतक. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
  2. उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी पेटंटची, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक संकेतक (जीआय)ची मान्यता दिली जाते.
  3. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातली उत्पत्ती आणि त्यामुळे विशिष्ट गुणधर्म आणि लौकिक प्राप्त झालेल्या उत्पादनांना जीआय टॅग दिला जातो.
  4. यामुळे उत्पादनाला दर्जा आणि त्या भौगोलिक प्रदेशामुळे निर्माण झालेले वैशिष्ट्य यांची खात्री प्राप्त होते.
  5. एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक संकेतक या नावाने मिळतो.
  6. या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ अथवा वस्तू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
  7. भौगोलिक संकेतक नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
  8. जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक संकेतक नोंदणी कायदा हा एक आहे.
  9. आजवर जगातील १६० देशांनी जीआयला मान्यता दिली आहे. हे संकेतक मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.
  10. २००४मध्ये दार्जीलिंग चहा या उत्पादनातला देशातला पहिला जीआय टॅग मिळाला. भारतात जीआय टॅग मिळालेली एकूण ३२५ उत्पादने आहेत.
  11. एकूण २५ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य आहे.
  12. शेतकरी, विणकर, कारागीर यांना उत्पन्नाची जोड मिळून दुर्गम भागातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांना जीआय उत्पादनामुळे लाभ होऊ शकतो.
  13. पारंपारिक पद्धतीद्वारे आपल्या ग्रामीण कारागीरांकडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आगळे कौशल्य आणि कला येत असते, त्याला प्रोत्साहन देऊन या कलांचे जतनही आवश्यक आहे.
 6. मानांकनाचे फायदे:-
  1. जागतिक बाजारात मुल्यवर्धी.
  2. देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख.
  3. देशांतर्गत बाजारातही योग्य भाव.


Naming the three islands of Andaman and Nicobar Islands

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंदमान आणि निकोबार येथील तीन बेटांचे नामकरण केले. 
 • अंदमान आणि निकोबार येथील निल बेटाचे 'शहीद द्वीप' असे नामकरण केले.
 • अंदमान आणि निकोबार येथील हॅव्हलॉक बेटाचे 'स्वराज द्वीप' असे नामकरण केले.
 • अंदमान आणि निकोबार येथील रॉस बेटाचे नेताजी 'सुभाष चंद्र बोस' बेट असे नामकरण
 1. 30 डिसेंबर 1943 ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटास भेट दिली होती त्या घटनेस 75 वर्ष पूर्ण होत आहेत , त्यानिमित्त हे नामकरण करण्यात येणार आहे.


Aurangabad district is leading in district investment

 1. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या  (डीएमआयसी)  माध्यमातून  देशात उभारण्यात येत असलेल्या चार औद्योगिक शहरांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर ठरले आहे.
 2. आतापर्यंत 50 भूखंड वितरणाच्या माध्यमातून 3600 कोटींची गुंतवणूक पटकाविण्यात शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी यशस्वी ठरली आहे.
 3. ‘डीएमआयसी’च्या माध्यमातून या दोन शहरांदरम्यान चार औद्योगिक क्षेत्रांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
 4. यामध्ये ग्रेटर नोयडा (दिल्ली), उज्जैन (मध्य प्रदेश), ढोलेरा (गुजरात), शेंद्रा-बिडकीन (महाराष्ट्र) या ठिकाणी औद्योगिक शहरे उभारण्याचे काम तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे.
 5. यादरम्यान पहिल्या टप्प्यातील कामे हाती घेऊन उद्योगांना आमंत्रित करण्याचा सिलसिला सुरू झाला.
 6. या आवाहनांना प्रतिसाद देत औरंगाबादलगत अस्तित्वात आलेल्या शेंद्रा येथील औद्योगिक शहराला गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे.
 7. ‘डीएमआयसी’च्या तिन्ही शहरांना भूखंड वितरणाचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
  1. उज्जैनच्या विक्रम उद्योगपुरीमध्ये दोन (भूखंडांचे क्षेत्रफळ – 160,030 चौ.मी.),
  2. गुजरातची ढोलेरा इंडस्ट्रियल सिटी (भूखंडांचे क्षेत्रफळ – 161,874 चौ.मी.)
  3. ग्रेटर नोएडा (भूखंडांचे क्षेत्रफळ – 554,406 चौ.मी.) येथे प्रत्येकी तीन,
  4. औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक) मध्ये 507,164 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 50 भूखंडांची वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.


Top