operation all out of indian army

 1. जम्मू- काश्मीरमध्ये 22 जून रोजी सुरक्षा दलांनी आयसिसच्या जम्मू-काश्मीरमधील म्होरक्यासह चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू- काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यावरची ही पहिलीच मोठी चकमक होती.
 2. केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली असून आगामी काळात लष्करी कारवाया वाढण्याची चिन्हे आहेत.
 3. सुरक्षा दलांनी जम्मू- काश्मीरमधील टॉप 21 दहशतवाद्यांची यादीच तयार केली असून आगामी काळात या दहशतवाद्यांना टार्गेट केले जाणार आहे.
 4. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचे 11, लष्कर-ए-तोयबाचे सात, जैश-ए-मोहम्मदचे दोन आणि अल-कायदाची जम्मूतील संघटना अन्सार गजवत उल हिंद या संघटनेच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे.
 5. या 21 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना ए++ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांवर 12 लाखांचे इनाम आहे.


12 Year old R PRAGNANDA CHESS CHAMPIONSHIP GRANDMASTER

 1. इटलीमधल्या ऑर्टीसेई येथे मास्टर लुका मोरोनीला नमवत आर प्रागनानंदा हा अवघा 12 वर्षांचा भारतीय मुलगा बुद्धीबळातला ग्रँड मास्टर झाला आहे. 
 2. लहान वयात हा किताब मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. हा किताब मिळवणारा सगळ्यात लहान खेळाडू हा किताब हुकल्याबद्दल तुला खंत वाटते का असे विचारले असता, असे अजिबात वाटत नाही असे उत्तर प्रागनानंद किंवा प्रागू याने दिले आहे.
 3. मे 2016 मध्ये प्रागू दहाव्या वर्षी सर्वात तरूण आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला होता. आत्तापर्यंतचा सगळ्यात लहान ग्रँड मास्टर सर्जेई कर्जाकिन असून (12 वर्षे 3 महिने) त्याचा विक्रम प्रागू मोडेल असा अंदाज व्यक्त होत होता.
 4. मात्र प्रागूने हा किताब मिळवला तेव्हा आज तो 12 वर्षे 10 महिन्यांचा आहे. त्यामुळे तो ग्रँड मास्टर होणारा दुसऱ्या क्रमांकाचा तरूण खेळाडू ठरला आहे.
 5. जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन ग्रड मास्टर झाला त्यावेळी त्याचे वय होते 13 वर्षे 4 महिने. तर विश्वनाथ आनंदने हा सन्मान 18व्या वर्षी पटकावला. सगळ्यात तरूण भारतीय ग्रँड मास्टर आत्तापर्यंत परीमार्जन नेगी होता, ज्याने हा किताब 13 वर्षे 4 महिन्याचा असताना पटकावला होता.


bsf ends agrreement with patanjali

 1. आंतरराष्ट्रीय योगदिनाची सुरूवात झाल्यापासून बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या बॅनरखालीच सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) योग शिबीर व्हायचे, पण आता त्यांची जागा ईशा फाउंडेशनने घेतली आहे.
 2. बीएसएफने पतंजलीसोबत करार संपवून आता सदगुरू जग्गी वासूदेव यांच्या ईशा फाउंडेशनशी करार केला आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी जग्गी वासूदेव स्वतः सियाचीनमध्ये जवानांना योग प्रशिक्षण देत होते.
 3. एकाच व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून प्रशिक्षण घ्यावे अशी काही अट नाहीये, असे बीएसएफकडून सांगण्यात आले. आता बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा बीएसएफशी कोणताही करार नाही.
 4. बीएसएफचे डीजी के.के. शर्मा यांनी सांगितले की, बाबा रामदेव यांनी 2016 मध्ये 4 हजार जवानांना प्रशिक्षण दिले, पण आता लष्कर त्यांच्या सेवेचा वापर करत नाही. आता बीएसएफचा बाबा रामदेव यांच्याशी कोणताही करार नाही, आमच्याशी संपर्क करणारे रामदेव पहिले व्यक्ती होते आणि त्यांच्या प्रशिक्षणाचा चांगला फायदाही झाला. पण आता आमचा त्यांच्याशी संबंध नाहीये.
 5. रामदेव देत असलेल्या सेवेप्रमाणे आम्हीही सेवा देऊ, असे अनेक प्रस्ताव आले होते. पण जग्गी वासूदेव यांचे नाव ठरवण्यात आले.
 6. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान यांच्याकडूनही जवानांना प्रसिक्षण दिले जात आहे असेही ते म्हणाले. याप्रकरणी पतंजलीची बाजू ऐकण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने पतंजलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणतही उत्तर आले नाही.


Top