EMISAT SATELLITE

  1. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो येत्या एक एप्रिल रोजी इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सॅटेलाइट एमिसॅटचे प्रक्षेपणकरणार आहे. डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी अत्याधुनिक एमिसॅट उपग्रहाची निर्मिती केली आहे.

  2. तर भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा उपग्रह अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. एमिसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.

  3. तसेच युद्धकाळात हा उपग्रह महत्वपूर्ण ठरेल. सीमेवर तैनात केलेले सेन्सर्स, शत्रूच्या प्रदेशातील रडारच्या हालचाली, त्या प्रदेशाची माहिती आणि नेमकी तिथे किती कम्युनिकेशन उपकरणे सुरु आहेत याची इत्यंभूत माहिती मिळेल असे डीआरडीओचे माजी वैज्ञानिक रवी गुप्ता यांनी दिली आहे.

  4. 436 किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे.

  5. सुरक्षा यंत्रणा ड्रोन, एअरोस्टॅट आणि फुग्यांच्या माध्यमातून शत्रूची शस्त्रास्त्रे आणि हालचालींवर लक्ष ठेवतात. पण त्याला एक मर्यादा आहे.

  6. तसेच इलेक्ट्रॉनिक सॅटेलाइटमुळे त्या भागात मोबाइल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे.

  7. एमिसॅटच्या आधी इस्त्रोने 24 जानेवारीला डीआरडीओचा मायक्रोसॅट-आर उपग्रह प्रक्षेपित केला आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे.


TEJAS FIGHTER PLANE

  1. भारताच्या ‘तेजस’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे.

  2. ‘तेजस’ हे भारताने विकसित केलेले स्वदेशी बनवाटीचे हलके लढाऊ विमान आहे. तसेच मलेशियामध्ये होणाऱ्या एअर शो साठी अन्य 50 विमानांसोबत तेजस क्वालालंपुरमध्ये दाखल झाले आहे.

  3. तर दोन तेजस विमाने मलेशियातील एअर शो मध्ये सहभागी होणार असून आपले कौशल्य सादर करणार आहेत.

  4. मलेशियन सरकारनेच जेएफ-17, एफ/ए-50 या फायटर विमानांसह तेजसची निवड केली आहे असे क्वालालंपुरमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अनिरुद्ध चौहान यांनी सांगितले आहे. तर जेएफ-17 हे चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केलेले तर एफ/ए-50 हे दक्षिण कोरियाने विकसित केलेले फायटर विमान आहे.


CHINUK HELICOPTERS

  1. अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्स देशसेवेत कालपासून दाखल झाले.

  2. तसेच चंदिगडच्या एअऱ फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (3-BRD) येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे.

  3. तर ही चार अॅडव्हान्स डबल रोटर हेलिकॉप्टर्स भारतीय सैन्याला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी आणि इतर वेळी सैन्याच्या पथकांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी वाहून नेण्यासाठी उपयोगात येणार आहेत. या विमानांची पहिली खेप चंदीगडच्या 3-BRD येथे जोडणीसाठी दाखल झाली आहे.

  4. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार हवाई दलाला अशी 15 हेलिकॉपटर्स मिळणार आहेत.

  5. तसेच अति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून नेण्यासाठी सध्या भारताकडे रशियन बनावटीचे Mi-26 ही हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत. त्यानंतर आता चिनुकचीही यात भर पडणार आहे.


Top