MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक रीकव्‍‌र्ह प्रकारात भारताच्या अतानू दाससह तीन खेळाडूंनी मंगळवारी कांस्यपदके जिंकली. याचप्रमाणे किमान तीन रौप्यपदकांची निश्चिती केली.

2. भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यामुळे अतानू हा त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाला होता.

3. तर कांस्यपदकाच्या लढतीत त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहचा 6-5 असा पराभव केला. मग दासने तरुणदीप राय आणि जयंत तालुकदार यांच्या साथीने पुरुष सांघिक गटात चीनचा 6-2 असा पराभव करून दुसरे कांस्यपदक पटकावले.

4. त्यानंतर, महिलांच्या रीकव्‍‌र्ह सांघिक गटात दीपिका कुमारी, लैश्राम बोम्बायला देवी आणि अंकिता भाकट यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कांस्यपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आयसिसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी याला ठार मारण्याच्या अमेरिकी कमांडोजच्या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणाऱ्या कॉनन या श्वानाचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सन्मान केला आहे.

2. या मोहिमेत कॉनन हाच खरा नायक ठरला आहे कारण त्याने बगदादीचा त्याच्या लपण्याच्या जागी जाऊन पाठलाग करीत तो तेथे असल्याची खात्री अमेरिकी कमांडोजना करून दिली होती.

3. बगदादी हा ऑक्टोबरमध्ये मारला गेला होता. अमेरिकी कमांडोजनी त्याच्याविरोधात मोहीम सुरू केली असता त्याने आत्मघाती स्फोट करून स्वत:ला संपवले होते. सीरियातील इडलिब प्रांतात तो लपलेला होता.

4. तर या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणारा कॉनन हा श्वान बगदादीचा माग काढताना जखमी झाला होता.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याच्या नावाचं स्टॅण्ड आता नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर दिसणार आहे.

2. तर मंगळवारी छोटेखानी सोहळ्यात औपचारिक घोषणा करण्यात आली. या स्टेडियमवर बिशन सिंह बेदी, मोईंदर अमरनाथ आणि विराट कोहली यांच्या नावाचं स्टॅण्ड आहे.

3. तर या स्टेडियमच्या एका गेटला वीरेंद्र सेहवाग आणि अंजुम चोपडा यांचे नाव दिलेले आहे.

4. 38 वर्षीय गंभीरनं याच स्टेडियमवरून क्रिकेटची सुरुवात केली. त्यानं भारतासाठी 58 कसोटी, 147 वन डे आणि 37 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयी संघाचा तो सदस्य होता.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर आता इस्रोने नव्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या नव्या मोहिमेमुळे देशाची संरक्षण सज्जता आणखी वाढली आहे.

2. पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे आज प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार कार्टोसॅट-3 सोबत 13 नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण झाले आहे.

3. तसेच पीएसएलव्ही-सी 47 च्या प्रक्षेपण मोहिमेच्या 26 तासांच्या उलटमोजणीला आज सकाळी 7.28 वाजता श्रीहरिकोटात सतीश धवन स्पेस सेंटरवर सुरुवात झाल्याची माहिती इस्रोने दिली होती.

4. तर यंदाच्या वर्षात इस्रो कार्टोसॅट-3 उपग्रह सोडला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने कार्टोसॅट-3 महत्त्वाची भूमिका बजावेल. अवकाशातून भारतीय जमिनीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने कार्टोसॅट-3 चे प्रक्षेपण करण्यात आले.

5. नैसर्गिक आपत्तीची सूचना देण्याचं, विकासकामांना सहाय्य करण्याचं काम हा उपग्रह करेल. यासोबतच देशाच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील कार्टोसॅट-3 पार पाडणार आहे.

6. तर या उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी तळांवर नजर ठेवणं सोपं होणार आहे.

7. पाकिस्तानच्या जमिनीवरील अगदी बारीकसारीक हालचाली टिपण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याचा मोठा फायदा भारतीय सैन्याला होईल.

8. कार्टोसॅट-3 हा कार्टोसॅट मालिकेतील नववा उपग्रह आहे. या उपग्रहातील कॅमेरा अतिशय शक्तीशाली असेल. जमिनीवर असलेल्या माणसाच्या मनगटावरील घड्याळातील वेळ दाखवू शकेल, इतकी क्षमता कार्टोसॅट-3 मधील कॅमेऱ्यात असेल.

9. तसेच फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होतीविविध वातावरणात पृथ्वीची छायाचित्र घेण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्याचं कामदेखील हा उपग्रह करेल.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दीव आणि दमण व दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करून एकच केंद्रशासित बनविण्याचे विधेयक केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेमध्ये सादर केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी हे विधेयक मांडले.

2. जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी केल्यानंतर तीन महिन्यांनी केंद्राने दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्याचे प्रस्तावित केले आहे.

3. नव्या केंद्रशासित प्रदेशाचे नाव ‘दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव’ आणि प्रदेशाचे मुख्यालय दमण आणि दीव असण्याची शक्यता आहे. गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरील या दोन केंद्रशासित प्रदेशाचे एकत्रीकरण हे अधिक चांगल्या प्रशासनाकरिता होणार आहे.

4. सध्या दोन्ही प्रदेश एकमेकांपासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर असूनही दोन्ही प्रदेशांचा वेग‌ळा अर्थसंकल्प आणि वेगळे सचिवालय आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीनंतर देशात सध्या नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 26 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन‘ तसेच ‘भारतीय संविधान दिन‘ म्हणून पाळला जातो.

2. भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला.

3. कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1926 मध्ये झाला.

4. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारताची घटना मंजूर झाली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

5. सन 1997 मध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

6. सन 2008 मध्ये हा दिवस महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.


Top

Whoops, looks like something went wrong.