1. चीन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा पाच वर्षांच्या कालावधीसाठी देशाचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची निवड झाली आहे. त्यांच्या विचारसरणीचा व नावाचा समावेश कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेत करण्यात आला असून त्यामुळे आता ते पक्षाचे संस्थापक माओ झेडाँग व त्यांचे वारसदार डेंग शियाओपेंग यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
 2. क्षी यांची साम्यवादाची संकल्पना ही नवीन काळातील असून, त्याला चीनच्या मूल्यांची डूब दिलेली आहे व त्यांचा समावेश आता पक्षाच्या घटनेत करण्यात आला आहे. माओ यांच्यानंतर क्षी जिनपिंग हे सर्वात शक्तिशाली नेते ठरले आहेत.
 3. कम्युनिस्ट पक्षाच्या आठवडाभर चाललेल्या अधिवेशनामध्ये जिनपिंग यांच्या पक्षप्रमुखपदी निवडीचा निर्णय घेण्यात आला. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेत दुरुस्ती मंजूर करताना त्यात क्षी जिनपिंग यांच्या नव्या साम्यवादी विचारसरणीचा समावेश करण्यात आला आहे, असे चीन कम्युनिस्ट पक्षाच्या १९व्या अधिवेशनात करण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे.
 4. क्षी यांचे नाव त्यांच्या विचारसरणीसह समाविष्ट केल्याने त्यांना माओ व डेंग यांच्याइतकेच राजकीय महत्त्व आले आहे. माओ व डेंग या दोनच नेत्यांचे विचार व नावे पक्षाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आली होती. आता त्यात क्षी जिनपिंग यांची भर पडली आहे.


 1. सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे २४ ऑक्टोबर रोजी निधन झाले, त्या ८८ वर्षांच्या होत्या.
 2. गिरिजा देवी या बनारस घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी 'ठुमरी' या गाण्याच्या प्रकारात त्या पारंगत होत्या. आपल्या याच गुणवैशिष्ट्यामुळे त्या 'ठुमरीची राणी' म्हणून प्रसिद्ध होत्या.
 3. गिरिजा देवी यांना १९७२ मध्ये पद्मश्री किताबाने त्यानंतर १९८९ मध्ये पद्मभूषणने तर २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरवण्यात आले होते.


 1. रियल मॅड्रिड फुटबॉल क्लबमधील पुर्तगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो याला २०१७ सालचा सर्वोत्कृष्ट FIFA पुरुष खेळाडूचा किताब मिळाला.
 2. रोनाल्डोला हा मान सलग दुसर्‍यांदा मिळाला आणि एकूणच पाचवा किताब आहे. यासोबतच पाच वेळा हा किताब मिळवणार्‍या बार्सिलोना क्लबच्या लियोनेल मेसी (अर्जेंटीना) सोबत आता रोनाल्डोचेही नाव घेतले जाईल.
 3. २०१७ सालचा सर्वोत्कृष्ट FIFA पुरुष प्रशिक्षक पुरस्कार जिनेदिन झिदान (रियल मॅड्रिड) याला मिळाला. सर्वोत्कृष्ट FIFA महिला प्रशिक्षक पुरस्कार सरीना विगमन (नेदरलँड राष्ट्रीय संघ) यांना देण्यात आला.
 4. सर्वोत्कृष्ट FIFA गोलरक्षक २०१७ पुरस्कार गियानलुईगी बुफन (इटली राष्ट्रीय संघ) यांना, FIFA पुसकस अवॉर्ड ऑलिव्हर गिरॉड (फ्रान्स राष्ट्रीय संघ) यांना तर FIFA फॅन अवॉर्ड सेल्टिक सपोर्टर यांना मिळाला.
 5. १९०४ साली FIFA ची स्थापना करण्यात आली. याचे झुरिच (स्वीत्झर्लंड) येथे मुख्यालय आहे आणि त्याच्या सदस्यत्वामध्ये आता २११ राष्ट्रीय संघटनांचा समावेश आहे.


Top