Amitabh Bacchan

अमिताभ बच्चन यांना वयाच्या 76 व्या वर्षी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार मिळाविणारे बच्चन 50 वे विजेते आहेत.

या पुरस्काराचे स्वरूप एक सुवर्ण कमळ आणि 10 लक्ष रुपये असे आहे.

अमिताभ यांना हा पुरस्कार 2018 मधील त्यांच्या सिनेमातील योगदानाबद्दल देण्यात आला आहे.

 'सात हिंदोस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. परंतु 'जंजीर' या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले.

 पुरस्काराबद्दल

दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापना केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्सच्या वतीने दरवर्षी हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सादर केला जातो.

"भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रगती आणि विकासात उल्लेखनीय योगदानाबद्दल" प्राप्तकर्त्याचा गौरव केला जातो.

1969 साली सर्वप्रथम हा पुरस्कार भारतीय सरकारने दादासाहेब फाळके यांच्या स्मृतित सादर केला.

फाळके हे "भारतीय सिनेमाचे जनक" म्हणून ओळखले जातात.

या पुरस्काराची प्रथम प्राप्तकर्ता अभिनेत्री देविका राणी ही होती.


Pankaj Advani-Aditya Mehta pair wins World Team Snooker

मंडाले (म्यानमार) येथे खेळविण्यात आलेल्या ‘2019 IBSF जागतिक स्नूकर’ स्पर्धेच्या सांघिक विजेतेपदावर भारतीय जोडीने नाव कोरले. भारताच्या पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता यांनी हे विजेतेपद जिंकले.या विजयासह अडवाणीच्या खात्यावर हे 23वे जागतिक जेतेपद जमा झाले आहे. तर आदित्यचे हे पहिले-वहिले विश्वविजेतेपद ठरले.

 

IBSF विषयी :

- आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ (IBSF) ही अशी संस्था आहे जी जगभरातल्या नॉन-प्रॉफेशनल स्नूकर आणि इंग्लिश बिलियर्ड्स या क्रिडाप्रकारांवर नियंत्रण ठेवते.
-1971 साली “वर्ल्ड बिलियर्ड्स अँड स्नूकर कौन्सिल” या नावाने याची स्थापना झाली, ज्याचे 1973 साली नाव बदलून वर्तमान नाव देण्यात आले.
- संघटनेचे मुख्यालय दुबई (संयुक्त अरब अमिरात) येथे आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.