ramleela maidan will get atal bihari vajpayee name

 1. दिल्लीतील रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे.
 2. तर उत्तर दिल्ली महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून 30 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे.
 3. दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असलेले मैदान म्हणजे रामलीला मैदान.
 4. ब्रिटिशांच्या काळात रामलीला मैदान हा एक मोठा तलाव होता. मात्र, यानंतर तलावात भर टाकून मैदान तयार करण्यात आले.
 5. या मैदानात दरवर्षी रामलीलेचे आयोजन केले जायचे. त्यामुळे मैदानाला रामलीला मैदान असे नाव पडले आहे.


ashoka leyland will develop defence vehicle

 1. हिंदुजा उद्योग समुहाच्या अशोक लेलँड कंपनीला चाक असलेल्या लष्करी वाहनांच्या ‘ट्रॅक्ड व्हेईकल’ श्रेणीतल्या वाहनांसाठीचे कंत्राट प्राप्त झाले आहे.
 2. ही वाहने तयार करण्यासाठी कंपनीने चेन्नईच्या कॉम्बैट व्हेईकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट (CVRDE) सोबत करार केला आहे.
 3. करारामधून मुख्य युद्ध रणगाड्यासाठी 1500 अश्वशक्ती (hp) क्षमतेचे स्वयंचलित ट्रांसमिशन आणि हलक्या वजनाचे क्लच तयार केले जाणार आहे. 


up gov krushi kumbh summit

 1. उत्तरप्रदेश राज्य सरकार 26 ऑक्टोबर 2018 रोजी लखनऊ शहरात ‘कृषी कुंभ आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनी’ आयोजित करणार आहे.
 2. तीन दिवस चालणार्या परिषदेत कृषी क्षेत्रातले ज्ञान आणि कौशल्याचे आदानप्रदान केले जाणार आहेत.
 3.  हा कार्यक्रम शेतकरी, तंत्रज्ञ आणि उद्योजकांना एकल मंच उपलब्ध करून देणार.


myanmar mizima media and prasar bharti has sign agreement

 1. भारताचे प्रसार भारती आणि म्यानमारचे मिझीमा मीडिया ग्रुप दरम्यान माहितीचा प्रसार आणि सामग्री सामायिक करण्यात सहकार्यासाठी आणि सहकारासाठी एक सामंजस्य करार झाला आहे.
 2. कराराच्या मार्फत संस्कृती, मनोरंजन, शिक्षण, विज्ञान, बातम्या आणि क्रिडा अश्या प्रकारच्या विविध विषयांमध्ये माहितीचे आदानप्रदान केले जाणार आहे.
 3. म्यानमार हा आग्नेय आशियातला एक देश आहे.
 4. नॅयपिडॉ हे देशाचे राजधानी शहर असून बर्मीज क्याट राष्ट्रीय चलन आहे.


china has launched joint satellite in space

 1. चीनने 25 ऑगस्ट 2018 रोजी बिदौ (BeiDou) सुचालन (navigation) उपग्रह प्रणालीला बळकट करणारे जुळे उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या पाठविले आहे.
 2. हे उपग्रह चायनिज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इनोव्हेशन अॅकॅडमी फॉर मायक्रोसॅटलाइट्सद्वारे विकसित केले गेले आहेत.
 3. चीनचे ‘बिदौ’ नेटवर्क - चीन सन 2020 पर्यंत जागतिक सुचालन सेवा उभी करण्यासाठी 35 उपग्रहांचे ‘बिदौ’ नेटवर्क तयार करीत आहे.
 4. ‘बिदौ’ नेटवर्कच्या प्रकल्पाला 1994 सालापासून सुरुवात झाली.
 5. ही चिनी सुचालन (navigation) प्रणाली 2018 सालाच्या अखेरीस ‘वन बेल्ट, वन रोड’ (BRI) पुढाकारांतर्गत आशिया ते युरोप आणि आफ्रिका देशांना रेल्वे, सागरी आणि रस्ते क्षेत्रात सेवा देईल.
 6. हे अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) सोबत स्पर्धा करणार.
 7. जगात आतापर्यंत  अमेरिका  (GPS)  आणि रशिया (GLONASS)  ही दोन राष्ट्रे आहेत, जे आपले स्वत:चे सुचालन नेटवर्क चालवतात.


IIT HYDERABAD Has develop special center for the development of electronic chip pr

 1. भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद (IIT-H) या संस्थेनी इलेक्ट्रॉनिक चिप विकास क्षेत्राला चालना देण्यासाठी एक विशेष संगोपन केंद्र (Incubator) सुरू केले आहे.
 2. ‘फॅबलेस चिप डिझाइन इनक्यूबेटर (FabCI)’ नावाचे हे संगोपन केंद्र भारतातले एकमेव असे केंद्र आहे, जे या क्षेत्रातल्या स्टार्टअप यांना अनुकूल पर्यावरण तयार करण्यावर भर देणार.
 3. यामध्ये मोफत इलेक्ट्रॉनिक डिझाइन ऑटोमेशन (EDA) सॉफ्टवेयर प्रदान केले जाणार.
 4. ‘फॅबलेस चिप डिझाइन इनक्यूबेटर (FabCI)’ ला MeitY कडून वित्तपुरवठा केला जात आहे तसेच कॅडेन्स डिझाइन सिस्टीम्स इंक. आणि मेंटर ग्राफिक्स हे तंत्रज्ञान भागीदार आहेत.


Top