Atal Ayushmann Uttarakhand 'launched the scheme

 1. उत्तराखंड या डोंगराळ राज्यात 'अटल आयुषमान उत्तराखंड योजना' याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही योजना भारत सरकारच्या ‘आयुषमान भारत’ योजनेच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आली आहे.
 2. या योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 5 लक्ष रूपयांपर्यंत वैद्यकीय उपचार सेवा दिली जाणार. या योजनेमुळे 23 लक्ष कुटुंबांना फायदा होईल. या योजनेच्या अंतर्गत 1,350 आजारांचा समावेश केला जाणार आहे.
 3. उद्घाटनप्रसंगी देहरादून शहरात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांच्या हस्ते योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेच्या संबंधित ‘गोल्डन कार्ड’चे वाटप करण्यात आले.
 4. आयुष मान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (AB-NHPM) 
  1. ही भारत सरकारकडून वित्तपुरवठा होत असलेली जगातली सर्वांत मोठी आरोग्य सुरक्षा विषयक योजना ठरली आहे. 
 5. योजनेचे स्वरूप -
  1. योजनेच्या अंतर्गत द्वितीय आणि तृतीय श्रेणीतले वैद्यकीय उपचार घेण्यासाठी वर्षाला प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये याप्रमाणे 10 कोटी गरीब व वंचित कुटुंबांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
  2. या योजनेसाठी लागणार्या निधीचा 40% वाटा राज्यांमधून येणार आहे. 
  3. केंद्र सरकार या आरोग्य योजनेसाठी दरवर्षी 5,500 ते 6,000 कोटी रुपये खर्च करणार.
  4. आरोग्य केंद्रांवर सामान्य आजारांसाठी मोफत औषधी उपलब्ध करून दिली जाणार. या केंद्रांवर देशी वैद्यकीय पद्धतींवर भर दिला जाणार आहे. 
  5. या केंद्रांवर योग संबंधी प्रशिक्षणासोबतच युनानी, आयुर्वेद आणि सिद्ध पद्धती संबंधी उपचार उपलब्ध असतील. 
  6. ह्रदयरोग, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार आणि मधुमेह यासारख्या 1,300 हून अधिक आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 
  7. योजनेमधून 2,500 आधुनिक रुग्णालये द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमध्ये उभारले जाणार आहेत. 
  8. देशभरातली 13,000 रुग्णालये या योजनेचा भाग बनलेली आहेत. 
  9. शिवाय देशात 1.5 लक्ष कल्याणकारी केंद्रे (wellness centers) तयार केली जाणार आहेत.


Jagdev Singh Veeradi received the Royal Honor of 'Member of the British Empire'

 1. ब्रिटीश शिख रिपोर्ट (BSR) याचे संपादक जगदेव सिंग वीरदी यांना ‘मेंबर ऑफ ब्रिटिश एंपायर (MBE)’चा रॉयल सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे.
 2. जगदेव सिंग वीरदी यांनी ब्रिटनमधील सिख समुदायाच्या जीवनाबाबत अंतर्दृष्टी प्रदान केली आहे.
 3. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना बंकिंगहॅम पॅलेसमध्ये एका सोहळ्यात प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते हा शाही सन्मान दिला गेला आहे.


SpaceX sent the US Air Force's most powerful GPS satellite

 1. अमेरिकेच्या ‘स्पेसएक्स’ (SpaceX) या खासगी अंतराळ कंपनीने अमेरिकेच्या वायुदलाचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली GPS उपग्रह अवकाशात पाठवला आहे.
 2. ‘व्हेस्पुक्की’ या शृंखलेचा हा पहिलाच उपग्रह आहे.
 3. दि. 23 डिसेंबर 2018 रोजी फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हेरल येथून ‘फाल्कन 9’ अग्निबाणाच्या सहाय्याने हा उपग्रह प्रक्षेपित केला गेला आहे.


Now announcing in the local language at airports

 1. देशातील प्रत्येक विमानतळावर हिंदी आणि इंग्रजीनंतर स्थानिक भाषेतूनही उद्घोषणा कराव्यात, असे निर्देश सर्व विमानतळांना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 2. नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला. 
 3. तर याबाबत विमानतळ प्राधिकरणाने आपल्या नियंत्रणातील सर्व विमानतळांना निर्देश जारी केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 4. यासंदर्भात नागरी विमान वाहतूक विभागाने खासगी विमानतळ चालकांशीही संपर्क साधून स्थानिक भाषेत उद्घोषणा करण्यास सांगितले आहे.
 5. ज्या ठिकाणी प्रवाशांसाठी उद्घोषणा होत नाहीत, त्या  विमानतळांनी हे निर्देश लागू नसतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 6. तसेच विमानतळांनी हिंदी, इंग्रजीसोबत स्थानिक भाषेतही उद्घोषणा कराव्यात, याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रलयाने 2016 मध्ये परिपत्रक काढले होते.
 7. काही संघटनांनी तशी मागणी केली होती. सध्या देशात 100 विमानतळे सुरू आहेत.


The ITI examination is going to be online now

 1. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षा 2019 पासून ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.
 2. भ्रष्टाचारमुक्त परीक्षेसह शिक्षकांचा ताण कमी करून विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कर्नाटक सरकारने ही पाऊले उचलली आहेत.
 3. ऑनलाईन परीक्षेचा निकालही तातडीने लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. कोणत्याही नोकरीसाठी त्यांना आता प्रमाणपत्रांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. 
 4. 2019 मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षेत केवळ इंजिनिअरींग ड्राईंगची लेखी व प्रात्यक्षिक (प्रॅक्‍टीकल) परीक्षा द्यावी लागणार आहे. एक पेपर लेखी असून ड्रॉईंगचाच सराव करावा लागणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानावर अवलंबून आहे.
 5. तसेच या परीक्षेमध्ये गुण वाढीसाठी वशिला लावावा लागायचा. हुशार विद्यार्थ्यांएवढेच इतर विद्यार्थ्यांना गुण मिळू लागल्याने परीक्षा निकालात पारदर्शकता राहिलेली नव्हती.
 6. त्याचा फटका हुशार विद्यार्थ्यांना बसत होता. शासनाने 2017 मध्ये सेमीस्टर परीक्षा, 2018 मध्ये थेट वार्षिक परीक्षा आता त्यामध्ये पुन्हा पारदर्शकता येण्यासाठी 2019 पासून ऑनलाईन परीक्षा सुरु केली आहे.


Top