1. सार्वभौम सुवर्ण कर्जरोखे (Sovereign Gold Bonds) योजनेला आणखी अधिक उद्देश्यपूर्ण बनविण्यासाठी त्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
 2. गुंतवणूकदारांच्या विभिन्न श्रेणीला गुंतवणूकीचे पर्याय देणार अश्या विभिन्न व्याज दरे आणि जोखिम सुरक्षा/देयकांसह SGB च्या विभिन्न पर्यायांची रचना करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी वित्त मंत्रालयाला त्यांच्या कार्यात लवचिकता प्रदान करण्यात आले आहे. यामुळे वित्त मंत्रालय वित्त मंत्रांच्या परवानगीने योजनेच्या वैशिष्ठ्यांमध्ये दुरूस्ती करण्याचे वा सुधारणा जोडण्याचे अधिकार प्रदान करते.

मंजूर केलेल्या तरतुदी 

 1. प्रत्येक वित्तीय वर्षाला गुंतवणूक मर्यादा वाढविण्यात आली असून ती व्यक्तीसाठी 4 किलोग्रॅम, हिंदू अविभाजित कुटुंबासाठी 4 किलोग्रॅम आणि सरकारद्वारा सूचित विश्वस्त संस्था व त्यासारख्या आस्थापनांसाठी 20 किलोग्रॅम याप्रमाणे करण्यात आली आहे.
 2. कमाल मर्यादेची गणना वि  त्तीय वर्षा च्या आधा रावर केली जाईल आणि दुय्य म बाजार पेठांमध्ये व्यापारादरम्यान खरेदी केलेल्या SGB ला समाविष्ट करण्यात येईल.
 3. गुंतवणुकीवरील कमाल मर्यादेत बँका आणि वित्तीय संस्थांद्वारा सुरक्षा म्हणून मालमत्तेला समाविष्ट केल्या जाणार नाही.
 4. SGB मागणीनुसार उपलब्ध होतील.  मागणीनुसारच्या विक्रीसाठी उत्पादनांची वैशिष्ट्ये वित्त मंत्रालयाद्वारा निश्चित केल्या जाईल.
 5. SGB ची तरलता वाढविण्यासाठी योग्य बाजारपेठ तयार करण्यासाठी पुढाकार घेतले जाईल. बाजारपेठ तयार करणारे हे व्या  पारी बँ का किंवा इतर कोणतीही सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना असे शकते. 
 6. सरकार आवश्यकता पडल्यास एजें टना उ च्च क मिशन देण्यास परवानगी देऊ शकते.


 1. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं.
 2. विशेष म्हणजे या स्मारकात कलाम यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. डीआरडीओने या स्मारकाचे बांधकाम केले आहे. स्मारकाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी यावेळी कलाम यांच्या कुटुंबियांशीही संवाद साधला.
 3. स्मारकाच्या उद्घाटनासाठी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथे पोहोचले. स्मारक परिसरात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कलाम यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर त्यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली.
 4. यावेळी मोदींनी ‘कलाम संदेश वाहिनी’ या प्रदर्शनीय बसला हिरवा झेंडा दाखवला. ही बस देशाच्या विविध राज्यांतून जाणार आहे. १५ ऑक्टोबरला ती राष्ट्रपती भवनात पोहोचणार आहे. स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर मोदींनी सभेला संबोधित केलं.
 5. यावेळी त्यांनी ‘नीली क्रांति’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना नौका देण्यासंदर्भातील मंजुरी पत्रेही वितरीत करण्यात आली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी अयोध्या ते रामेश्वरम एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. 


 1. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी राजभवनात पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 2. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची, तर सुशीलकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नितीशकुमार हे सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
 3. राजभवनात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. नितीशकुमार, सुशीलकुमार मोदी यांच्यासह जे. पी. नड्डा हे राजभवनात पोहोचले. नितीशकुमारांनी शपथ घेतल्यानंतर राजभवनात त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
 4. तत्पूर्वी, राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले. महात्मा गांधी सेतूजवळ त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली होती. दरम्यान, राजदच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली.  


Top