मिहाइ टूडोस : रोमानियाचे नवे पंतप्रधान

 1. रोमेनियाचे राष्ट्राध्यक्ष क्लाउस इओहन्निस यांनी मिहाइ टूडोस यांना देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे.
 2. 50 वर्षीय टूडोस हे PSD पक्षाचे राजकारणी आहेत.
 3. ते रोमानियाच्या संसदेचे उप-सभापति, अर्थमंत्री देखील राहलेले आहेत.
 4. रोमानिया हा दक्षिण-पूर्व युरोपियन देश आहे जो ट्रांसिल्वेनियाच्या वनक्षेत्रासाठी ओळखला जातो.
 5.  ज्याच्या सभोवताली कार्पेथियन पर्वतरांगा आहे.
 6. राजधानी :- बुकारेस्ट
 7. चलन :- रोमानियन ल्यू


राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी एक समिती गठित- अध्यक्ष-के कस्तुरीरंगन

 1. वैज्ञानिक डॉ. के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
 2. समितीचे इतर 8 सदस्य आहेत.
 3. गेल्या तीस महिन्यांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत अभ्यास केला जात आहे.
 4. हजारो सूचना, शिफारसी, चर्चासत्र आयोजित करून व्यापक अभ्यासासाठी माहिती गोळा केली गेली आहे.
 5. MyGov व्यासपीठाचा यासाठी वापर करण्यात आला.


सोलो RAAM शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय: श्रीनिवास गोकुळनाथ, अमित समर्थ

 1. रेस अक्रॉस अमेरिका (RAAM) स्पर्धा पूर्ण करणारे भारतातले प्रथम सोलो व्यक्ति म्हणून नाशिक चे आर्मी डॉक्टर श्रीनिवास गोकुळनाथ आणि नागपूरचे डॉक्टर अमित समर्थ यांची नोंद झाली आहे.
 2. रेस अक्रॉस अमेरिका (RAAM) ही जगातली सर्वात प्रतिष्ठित अत्याधिक सहनशक्ती असावी लागणारी सायकल शर्यत आहे.
 3. स्पर्धेदरम्यान विश्रांतीचा दिवस नसतो आणि 12 राज्यांमधून प्रवास होतो.
 4. सोलो शर्यतीसाठी 18-95 वयोगट
 5. अंतर :- 3070 मैल (494 किमी)
 6. गोकुळनाथ(नाशिक) :-  36 वर्ष(वय)  7 वे(क्रमांक)                              11 दिवस आणि 18 तास (कालावधी)  
 7. अमित समर्थ(नागपूर) :- 35 वर्ष(वय)  8 वे(क्रमांक)                             11 दिवस आणि 21 तास(कालावधी)


"आसाम PFI सुधार प्रकल्प" साठी जागतिक बॅंकेसोबत USD 35 दशलक्षचा कर्ज करार

 1. "आसाम राज्य सार्वजनिक वित्तीय संस्थात्मक सुधार प्रकल्प” यासाठी जागतिक बँकेसोबत भारताने USD 35 दशलक्षचा IBRD कर्ज करार केला आहे.
 2. प्रकल्पाचा एकूण खर्च USD 44 दशलक्ष इतका आहे.
 3. उर्वरित रक्कम राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाकडून प्राप्त होईल.
 4. हा प्रकल्प 5 वर्षे राबवला जाईल.
 5. आसाममध्ये अर्थसंकल्पीय अंमलबजावणी आणि कर प्रशासनामध्ये कार्यक्षमतेत अंदाज आणि पारदर्शकता सुधारण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प आहे.


Top