RANGBHUMI DIN

 1. 27 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन‘ म्हणून साजरा केला जातो1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती.

 2. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. 

 3. तर यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान  मिळाला होता.

 4. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत ‘थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली.

 5. तसेच वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके, तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली.

 6. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.


CHIEF SECRETARY

 1. राज्याच्या मुख्य सचिवपदी अखेर यु.पी.एस मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमएमआरडीए, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण अशा विविध ठिकाणी मदान यांनी काम केले आहे.

 2. दिनेशकुमार जैन यांच्या दिल्लीतील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. दिनेशकुमार जैन यांची देशाच्या लोकपालमध्ये बिगर न्यायिक सदस्य म्हणून निवड झाली होती.

 3. सेवाज्येष्ठतेनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, केंद्रात माजी सैनिक कल्याण खात्याच्या सचिव संजीवनी कुट्टी, केंद्रीय महसूल सचिव अजय भुषण पांडे, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांचा क्रम लागतो. यापैकी गाडगीळ यांना यापूर्वीच मुख्यसचिवपद नाकारण्यात आले.

 4. पांडे व कुट्टी हे दोन्ही अधिकारी केंद्रात सचिवपदावर असून राज्यात येण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे मदान, मेहता व संजय कुमार यांच्यातच चुरस होती.

 5. मदान ऑक्टोबरमध्ये तर मेहता सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मुख्यसचिवपदी मुख्यमंत्री कोणाची वर्णी लावतात याकडे प्रशासनाचे लक्ष लागले होते. अखेर मुख्य सचिवपदी यु.पी.एस मदान यांची निवड करण्यात आली आहे. यु.पी.एस मदान 1983 च्या बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत.


JAYA PRADA ENTERED BJP

 1. आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोडांवर मोठ्या प्रमाणात पक्षातंराचे वारे वाहू लागले आहे. भाजपात सध्या पक्षप्रवेश करणाऱ्याची संख्या जास्त आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी 26 मार्च रोजी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

 2. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा भाजपात सामील झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया यावेळी जयाप्रदा यांनी दिली आहे.

 3. जयाप्रदा समाजवादी पक्षाकडून रामपूर मतदार संघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. अभिनेत्री जयाप्रदा यावेळी भाजपाकडून आपले नशीब अजमावणार आहे.

 4. भाजपाचे दिग्गज नेता नेपाल सिंह यांचे वाढते वय आणि आजारपणामुळे त्यांच्या जागी भाजपाला ठोस उमेदवार हवा होता. आता जयाप्रदा यांच्या आगमानामुळे भाजपाची चिंता मिटल्याची चिन्हे आहेत. समाजवादी पक्षाचे आजम खान यांच्याविरोधात जयाप्रदा लढणार आहेत.

 5. जयाप्रदा 2004 आणि 2009 मध्ये रामपूरमधून खासदार म्हणून संसदेत गेल्या आहेत. दोन्ही वेळेस जयाप्रदा यांनी काँग्रेसच्या बेगम नूर बानो यांचा पराभव केला आहे.


Top