western ghat new four species found

 1. या चार पालींचा शोध लागण्यापूर्वी या कुळातील सुमारे १३५ प्रजाती अस्तित्त्वात आहेत.

 2. भारतातील तसेच अमेरिकेतील संशोधकांनी पश्चिम घाटात पालीच्या चार नवीन प्रजातींचा शोध लावला आहे.

 3. निमास्पीस लिमयी, निमास्पीस अजिजा, निमास्पीस महाबली आणि निमास्पीस एम्बोलीएन्सीस अशी त्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या चारही पाली निमास्पीस या कुळातील आहेत.

 4. त्यापैकी ‘निमास्पीस लिमयी’हे नाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे माजी संचालक व वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या नावावरुन ठेवण्यात आले  हे विशेष.

 5. निमास्पीस कुळातील या चार पालींचा शोध लागण्यापूर्वी या कुळातील सुमारे १३५ प्रजाती अस्तित्त्वात आहेत. त्यापैकी २९ प्रजाती या भारतातील आहेत.

 6. अमित सय्यद, रॉबर्ट अलेक्झांडर पायरन आणि आर. दिलीपकुमार या संशोधकांचा त्यांच्या संशोधनावरील पेपर शुक्रवार, २४ ऑगस्टला अमेरिकेतील ‘अॅम्फिबियन अँड रेपटाईल कन्झर्वेशन’मध्ये प्रसिद्ध झाला.

 7. पश्चिम घाटातील या नव्या प्रजातीच्या वर्णनावरून या जनुकांतर्गत येणाऱ्या प्रजातींच्या समृद्धीबद्दल असलेली माहिती अजूनही अपूर्णच आहे, असे मत या संशोधनानंतर संशोधकांनी व्यक्त केले आहे.

 • अफ्रिका तसेच आशियात आढळून येणाऱ्या पालींच्या कुळातील निमास्पीस हे एक कुळ आहे, असे पुण्यातील वन्यजीव संरक्षण आणि संशोधन संस्थेचे संशोधक अमित सय्यद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पश्चिम घाटात अशा प्रजातींचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.                अमित सय्यद यांचे संशोधन

 • अमित सय्यद यांचे पालींवर संशोधन आहे. यातूनच त्यांनी महाराष्ट्रात या चार प्रजाती शोधून काढल्या. त्यांच्यात अनुवंशिक काय फरक आहे हे शोधून काढण्यासाठी त्यांना इतर दोघांनी सहकार्य केले.
 • मागील वर्षीच त्यांनी अमेरिकन जर्नलला हा पेपर दिला. वरिष्ठांनी त्यावर पुन्हा काम करुन शुक्रवार, २४ ऑगस्टला तो प्रसिद्ध केला.


indian mens team has won bronz medal

 1. भारताच्या पुरुष व मिश्र संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागल्यामुळे कास्यंपदकावर समाधान मानावे लागले.
 2. पुरूष संघाला सिंगापूरकडून तर मिश्र संघाला थायलंडकडू न पराभूत व्हावे लागल.
 3. पात्रता फेरीनंतर पुरूष संघ चौथ्या तर मिश्र संघ अग्रस्थानी राहिले होते. सुपर मिश्र संघात उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकला नाही.
 4. भारताच्या पुरूषांच्या 6 सदस्यीय संघामध्ये जग्गी शिवदसानी, राजेश्वर तिवारी, अजय खरे, राजू तोलाणी, देवब्रत, मुजुमदार आणि सुमीत मुखर्जी यांचा समावेश होता.
 5. तसेच दुसरीकडे मिश्र संघामध्ये किरण नाडर, हेमा देवरा, हिमानी खंडेलवाल, बचिराजू सत्यनारायण, गोपीनाथ मण्णा आणि राजीव खंडेलवाल यांनी भारतीय संघाची आघाडी सांभाळली.


neeraj chopra has won gold medal

 1. भारताचे आठवे सुवर्ण : राष्ट्रीय विक्रम नोंदवत मिळवले यश
 2. युवा नीरज चोप्रा आशियाई स्पर्धेमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना ८८.०६ मीटरच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे यंदाच्या आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारतीय संघाचा ध्वजवाहक म्हणून भूमिका निभावल्यानंतर नीरजने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना भारताला सुवर्ण यश मिळवून दिले.
 3. चीनच्या लियू क्विझेनने रौप्यपदक पटकावले, पण नीरजच्या तुलनेत तो बराच पिछाडीवर आहे. त्याने ८२.२२ मीटर अंतर गाठले.
 4. पाकिस्तानचा अरशद नदीमने ८०.७५ मीटर भालाफेक करीत कांस्यपदकाचा मान मिळवला.
 5. राष्ट्रकुल व सध्याच्या आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन नीरजने सुरुवातीपासून वर्चस्व कायम राखले आणि त्याने स्वत:च्या राष्ट्रीय विक्रमामध्येही सुधारणा केली. त्याने मे महिन्यात डायमंड लीग सीरिजच्या पहिल्या टप्प्यात दोहामध्ये ८७.४३ मीटर अंतरासह विक्रम नोंदवला होता.
 6. विशेष म्हणजे, आशियाई स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये नीरजचा अपवाद वगळता अन्य स्पर्धकांना यंदाच्या मोसमात ८५ मीटरचे अंतर गाठता आले नव्हते. 
 7. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयशी ठरल्यानंतर नीरजने तिसऱ्या प्रयत्नात निर्णायक फेक करत मारली बाजी
 8. नीरजचे सुवर्णपदक आशियाई स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचे केवळ दुसरे पदक आहे. यापूर्वी १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे गुरतेज सिंगने कांस्यपदक पटकावले होते.
 9. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरलेल्या नीरजने तिसºया प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने पहिल्या प्रयत्नात ८३.६ मीटर भालाफेक केली तर दुसºया प्रयत्नात त्याचा फाऊल झाला.
 10. चिनी तैपईचा चाओ सुन चेंग याला नीरजचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानले जात होते. त्याने गेल्या वर्षी ९१.३६ मीटर अंतराची जबरदस्त भालाफेक केली होती, पण चेंग याला यावेळी ७९.८१ मीटर अंतराची भालाफेक करता आली.
 11. यामुळे त्याला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. नीरजच्या नावावर ज्युनिअर विश्वविक्रमाची (८६.९४ मीटर) नोंद आहे. त्याने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये ८६.४७ मीटरसह सुवर्णपदकाचा मान मिळवला होता.
 12. दोहामध्ये त्याने ८५ मीटरचे अंतर पार केले होते आणि आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी फ्रान्स व फिनलँडमध्ये त्याने अनुक्रमे ८५.१७ व ८५.६९ मीटर भालाफेक केली होती. हेच सातत्य कायम राखत आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने आपला दबदबा निर्माण केला.


improvement of climate european space agency has launched eolas sattelite

 1. हवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी युरोपीयन स्पेस एजन्सी (ESA) कडून ‘एओलस उपग्रह’ पृथ्वीच्या कक्षेत पाठविण्यात आला आहे.
 2. 1360 किलो वजनी ‘एओलस उपग्रह’ पृथ्वीचा शोध घेण्याच्या उद्देशाने क्रांतिकारक लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून, जगभरात वाहणार्या वार्याचे मोजमाप घेणार आहे.
 3. ज्यामुळे वातावरणाविषयीचा अभ्यास करता येणार आणि हवामानाविषयी अंदाज देखील सुधारेल.


on biodiesel first airoplane of india

 1. भारताच्या पहिल्या जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाचे 27 August ला यशस्वी उड्डाण झाले. डेहराडून येथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले.
 2.  स्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने हे चाचणी उड्डाण केले.
 3.  या विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के बायो फ्युएल (जैव इंधन) वापरण्यात आले होते. या इंधन प्रकाराची विमानोड्डाण चाचणी यशस्वी झाल्यानंतर याचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो.
 4.  जेट्रोफा या वनस्पतींच्या बियांपासून हे इंधन तयार करण्यात आले आहे.
 5. यापूर्वी फक्त अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानंतर आता भारतानेही हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
 6.  हे आव्हान पूर्ण करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला आहे.
 7.  १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे जैव इंधन धोरण जाहीर केले होते. त्यावर काल यशस्वीरीत्या अंबलबजावणी करण्यात आली.


Top