Scientists use Twitter and artificial intelligence to provide full preview

 1. पूराची पूर्वसूचना प्रदान करण्यासाठी शास्त्रज्ञ ट्विटर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत आहेत
 2. पुरामुळे धोक्यात येणार्‍या क्षेत्रांमधील लोकांना लवकरात लवकर पुराची पूर्वसूचना प्रदान करण्यासाठी शास्त्रज्ञ ट्विटर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक नवी प्रणाली विकसित करीत आहेत.
 3. ब्रिटनमधील ड्युन्डी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे दर्शवून दिले आहे कि, कसे मोबाइल अॅपच्या माध्यमातून ट्विटर आणि लोकांकडून माहिती प्राप्त करून घेऊन शहरी भागांमध्ये पुराची पूर्वसूचना प्रदान करण्यासाठी हायपर-रिजोल्यूशन मॉनिटरिंग यंत्रणेचे निर्माण केले जाऊ शकते.

 

तुम्हाला हे माहित आहे का?
 1. प्रणालीचे महत्त्व:-
  1. हवामान खात्याकडून संकलित केल्या गेलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात किचकटपणा असल्यामुळे शहरी भागांमध्ये पुराचा अपेक्षित धोका ओळखणे अवघड असते.
  2. त्यामुळे विविधांगी अडचणी निर्माण होतात.
  3. ही समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जाऊ शकतो याबाबत शोध केले जात आहे.   
  4. 2015 साली एका महिन्यासाठी 'फ्लड', 'इन्यूनडेशन', 'डॅम', 'डाइक' आणि 'लेवी' या डेटा फिल्टरिंग कीवर्डचा वापर ट्विटरवर उपलब्ध माहिती गोळा करण्यासाठी केला गेला होता.
  5. त्या कालावधीत 7,500 हून अधिक ट्वीट्सचे विश्लेषण केले गेले.
  6. याशिवाय मायकोस्ट (MyCoast) या मोबाइल अॅपचा वापर पुराच्या प्रतिमा संकलित करण्यासाठी केला गेला.
 2. मायकोस्ट :-
  1. मायकोस्ट हे वापरकर्त्यांकडून पोस्ट केल्या जाणार्‍या प्रतिमांमधून पुराच्या दृश्यांना स्वयंचलित पद्धतीने ओळखण्यासाठी बनविण्यात आलेले एक मोबाइल अॅप आहे.
  2. मायकोस्ट ही एक अशी प्रणाली आहे, ज्याचा उपयोग विविध किनारी धोके किंवा घटनांसंबंधी कित्येक पर्यावरण संरक्षक संस्थेद्वारा 'नागरिक शास्त्र (सिटीजन सायन्स)' माहिती एकत्र करण्यासाठी केली जाते.
  3. या प्रणालीमध्ये पुराच्या 6,000 प्रतिमा आहेत, ज्यांना मोबाइल अॅपच्या माध्यमातून एकत्र केले गेले होते.


Tirthahalli taluka in Karnataka once again known as Maakad Tapa

 1. कर्नाटकमधील तीर्थहल्ली तालुका पुन्हा एकदा माकड तापाच्या विळख्यात सापडला आहे.
 2. कर्नाटकमधील तीर्थहल्ली तालुका पुन्हा एकदा माकड तापाच्या विळख्यात आले आहे.
 3. माकड तापाला क्यासनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) म्हणून ओळखले जाते.
 4. KFD वरील लस पाच किलोमीटरच्या परिसरात राहणार्‍या लोकांना दिली गेली आहे, जेथे माकडांच्या मृत्यूंची नोंद झाली. 
 5. वर्ष 2017-18 मध्ये, तीर्थहल्ली तालुक्यातील 35,000 हून अधिक लोकांना लस देण्यात आली.
 6. वर्ष 2016-17 मध्ये, तिर्थहल्लीमध्ये KFD मुळे चार व्यक्तींचे निधन झाले आणि 48 प्रकरणे येथे नोंदवली गेलीत.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. माकड ताप:-
  1. मार्च 1957 मध्ये कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील क्‍यासनूर गावात पहिल्या रुग्णाची तेथे नोंद झाली. त्यावरून त्याला क्‍यासनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) असे नाव पडले. अद्याप तरी माकड तापावर विशिष्ट प्रकारचे औषध वा लस उपलब्ध नाही. जवळपास 700 वर्षांपूर्वीपासून हा आजार अस्तित्वात आहे. जनावरांमध्ये प्रामुख्याने माकडांमुळे याचा प्रादुर्भाव होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
  2. माकड तापाची लक्षणे असलेल्या माकडाच्या शरीरावरील पिसवा (tick) मानवाला चावल्यास माकडाच्या रक्तातील विषाणू मानवाच्या रक्तात संक्रमित होतात.
  3. तसेच त्या आजाराने मृत्यू झालेल्या माकडाला हाताळल्यास माणसामध्ये ते विषाणू येतात. परंतु हा आजार संसर्गजन्य नाही.
 2. लक्षणे -
  1. 12 दिवस अथवा अधिक काळ उच्च ताप असणे,
  2. डोक्‍याच्या पुढील भागात तीव्र दुखणे,
  3. नाक, घसा, हिरड्यांतून क्वचितप्रसंगी रक्तस्राव,
  4. अतिसार,
  5. विष्ठेतून रक्त पडणे,
  6. सांधेदुखी,
  7. अशक्तपणा,
  8. शारीरिक श्रम करण्यास असमर्थता,
  9. पांढऱ्या पेशी व प्लेटलेटसचे प्रमाण अत्याधिक खालावणे,
  10. तापाची लक्षणे वरचेवर आढळून येणे.
  11. हा कालावधी साधारणता दोन-चार आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक असतो. 
 3. उपाय योजना –
 4. माकड तापापासून बचाव करण्यासाठी आवश्‍यक तेव्हा आरोग्य विभागाकडून पूरक औषधयोजना केली जाते.
 5. लसीकरण, प्रतिबंधात्मक कपडे, पिसवांचे निर्मूलन, डास नियंत्रण आणि जंगल परिसरात कामाशिवाय जाणे टाळणे आदी उपाय या आजाराला रोखू शकतात.
 6. नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो.
 7. जंगल परिसरात वावरणारे शेतकरी, वन कर्मचारी व सर्वसामान्यांना या आजाराचा धोका अधिक असतो. 


1.25 billion years ago, photosynthesis first became: a study

 1. जगातले सर्वात प्राचीन शेवाळचे जीवाश्म जवळपास एक अब्ज वर्ष जुने असल्याचे संशोधनातून आढळून आले.
 2. त्यासंदर्भात केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, वनस्पतीमध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची (photosynthesis) प्रक्रिया अंदाजे 1.25 अब्ज वर्षांपूर्वी पहिल्यांदा सुरू झाली असावी.
 3. याव्यतिरिक्त, संशोधकांना असेही आढळून आले की, जेव्हा फार पूर्वी प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेस सक्षम अश्या सामान्य जीवाणूंनी युकेरियॉट आच्छादलेले असताना प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया जिथे होते त्या वनस्पतीच्या पेशीची संरचना म्हणजेच ‘क्लोरोप्लास्ट’ तयार झाले होते.
संशोधनाचे महत्त्व
 1. संशोधकांकडून 1990 साली आर्कटिक कनाडामध्ये 'बँगियोमोर्फा प्यूबेसींस' नामक शेवाळच्या जीवाश्म शोधले गेले होते.
 2. या सूक्ष्मजीवाला आधुनिक वनस्पतींचे पूर्वज मानले जाते.
 3. पूर्वी याचे वय 72 कोटी ते 1.2 अब्ज वर्षादरम्यान असल्याचे मानले जात होते.
 4. 1.8 ते 0.8 अब्ज वर्षांपूर्वी पहिलेचा पृथ्वीचा इतिहास, ज्याला 'बोरिंग बिलियन' म्हणून ओळखतात, यात सत्यता दिसून येत आहे.
 5. मानले जात होते की त्या काळात पृथ्वीवर जीवनाचा विकास धीमा झालेला होता.
 6. आता या नव्या शोधानुसार, त्या काळातच किचकट जीव संरचनेच्या विकासाचा पाया उभारला गेला होता याची पुष्टी झाली.
 7. कॅनडाच्या मॅक गिल विवीच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासानंतर हा शोध वनस्पती आणि प्राण्यांसह पेशीयुक्त जीवांच्या म्हणजेच युकेरियॉट्सच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीबाबत अधिक स्पष्ट आकलन करण्यासाठी संशोधकांना सक्षम करणार आहे.


Organized 'Asia-India Pravasi Bharatiya Divas' in Singapore in January 2018

 1. जानेवारी 2018 मध्ये सिंगापूरमध्ये दोन दिवसीय ‘ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस’ आयोजित करण्यात येणार आहे.    
 2. शिवाय 25-26 जानेवारीला ASEAN-भारत भागीदारीचे 25 वे वर्ष आहे. 
 3. हे वर्ष चिन्हांकित करण्यासाठी ‘अँसीयंट रूट, न्यू जर्नी: डायस्पोरा इन द डायनॅमिक ASEAN-इंडिया पार्टनरशिप’ या विषयाखाली एका शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
 4. शेजारी राष्ट्रांसह व्यावसायिक आणि राजकीय संबंधांना अधिक व्यापक करण्यासाठी आणि परदेशासंबंधी धोरणांना आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने भारत योजनेचे क्रियान्वयन करणार आहे.
 5. ‘प्रवासी भारतीय दिवस (PBD)’ भारताच्या विकासात परदेशी भारतीय समाजाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो.
 6. हा दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी आयोजित केला जातो.
 7. हा दिवस दक्षिण आफ्रिकेमधून भारतात महात्मा गांधी यांच्या परतीच्या प्रसंगाला स्मरून साजरा करण्यात येतो.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (Association of Southeast Asian Nations -ASEAN)
  1. स्थापना : 8 ऑगस्ट 1967
  2. हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करते.
  3. सदस्य:
   1. ब्रुनेई दरुसालेम,
   2. कंबोडिया,
   3. म्यानमार,
   4. मलेशिया,
   5. फिलीपीन्स,
   6. सिंगापूर,
   7. लाओ PDR,
   8. इंडोनेशिया,
   9. थायलंड,
   10. व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे.
  4. याची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली.
  5. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.

 


Jayaram Thakur elected as the 14th Chief Minister of Himachal Pradesh

 1. ऐतिहासिक रिज मैदानावर हिमाचल प्रदेशचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांनी बुधवारी शपथ घेतली.
 2. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ५२ वर्षीय ठाकूर यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
 3. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व इतर नेते उपस्थित होते.
जयराम ठाकूर यांचे मंत्रिमंडळ 
 1. हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतलेले ठाकूर यांच्या रुपाने मंडी जिल्ह्य़ाला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले.
 2. ठाकूर यांच्यासह १२ मंत्र्यांनी शपथ घेतली.
 3. रोमेश धवला व नरिंदर बरगटा या ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
 4. बिलासपूर व हमीरपूर या दोन जिल्ह्य़ांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
 5. मंत्रिमंडळात सहा नवे चेहरे आहेत.
 6. राजीव बिंदल हे विधानसभा अध्यक्ष असतील.
 7. शपथविधी समारंभाच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
 8. नवे मंत्री-
  1. मोहिंदर सिंह,
  2. कृष्णन कपूर,
  3. सुरेश भारद्वाज,
  4. अनिल शर्मा,
  5. सरवीन चौधरी,
  6. रामलाल मकरंद,
  7. विपीन परमार,
  8. वीरेंद्र कन्वर,
  9. गोविंद ठाकूर,
  10. राजीव सैझल  
  11. विक्रम सिंह


'PETA Person of the Year' - Anushka Sharma

 1. 'पेटा पर्सन ऑफ द इयर' या किताबाने अनुष्काला सन्मानित करण्यात आले आहे.
 2. लग्नाच्या दिवसांपासूनच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चर्चेत असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लग्नानंतर त्यांच्या दिल्ली आणि मुंबईमधील रिसेप्शनचे फोटो व्हायरल होत आहेत.
 3. अनुष्कासाठी याच आनंदाच्या क्षणात अजून एक गोड बातमी आली आहे.
 4. ती म्हणजे 'पेटा पर्सन ऑफ द इयर' या किताबाने अनुष्काला सन्मानित करण्यात आले आहे.
 5. अनुष्काला याआधी पेटाने २०१५ मध्ये हॉटेस्ट वेजीटेरियन सेलिब्रिटी हा पुरस्कार दिला होता.
 6. प्राण्यांच्या समस्यांवर अनुष्का सातत्याने काम करताना दिसते.
 7. सोशल मीडियाच्या मदतीने याबद्दल ती जागरुकताही निर्माण करते.
 8. घोड्यांना योग्य आहार दिला जात नसून त्यांच्याकडून अतिरिक्त काम करुन घेतले जाते, ज्यामुळे ते जखमी होतात.
 9. यामुळेच अनुष्काने मुंबईत सुरू असणाऱ्या घोडेस्वारीचाही विरोध केला होता.
 10. पेटाचे सेलिब्रिटी पब्लिक रिलेशन असोसिएट डायरेक्टर सचिन बांगेला यांनी म्हटले की, सर्वांनाच शाकाहारी आणि पोषक आहार घेण्याचा सल्ला पेटा देत असते.
 11. कोणता आहार तुम्ही करता हे फार महत्त्वाचे असते.
 12. भाजीपाला सुदृढ आरोग्यासाठी अधिकाधिक खायला हवा.
 13. बांगेरा पुढे बोलताना म्हणतात की, अनुष्का शुद्ध शाकाहारी असून ती नेहमीच शाकाहारी आहार घेत असून, इतरांनाही शाकाहारासाठी प्रवृत्त करीत आली आहे.


Guatemala announces to move its embassy to Jerusalem

 1. ग्वाटेमालाने आपले दूतावास जेरुसलेममध्ये हलविण्याची घोषणा केली
 2. ग्वाटेमाला सरकारने तेल अवीवमधील देशाचे दूतावास जेरुसलेममध्ये हलविण्याची घोषणा केली आहे.
 3. ग्वाटेमाला हा विवादित जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला समर्थन देणार्‍या देशांमध्ये समाविष्ट आहे.
 4. शिवाय मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नौरु, पलाउ, टोगो आणि इस्रायल या देशांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी मानण्यास समर्थन देत आहेत.
 5. जेरुसलेम राजधानीचे ठिकाण करण्यावरून इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात दीर्घकाळापासून विवाद सुरू आहेत.
 6. दोन्ही देश जेरुसलेम हा आपल्या देशाचा भाग असून आपली राजधानी असल्याचा दावा वारंवार करीत आहेत.
 7. यहुदी धर्म, इस्लाम व ख्रिश्चन धर्माचे मुख्य ठिकाण म्हणून जेरुसलेम शहराची ओळख असल्याने हा आंतरराष्ट्रीय विवादाचा मुद्दा बनत आहे.
 8. ग्वाटेमाला हा मध्य अमेरिकेत स्थित एक देश आहे.
 9. या देशाची राजधानी ग्वाटेमाला शहर आहे.
 10. चलन ग्वाटेमेलन क्विटझल हे आहे.
 11. ग्वाटेमाला आपल्या समृद्ध जैविक आणि अतिविशिष्ट परिस्थितीमुळे जैव विविधतेसाठी प्रसिद्ध आहे.


Top