99th All India Marathi Natya Sammelan in Nagpur will be held in Nagpur

 1. 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान नागपूरला मिळाला आहे. 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन रंगणार आहे.
 2. संमेलनाच्या आयोजनासाठी प्रस्ताव सादर केलेल्या राज्यातील सात इच्छुक संस्था आणि शाखांनी माघार घेतल्यामुळे लातूर व नागपूर या दोन पैकी कुठल्या स्थळावर शिक्कामोर्तब होणार? याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले होते.
 3. अखेर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मायभूमी असलेल्या नागपूर या स्थळाला गुरूवारी हिरवा कंदिल दाखविला.
 4. आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी नागपूर, महाबळेश्वर, चिपळूण, पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते.
 5. मात्र पुढील वर्षीचा निवडणुकीचा हंगाम पाहता सात संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतल्यामुळे केवळ लातूर आणि नागपूर या दोन स्थळांचा विचार होणार आहे.
 6. संमेलन आयोजनाच्या शर्यतीत असलेल्या लातूरकरांनीच दुष्काळाची पार्श्वभूमी पाहता प्रस्ताव मागे घेतल्यामुळे नागपूरकरांना संमेलन आयोजनाचा मान मिळाला असल्याचे समजते. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
 7. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ही मायभूमी आहे.
 8. नागपूरकरांना संमेलनाचा मान मिळाल्यामुळे निवडणुकीच्या हंगामात संमेलनातच राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याची संधी चालून आली आहे.
 9. यातच मध्यवर्ती नाट्य परिषदेला संमेलनाचा दर्जाही टिकवून ठेवायचा आहे, या दोन्ही गोष्टी या आयोजनातून साध्य होणार असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे.
 10. विशेष म्हणजे, यंदाचे साहित्य आणि नाट्य संमेलन दोन्हीही विदर्भात होत आहे. त्यामुळे साहित्य आणि नाट्य या दोन्हींचा आस्वाद विदर्भवासियांना घेता येणार आहे.


'Foreign Direct Investment (FDI) policy-2011' on e-commerce sector

 1. 2017 सालच्या ई-वाणिज्य क्षेत्राबाबत थेट परकीय गुंतवणूक (FDI) संबंधी धोरणाविषयीच्या मार्गदर्शकांचे पुनरावलोकन केले आहे. देशांतर्गत व्यवसायांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या हेतूने हे करण्यात आले आहे.
 2. धोरण बिजनेस-टू-बिजनेस (B2B) ई-वाणिज्य क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणूक (FDI) करण्याची परवानगी देते.
 3. काही मुख्य मार्गदर्शके पुढीलप्रमाणे आहेत ई-वाणिज्य कंपन्यांना ज्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे, अशा कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यास बंदी आहे.
 4. ई-वाणिज्य कंपन्यांना उत्पादनांच्या विशेष विक्रीसाठी कोणताही करार करण्यास परवानगी नाही.
 5. बाजारपेठेमधील समूह कंपन्यांद्वारे खरेदीदारांना दिली जाणारी कॅश बॅक सुविधा योग्य आणि भेदभाव-हीन असावी.
 6. ई-वाणिज्य कंपन्यांकडून प्रदान केल्या जाणार्या बाजारपेठेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वस्तूच्या किंवा सेवेच्या विक्री किंमतीवर प्रभाव पडणार नाही आणि व्यवसायिकता राखली जाईल.


Bimal Jalan: Head of the Expert Committee on RBI's reserve fund

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचा राखीव निधी (capital reserve) जास्तीत जास्त किती असावा याची निश्चिती करण्यासाठी सहा जणांची एक तज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे.
 2. ही समिती RBIचा आर्थिक भांडवल आराखडा निश्चित करणार आहे.
 3. RBIचे माजी गव्हर्नर बिमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून राकेश मोहन हे समितीचे उपाध्यक्ष आहेत.
 4. शिवाय सुभाषचंद्र गर्ग (आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव), एन. एस. विश्वनाथन (RBIचे डेप्युटी गव्हर्नर), भरत दोशी, सुधीर मानकड हे समितीचे अन्य सदस्य आहेत.
 5. या समितीला 90 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
 6. डॉ बिमल जालन-
  1. कार्यकाळ- 22-11-1997 to 06-09-2003

  2. भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते, बँकिंग सचिव, अर्थ सचिव, नियोजन आयोगाचे सदस्य सचिव आणि पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉ बिमल जालन यांनी काम केले आहे.

  3. त्यांनी आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या कार्यकारी मंडळांवर भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

  4. आपल्या कार्यकाळात, भारताने आशियाई संकटांना तोंड दिले आणि उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांच्या फायद्यांचे एकत्रीकरण पाहिले.

  5. चलनविषयक धोरणाची प्रक्रिया बदलली गेली आणि केंद्रीय बँक संप्रेषणांनी पारदर्शकता दिशेने एक बदललेली धोरणे चिन्हांकित केली.

  6. या कालावधीत बँकिंग क्षेत्र मजबूत करण्यासाठी, नवीन संस्था स्थापन करण्यास आणि नवीन साधने सादर करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत.

  7. कालांतराने भरणा आणि परकीय चलन, कमी चलनवाढ आणि कमी व्याज दर असे या कालावधीचे वर्णन केले गेले आहे.

  8. books-

   1. "The Future of India"
   2.  "India's Politics: A View from the Backbench",
   3. "The Future Of India: Politics, Economics, And Governance"
   4. "The Indian Economy: Problems And Prospects"
   5.  "India's Economic Policy"
   6. "Emerging India: Economics, Politics and Reforms"
   7. "India's Economic Crisis: The Way Ahead".


Australia's Ricky Ponting joins ICC Cricket Hall of Fame

 1. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा ‘ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम’ यामध्ये समावेश करण्यात आला.
 2. यासह हा सन्मान लाभणार्या 25 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये रिकी पाँटिंगचा समावेश झाला आहे.
 3. ICC हॉल ऑफ फेमचा मानकरी व माजी सहकारी ग्लेन मॅकग्राने पाँटिंगला याबाबतची मानाची टोपी प्रदान केली.
 4. मेलबर्नमध्ये चालू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसर्या कसोटी सामन्यादरम्यान हा सोहळा संपन्न झाला.
 5. जुलैमध्ये भारताचा राहुल द्रविड (माजी कर्णधार) व इंग्लंडची क्लेरे टेलर (महिला क्रिकेटपटू-यष्टीरक्षक) यांना ICC वार्षिक समारंभात ‘ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम’ सन्मान जाहीर केला गेला.
 6. रिकी पाँटिंग तीनदा ICC विश्वचषक जेतेपदाचा साक्षीदार ठरला असून, त्यापैकी दोनदा ते स्वतः कर्णधार होते.
 7. कारकीर्द- 
  सामने धावा शतके
कसोटी 168 13378 41
एकदिवसीय 375 13704 30


atal bhashantar scheme

 1. ‘अटल भाषांतर योजना’ (परराष्ट्र कल्याण मंत्रालयाची योजना)
 2. उद्देश -
  1. देशात पूर्णप्रशिक्षित परकीय दुभाषी तयार करण्यासाठी योजना
 3. अरबी, चीनी, फ्रेंच, जपानी, रशियन आणि स्पॅनिश भाषांचे हिंदीत भाषांतर करणारा (वा त्याविरुद्ध क्रिया करणारा) व्यक्ती यांना प्रशिक्षित करण्याची योजना.
 4. निवड प्रक्रियेद्वारे परदेशी भाषांमध्ये प्रत्येकी एक उमेदवार निवडला जाईल.
 5. भाषा ज्ञानासाठी परदेशात नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये सरकारी खर्चाने प्रशिक्षण.
 6. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर यशस्वी उमेदवाराला पाच वर्षांच्या कालावधीसाठी परराष्ट्र कल्याण मंत्रालयाकडून परकीय दुभाषी म्हणून नियुक्ती.
 7. योजना पात्रता-
  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची निर्दिष्ट 6 भाषेपैकी एका भाषेत किमान पदवी
  2. हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व
  3. वय वर्षे 21 ते 26


Top