National Science Day: 28 February

 1. प्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संपूर्ण भारतात 28 फेब्रुवारी 2018 रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जात आहे. या निमित्त, देशभरातील विविध भागातील संशोधन संस्था त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत.
 2. यावर्षी 'शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान (सायन्स अँड टेक्नोलॉजी फॉर सस्टेनेबल फ्यूचर)' या विषयाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 
 3. या दिवसाचे महत्त्व:- 
  1. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या माध्यमातून देशातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक अनुप्रयोगांचे महत्त्व याविषयी संदेश पसरविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
  2. या दिनाच्या माध्यमातून पुढील प्रयत्न केले जातात.
  3. मानव कल्याणासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात होणारी कार्ये, प्रयत्न आणि यश यांचे प्रदर्शन मांडले जाते.
  4. सर्व संबंधित मुद्द्यांवर आणि विज्ञानाच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान अंमलात आणण्याविषयी चर्चा केली जाते.
  5. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणार्‍या देशातील नागरिकांना संधी प्रदान केली जाते.
  6. लोकांना यासंबंधी प्रोत्साहित केले जाते तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रचार केला जातो.
‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’
 1. पार्श्वभूमी व इतिहास:-
 2. राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संपर्क परिषदेने (NCSTC) 1986 साली भारत सरकारला 28 फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जावा यासाठी प्रस्ताव सादर केला होता.
 3. प्रस्तावाच्या मंजूरीनंतर भारतात 28 फेब्रुवारी 1987 रोजी पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
 4. डॉ. सी. व्ही. रमण यांना त्यांच्या रमन इफेक्ट सिद्धांतासाठी 1930 साली भौतिकशास्त्रातले नोबेल पारितोषिक देण्यात आले.
 5. “प्रकाशाचे फोटॉन किंवा क्वांटम (प्रकाश मोजण्याचे प्रमाण) यांना त्यांच्या ऊर्जेच्या उच्च पातळीवर घेऊन गेल्यास प्रकाश किरणे विखंडीत होऊन फैलावतात” हा सिद्धांत आणि त्याचे विश्लेषण आणि प्रमाणीकरण व त्यामधील सुधारणा यांचा घन, द्रव आणि वायू तसेच त्यांच्या घटकांचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जातात.


'Agenda 2030 for Children: and Violence Solutions' Summit concludes

 1. स्वीडनच्या स्टॉकहोम शहरात 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी या दोन दिवसात ‘अजेंडा 2030 फॉर चिल्ड्रेन: एंड व्हायलन्स सोल्यूशन्स’ शिखर परिषद पार पडली.
 2. परिषदेत मांडण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये बालकांवर होणार्‍या हिंसाचाराला रोखण्यासाठी वापरात आणल्या जाणार्‍या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली.  
 3. स्पष्ट करण्यात आलेली माहिती:-
  1. जागतिक स्तरावर, 2-17 वर्षे वयोगटातील 1 अब्ज बालके म्हणजेच दर दोनमध्ये एक बालक या प्रमाणात गेल्या वर्षात शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक हिंसाचार किंवा दुर्लक्ष अश्या प्रकारांना बळी पडले.
  2. 10 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांमध्ये ‘हिंसाचार’ हे मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे, ज्यामध्ये दर 100000 बालकांपैकी 7 असा या वयोगटातील वैश्विक मृत्युदर आहे.
  3. त्यांच्या जीवनात, 5 पैकी 1 शारीरिक शोषणास, तर 3 पैकी 1 भावनात्मक शोषणास बळी पडतात. जवळपास 18% मुली आणि 8% मुले लैंगिक अत्याचाराला बळी पडतात.
  4. लहानपणी हिंसाचार अनुभवत असल्यास मुलं, त्यांचे कुटुंबिय आणि समुदाय यांच्या आरोग्यवर आणि संपूर्ण जीवनात त्याचा परिणाम दिसून येतो.
  5. पुरावे असे दर्शवतात की हिंसाचाराचा परिणाम हा मृत्यू आणि जखम याही पलीकडे दिसून येतात. कारण जी बालके हिंसेचे बळी पडले, त्यांच्यात धुम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थांचा गैरवापर होतो आणि उच्च-जोखीम असलेल्या लैंगिक वर्तनास बळी पडतात.
  6. याशिवाय ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात आणि आयुष्यात अनेक आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. अश्या आजारांमध्ये चिंता, नैराश्य, हृदयासंबंधित रोग, कर्करोग आणि एड्स यांचा समावेश होतो.

WHO चे या संबधित कार्य

 1. जागतिक आरोग्य संघटना (WHO) अश्या प्रकारांना रोखण्यासाठी जागतिक योजना तयार करीत आहे आणि त्याच्या 13 व्या ‘जनरल प्रोग्राम ऑफ वर्क 2019-2023’ मध्ये अंतर्भूत करणार आहे.
 2. पुराव्यावर आधारित उपाययोजनांमध्ये WHO च्या नेतृत्वात चालू असलेल्या ‘INSPIRE’ पुढाकाराच्या सात धोरणांचा समावेश असणार आहे.
 3. ते म्हणजे -
  1. अंमलबजावणी आणि कायद्याची अंमलबजावणी
  2. नियम आणि नैतिक मूल्ये बदलने
  3. सुरक्षित वातावरण
  4. पालक आणि काळजी घेणार्‍यांची मदत
  5. उत्पन्न आणि आर्थिक सशक्तिकरण
  6. प्रतिसादात्मक सेवांची तरतुद
  7. शिक्षण आणि जीवन कौशल्य
 4. WHO याबाबत चाललेल्या जागतिक प्रयत्नांमध्ये सहभागी होणार असून बालकांवर होणार्‍या सर्व प्रकारच्या हिंसाचाराला दूर करण्यासाठी जागतिक प्रतिबद्धतांना प्रोत्साहन देईल.


Russia denies UN resolution on pressure from Iran on yemen issue

 1. रशियाने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) चा ठराव नामंजूर केला, जो येमेनमध्ये चाललेल्या संघर्षात क्षेपणास्त्र वापरण्यापासून रोखण्यासाठी इराणवर दबाव टाकण्यासाठी तयार करण्यात आला होता.
 2. येमेनच्या मुद्द्यावरून UNSC मध्ये दोन ठराव मांडले गेलेत. पहिला ठराव ब्रिटनने तर दुसरा रशियाने प्रस्तुत केला होता. मात्र, ब्रिटन आणि अमेरिका यांचे समर्थन असलेल्या ठरावाला रशियाने नामंजूरी दिली.
 3. रशियाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.  
 4. अमेरिका आणि फ्रान्स यांच्याशी सल्लामसलत करून ब्रिटनने तयार केलेल्या ठरावाच्या मसुद्यात इराणचा उल्लेख होता.
 5. हा ठराव UN च्या तज्ञांच्या समितीने तयार केलेल्या जानेवारीतल्या अहवालाच्या निष्कर्षांवर आधारित होता.
 6. रशियाच्या ठरावात इराणचा उल्लेख नव्हता. मात्र त्यात UN च्या अहवालाच्या आधारावर इराणकडून निर्मित क्षेपणास्त्र येमेनमध्ये आढळून आल्याची नोंद होती.
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) 
 1. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे.
 2. ही परिषद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार असते.
 3. या परिषदेला अनिवार्य निर्णयांना घोषित करण्याचा अधिकार देखील आहे. त्याला UNSC प्रस्ताव म्हणून ओळखले जाते.
 4. 1945 साली स्थापित UNSC मध्ये 15 सदस्य आहेत, ज्यात अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स स्थायी सदस्य आहेत. या स्थायी सदस्यांकडे ‘व्हीटो’चा अधिकार आहे.
 5. उर्वरित 10 अस्थायी सदस्यांची निवड दोन वर्षांसाठी केली जाते. या 10 अस्थायी सदस्यांमध्ये आफ्रिका समुहातून 3 सदस्य; जंबूद्वीपीय समूह, पश्चिम यूरोपीय समूह आणि लॅटिन अमेरिका व कॅरेबियन समुहातून प्रत्येकी 2 सदस्य; पूर्व यूरोपीय समुहातून 1 सदस्य निवडण्यात येतात.
 6. यामध्ये एक सदस्य हा आखाती देश असणे आवश्यक आहे.


UIDAI announces blue-colored "child aadhaar"

 1. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने 5 वर्षाखालील बालकांसाठी निळ्या रंगाचे 'बाल आधार' कार्ड जाहीर केले आहे.
 2. 5 वर्षाखालील बालकांचा आधार कार्ड तयार करण्यासाठी आई वा वडील यांच्यापैकी कोना एकाचा आधार क्रमांक आणि बालकाचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
 3. त्यांचे कार्ड बनविण्यासाठी बायोमेट्रिक माहितीची आवश्यकता नसणार. वयाचे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बालकाची माहिती अद्ययावत करावी लागणार आहे.
 4. भारताच्या प्रत्येक नागरिकाला एक बहुउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या एका महत्वाकांक्षी योजनेमधून ‘भारतीय विशिष्‍ट ओळख प्राधिकरण’ (Unique Identification Authority of India -UIDAI) ची 2009 साली स्थापना करण्यात आली.
 5. या संस्थेकडून ‘आधार’ नामक बनविण्यात आलेले ओळखपत्र दिले जाते.
 6. त्यामध्ये संबंधित व्यक्तीला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो, जो आधार क्रमांक म्हणून ओळखला जातो.
 7. आधार क्रमांक ही 12 अंकी एक विशिष्ट संख्या आहे, जी त्या व्यक्तीसाठी एक कायम ओळख असणार आहे.


Memorandum of Understanding with CSIR Indian Ocean Association Association (IORA)

 1. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ने केंद्रीय औषधी व सुगंधित वनस्पती संस्था (CSIR-CIMAP, लखनऊ) ला समन्वय केंद्र बनविण्यासाठी हिंद महासागर सागरीकडा संघटना (IORA) च्या प्रादेशिक विज्ञान व तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्र (RCSTT) सोबत सामंजस्य करार केला आहे.
 2. CSIR-CIMAP मध्ये IORA केंद्र महत्त्वपूर्ण औषधी वनस्पती आणि त्यांची मूल्यवर्धित उत्पादने, संबंधित विशेषज्ञ आणि IORA सदस्य देशांची माहिती संकलित करणार आहे. 
 3. तसेच व्यापार, वाणिज्य व वैज्ञानिक आदानप्रदानाला प्रोत्साहित करण्यासाठी बैठका आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
 4. हिंद महासागर सागरीकडा संघटना (Indian Ocean Rim Association –IORA):-
  1. हिंद महासागर सागरीकडा संघटना (Indian Ocean Rim Association –IORA) ची स्थापना मार्च 1997 मध्ये केली गेली.
  2. इंडोनेशिया हे IORA परिषद आयोजित करणारे प्रथम देश आहे.
  3. IORA मध्ये 21 सदस्य राज्ये आणि 7 संवाद भागीदार आहेत. IORA चे अध्यक्षपद सध्या इंडोनेशियाकडे आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR):-
 2. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे.
 3. याची स्थापना 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आली.
 4. या संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक तसेच कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती यासाठी 'राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट)' घेतली जाते.
 5. याच्या देशभरात 39 प्रयोगशाळा (ज्यात 5 क्षेत्रीय संशोधन प्रयोगशाळा) आणि 50 क्षेत्रीय केंद्रे आहेत.


Top