Four new schemes of central government to promote young scientists

 1. भारतात संशोधनाला वाव देण्यासाठी देशातील तरुण शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
 2. 'टीचर असोसिएटशीप फॉर रिसर्च एक्सेलंस (TARE)' योजना:-
  1. संशोधन करण्यासाठी IIT, IISc किंवा CSIR अश्या राष्ट्रीय संस्थांसारख्या आघाडीच्या शासन पुरस्कृत संस्थांबरोबर शिक्षकांना जोडणार आहे.
  2. अश्या शिक्षकांना पगाराव्यतिरिक्त प्रत्येकी पाच लाख रुपये वार्षिक आणि दरमहा 5 हजार रुपये खर्चासाठी मिळणार आहे.
 3. ‘ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरल फेलोशिप’ योजना:-
  1. 100 पीएचडी विद्वानांना त्यांच्या डॉक्टर पदवीच्या संशोधनादरम्यान 12 महिन्यापर्यंत परदेशात विद्यापीठ/प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी मदत दिली जाणार आहे.
  2. प्रत्येकाला दरमहा $2,000 शिष्यवृत्ती तसेच प्रवासासाठी व व्हिसा शुल्क भरण्यासाठी एकरकमी 60,000 रुपये आकस्मिक भत्ता देण्यात येईल.
 4. डिस्टिंग्वीश इंवेस्टिगेटर अवॉर्ड:-
  1. विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ / विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या प्रकल्पांच्या  प्रधान अन्वेषकांना जास्तीत जास्त 100 फेलोशिप दिली जाणार आहे.
  2. त्यांना तीन वर्षांसाठी दरमहा 15,000 रुपये दिले जाणार आणि प्रकल्पाच्या प्रस्तावित प्रस्तावावर आधारित पर्यायी संशोधन अनुदान देण्यात येईल.
 5. 'ऑग्युमेंटिंग रायटिंग स्किल्स फॉर आर्टिकुलेटिंग रीसर्च (AWSAR)' योजना:-
  1. विज्ञानाविषयक लिखाणाला प्रोत्साहन देण्यासाठी 20,000 हून अधिक पीएचडी विद्वानांना त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यासाठी मदत दिली जाणार आहे.


Announcing the central government's bank repatriation scheme

 1. भारत सरकारने ऑक्टोबर 2017 मध्ये घोषित सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे (PSB) पुनर्भाँडवलीकरण करण्यासंदर्भात योजनेचा संपूर्ण तपशील स्‍पष्‍ट केला आहे.
 2. योजनेमधील प्रमुख बाबी:-
  1. वर्ष 2017-18 च्या भांडवल गुंतवणूक योजनेमध्ये पुनर्भाँडवलीकरण बॉण्डच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये आणि अर्थसंकल्पीय मदतीच्या रूपात 8,139 कोटी रुपयांचा समावेश आहे.
  2. सुधारणा धोरण वर्धित प्रवेश आणि सेवा उत्कृष्टता (EASE) यावर लक्षित आहे. शासनाद्वारे भांडवलाच्या गुंतवणूक सुधारणा संबंधित PSB च्या प्रदर्शनारूप असणार आहे.
  3. PSB च्या पूर्णकालिन निदेशकांना अंमलबाजवणीसाठी उद्देश्‍य निहाय सुधारणा सोपवले जाणार आहे. या संबंधात त्यांच्या प्रदर्शनाचे मूल्‍यांकन बँकेच्या संचालक मंडळाद्वारे केले जाणार आहे.
  4. प्रवेश आणि सेवा उत्कृष्ठतेसंबंधी लोकांच्या विचारांचे आकलन करण्यासाठी EASE संबंधी एक सर्वेक्षण स्‍वतंत्र संस्थेद्वारे केले जाईल. सर्वेक्षणाचे परिणाम दरवर्षी सार्वजनिक केले जातील.
  5. यामध्ये प्रत्‍येक गावात 5 किलोमीटरच्या आत बँकिंग सेवा उपलब्‍ध करण्याविषयी प्रतिबद्धता इलेक्‍ट्रॉनिक व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत डेबिटच्या बाबतीत 10 दिवसांच्या आत रक्कम परत केले जाणार, बँकिंग आऊटलेट माहिती करून घेण्याकरिता एक मोबाइल अॅप आणि प्रत्‍येक अल्‍पसेवा असलेल्या जिल्ह्यात एक मोबाइल ATM उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.


'Clotho' Protein can help in the treatment of diabetes, cancer: a research

 1. अमेरिकेच्या येल विद्यापीठामधील संशोधकांच्या शोधानुसार, ‘क्लोथो’ नामक प्रथिने मधुमेह, कर्करोग यासारख्या असाध्य रोगांवर उपचार करण्यामध्ये मदत करू शकते, असे आढळून आले आहे.
 2. यासंबंधी शोधाभ्यास ‘नेचर’ नियतकालिकेत प्रकाशित केला गेला आहे.
 3. क्लोथो प्रथिने:-
  1. क्लोथो प्रथिने काही विशिष्ट उतींच्या (Tissues) पृष्ठभागावर आढळून येते.
  2. हे प्रथिने ग्रंथीपासून निघणार्‍या हॉर्मोनच्या एका शास्त्रीय कुटुंबाला जोडते, ज्यांना फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर्स (FGF) म्हणून संबोधले जाते.
  3. ते इतर अवयवांसोबत यकृत, जठर आणि मेंदूत चयापचयाच्या प्रक्रियेला नियंत्रित करते.
 4. शोधाचे महत्त्व:-
  1. FGF-21 हार्मोन इंसुलिनसंबंधी संवेदनशीलतेला आणि ग्लुकोजच्या चयापचयाला उत्तेजित करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  2. बीटा-क्लोथो आणि FGF-21 बाबतच्या या अभ्यासामुळे लठ्ठ रुग्णांमधील ‘प्रकार-2’ मधुमेहसारख्या स्थितीसाठी उपचार पद्धतीच्या विकासास मार्गदर्शन लाभू शकते.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. अभ्यासासंबंधी:-
  1. संशोधकांनी बीटा क्लोथोच्या कार्यप्रणालीला समजून घेण्याकरिता एक्स-रे क्रिस्टलोग्राफी तंत्राचा वापर केला आहे.
  2. अभ्यासातून असे निर्देशनास आले की, बीटा-क्लोथो FGF-21 यांना जोडणारा प्राथमिक रिसेप्टर असतो.
  3. FGF-21 एक असा महत्त्वाचा हॉर्मोन आहे, जो उपवास चालू असताना तयार होतो.
  4. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगादरम्यान असे आढळून आले की, जेवणाच्या प्रमाणात बदल न करता शरीरातल्या कॅलरी कमी करता येऊ शकतात.


Profit-making Office - The Indian approach

 1. अलीकडेच राष्ट्रपतींनी आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र घोषित करणारा आदेश अधिसूचित केला गेला असल्याचे कानी आले असेल.
 2. भारताच्या निवडणूक आयोगाकडून या 20 आमदारांची नावे राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली. त्यांनी दिल्ली शासनामधील मंत्र्यांचे संसदीय सचिव बनून 'नफा कामवायचे कार्यालय' सांभाळले असल्याचे निर्देशनास आणले गेले आणि दोषी ठरविण्यात आले.
 3. अधिसूचनेमधून राष्ट्रपतींनी विधी मंत्रालयाला सूचित केले गेले. आता पुढील सहा महिन्यांत 70 जागा असलेल्या विधानसभेत 20 रिकाम्या जागांसाठी छोट्या स्वरुपात निवडणुक घेतली जाणार.
 4. 'नफा कामवायचे कार्यालय' म्हणजे नेमके काय?
  1. जर एखादा आमदार किंवा खासदार शासकीय कार्यालयाचा कार्यभार सांभाळत असेल आणि त्यातून काही फायदे प्राप्त करीत असेल तर त्या कार्यालयाला "नफा कमवायचे कार्यालय" म्हणून संबोधले जाते. मात्र, संविधानात वा कायद्यात "नफा कमवायचे कार्यालय" ही संज्ञा समाविष्ट नाही.
  2. भारतीय संविधानाच्या कलम 102 च्या खंड (अ) मध्ये असे म्हटले आहे की, संसदेने किंवा राज्य विधिमंडळामार्फत पारित केलेल्या कायद्याद्वारे कार्यालयाच्या प्रमुखाला पात्र न ठरवण्यास घोषित केलेल्या कार्यालयाव्यतिरिक्त, केंद्र किंवा राज्य शासन अखत्यारीत नफा कमवायच्या दृष्टीने कार्यालय सांभाळत असल्यास त्या व्यक्तीला अपात्र ठरविले जाईल.

संज्ञेचे महत्त्व

 1. लोकप्रतिनिधींचे स्वातंत्र्य सुरक्षित करण्यासाठी आणि कार्यकारी अधिकार्‍यांकडून लाभ प्राप्त होत असेल अशा व्यक्तींचा संसदेमध्ये समावेश नसावा यासाठी ही तरतूद आहे.
 2. ही तरतूद देशाच्या लोकशाहीला अहितकारक ठरणार्‍या भ्रष्ट प्रवृत्तींना दूर ठेवण्यासाठी तयार केली आहे आणि शासनाच्या प्रभावापासून लोकप्रतिनिधींना दूर ठेवण्याकरिता आहे, जेणेकरून ते कोणत्याही भय किंवा आवाहनाशिवाय त्यांची जबाबदारी सोडू शकतात.
 3. भारतीय संविधान किंवा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम-1951 यांमध्ये "नफा कमवायचे कार्यालय" असे अभिव्यक्त केले गेलेले नाही.
 4. ही व्याख्या न्यायालयासाठी आहे, जेणेकरून ते या संकल्पनेचा अर्थ समजावून सांगू शकतात. वर्षानुवर्षे, विशिष्ट तथ्यात्मक परिस्थितीच्या संदर्भात न्यायालयाने हा घटक अंगिकारला आहे.


The famous cartoonist Chandi Lahiri passed away

 1. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चंडी लाहिरी यांचे निधन झाले. त्यांनी ५० वर्षे व्यंगचित्रकार म्हणून काम केले.
 2. साधेपणा व सोपेपणा ही त्यांच्या व्यंगचित्राची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या विनोदबुद्धीची धार तीक्ष्ण होती, पण त्यामुळे कधी कुणी दुखावले गेले नाही.
 3. त्यांचा जन्म १३ मार्च १९३१ रोजी नडिया जिल्ह्यात झाला. १९४२च्या राजकीय चळवळीत सहभागी होते.
 4. पत्रकारितेत त्यांची सुरुवात १९५२मध्ये दैनिक ‘लोकसेवक’ या बंगाली वृत्तपत्रात वार्ताहरम्हणून झाली. पण नंतर ते १९६१मध्ये व्यंगचित्रकलेकडे वळले.
 5. त्यानंतर ते ‘आनंदबझार पत्रिका’ समूहात काम करू लागले. त्यांची राजकीय व्यंगचित्रे ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत.
 6. भारताच्या राजकीय इतिहासाचे व स्वातंत्र्यलढय़ाचे सखोल ज्ञान त्यांना होते, ते त्यांच्या व्यंगचित्रातून जाणवत असे.
 7. कारकीर्दीच्या आरंभीच ट्राम अपघातात त्यांचा एक हात गेला होता तरी त्यावर मात करून ते जीवनात यशस्वी झाले.
 8. मिश्के, नेंगटी, बिदेशीदर चोखे बांगला, चंडीर चंडीपथ, बांगलार कार्टून इतिहास ही त्यांची बंगाली, तर चंडी लुक्स अराउंड व सिन्स फ्रीडम ही इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 9. कोलकाता दूरदर्शन केंद्रासाठी सचेतपटकार (ॲनिमेटर) म्हणूनही त्यांनी मोठे काम केले.
 10. तसेच रुद्रप्रसाद सेनगुप्ता यांच्या ऑबिराटो चेनामुख या मालिकेत त्यांनी रंगीत व्यंगचित्रांचे अ‍ॅनिमेशन केले होते.
 11. संवेदनशील मनाच्या चंडीदांनी बाल कर्करोग रुग्णालयासाठी मोफत व्यंगचित्रे काढून दिली होती.
 12. बंगाल व कोलकाता या दोन विषयांवर त्यांना व्यंगचित्र मालिका काढायची होती. त्यांनी ती तयारही करून दिली, पण ती पुस्तकरूपात येणे राहिले.

 


Former footballer George Via is the President of Liberia

 1. लायबेरियाचे माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ यांची लायबेरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
 2. २००२नंतर फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर जॉर्ज विआ हे राजकारणात सक्रिय झाले.
 3. ते लायबेरियाच्या संसदेत सिनेटरही आहेत.
 4. २६ डिसेंबर २०१७ रोजी लायबेरियात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती.
 5. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या जोसेफ बोआकाई यांचा पराभव करत जॉर्ज यांनी त्यांच्याहून ६० टक्के जास्त मते मिळवली.
 6. जॉर्ज विआ यांनी २३ जानेवारी रोजी लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
 7. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष एलेन जॉन्सन यांची जागा घेतली आहे.


Top