1. राज्य सरकारने शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा ०५ जानेवारी २०१७ ला मंजूर केला.अनेक दिवस रखडलेला व त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रावर परिणाम झालेला राज्य सरकारव्दारे प्रिमियम एफएसआयचे दर निश्चित केला.
 2. त्यामुळे आता महापालिका हद्दीमध्ये निवासी व औद्योगिक बांधकामांमध्ये मंजूर क्षेत्रापेक्षा वाढीव बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी महापालिकेकडून विशिष्ट दरामध्ये प्रिमियम एफएसआय बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) ५० टक्के दराने मिळेल.
 3. मॉल व तत्सम बांधकामांसाठी हा दर ६० टक्के असेल.पुणे महापालिकेने राज्य सरकारला शिफारस करताना निवासी व व्यावसायिक, अशा संमिश्र बांधकामासाठी रेडीरेकनरच्या  ५० टक्के,  औद्योगिक वापरासाठीच्या बांधकामाला ६० टक्के तर, व्या वसायिक स्वरू पाच्या बांधका मासाठी ७० टक्के दराची शिफारस केली होती.


 1. कॅनडाच्या कॅली मॅसीने १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये विश्वविक्रम नोंदवत जागतिक जलतरण स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.

 2. २१ वर्षीय कॅलीने १०० मीटर अंतर ५८.१० सेकंदांत पार केले आणि २००९ मध्ये जेमा स्पॉफोर्थने नोंदवलेला ५८.१२ सेकंद हा विक्रम मोडला. अमेरिकेच्या कॅथलीन बेकरने रौप्यपदक मिळवले, तर ऑस्ट्रेलियाच्या एमिला सीबोह्मला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. एमिलाने २०१५  मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते.

 3. पुरुषांच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये इंग्लंडच्या अ‍ॅडम पिटीने उपांत्य फेरीत २५.९५ सेकंद वेळ नोंदवत स्वत:चा दोन वर्षांपूर्वी नोंदवलेला २६.१० सेकंद हा विश्वविक्रम मोडला.

 4. अ‍ॅडमला १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत ५६ सेकंद वेळ नोंदवण्याचे ध्येय साकार करता आले नाही. त्याने हे अंतर ५७.४७ सेकंदांत पूर्ण केले.

 5. अमेरिकेच्या कॅथी लिडेकीने २०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत विश्वविजेतेपद मिळवण्याच्या आशा कायम राखल्या. तिने अंतिम फेरीत स्थान मिळवताना हे अंतर एक मिनिट ५४. ६९ सेकंदांत पार केले. ऑस्ट्रेलियाच्या एमा मॅकऑनने तिच्यापाठोपाठ ही शर्यत पूर्ण केली.

 6. कॅथीने २०१३ मध्ये या स्पर्धेत चार सुवर्णपदकांची लयलूट केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये तिने पाच सुवर्णपदकांची कमाई केली. येथे तिने ४०० मीटर व १५०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतींबरोबरच चार बाय १०० मीटर फ्रीस्टाइल रिलेतही सोनेरी यश मिळवले आहे.  पुरुषांच्या ८०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीच्या विजेतेपदासाठी चीनचा अव्वल दर्जाचा खेळाडू सुन यांग हा दावेदार मानला जात आहे. त्याने येथे  याआधी २०० मीटर व ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत जिंकली आहे. 


 1. गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक सुरू होईल. त्यासाठी वैभववाडी-विजयदुर्ग रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे.
 2. विजयदुर्ग बंदर विकासासाठी दीड हजार कोटींचा खर्च येईल, तर दहा हजार थेट रोजगार संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.
 3. विजयदुर्गसह रामेश्वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे. 


Top