1. केंद्रीय MSME मंत्री कलराज मिश्रा यांच्या हस्ते 27 जून 2017 रोजी प्रथम MSME दिवसाच्या निमित्ताने भारतात ‘डिजिटल MSME योजना’ सुरू करण्यात आली आहे.
 2. याप्रसंगी २०१५ सालासाठी राष्ट्रीय MSME पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. विविध श्रेणींमध्ये एकूण ५६ पुरस्कार देण्यात आले आहेत. MSME यांना 50 आणि बँकांना 6 पुरस्कार देण्यात आले आहेत.
 3. डिजिटल MSME योजना : योजना क्लाउड कम्प्यूटिंग वर केंद्रीत आहे, जी MSME द्वारा स्थापित केलेल्या माहिती तंत्रज्ञान आधारित पायाभूत सुविधांच्या तुलनेत एक स्वस्त व फायदेशीर पर्यायाच्या रूपात सादर केली आहे.
 4. क्लाउड कम्प्यूटिंग तंत्रज्ञानामुळे MSME ला त्यांच्या कार्यठिकाणी कामासंबंधी नोंदी ठेवण्यासाठी कम्प्युटर आधारित यंत्रणा उभरावी लागत नाही. तर सहजरीत्या इंटरनेटच्या माध्यमातून कंपनीची माहिती साठवली जाऊ शकते. त्यामुळे शेवटी ‘कॅपेक्स’ हे ‘ओपेक्स  फज्ज’ मध्ये रूपांतरित होते.MSME दिवस
 5. २७ जून २०१७  रोजी जागतिक स्तरावर पहिला-वहिला सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (MSME) दिवस साजरा करण्यात आला. “मायक्रो-, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, द फर्स्ट रिस्पोंडर्स टु सोसायटल नीड्स” या संकल्पनेखाली हा दिवस साजरा करण्यात आला. यासंबंधी 'स्मॉल बिजनेस, बिग इम्पेक्ट' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
 6. यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रातर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत प्रत्येक स्तरावर MSME चे महत्त्वपूर्ण योगदान दर्शविण्याकरिता हा दिवस आहे.
 7. देशाच्या सर्वांगीण औद्योगिक विकासात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच लघु व्यवसायांना अल्पपतपुरवठा आणि कर्ज उपलब्धतेत सुधार करण्याची गरज ओळखता, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव A/RES/71/279 मंजूर करून २७ जून ही तारीख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले.


 1. मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर लोकांना त्या मार्गावर धावणार्या रेलची स्थिती तपासून चेतावणी देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने उपग्रहावर आधारित चिप प्रणाली विकसित केली आहे.
 2. प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि गुवाहाटी राजधानी ट्रेनमध्ये ही प्रणाली बसविण्यात आली आहे. सध्या चेतावणी देण्यासाठी चीप बसविलेल्या रेलच्या मार्गांवर 20 मानव रहित रेल्वे फाटकांवर हुटर लावण्यात येईल.
 3. देशातील यासंबंधी एकूणच परिस्थिती ही इंटिग्रेटेड सर्किट (IC) चिप रेलच्या इंजिनमध्ये बसविण्यात आली आहे. जवळपास 500 मीटर अंतरावर असलेल्या गाडीबद्दल चेतावणी देण्यासाठी या चिपच्या माध्यमातून हूटर वाजणार. रेलच्या स्थितीनुसार या हूटरचा आवाज वाढत जाणार आणि फाटक पार करताच आवाज बंद होणार. या प्रणालीचा वापर रेलच्या प्रत्यक्ष वेळेतील स्थितीबद्दल माहिती मिळवण्यासाठीही केला जाणार.
 4. देशात जवळपास 10000 मानवरहित रेल्वे फाटक आहेत. एकूण अपघातांमध्ये 40% अपघात रेलफटकाशी संबंधित आहेत. रेल्वे मंत्राकडून वर्ष 2014-15 मध्ये 1,148 आणि वर्ष 2015-16 मध्ये 1,253 मानवरहित क्रॉसिंग हटवण्यात आलेत. पुढील 2-3 वर्षांमध्ये अश्याप्रकारचे सर्व क्रॉसिंग हटविण्याची योजना आहे.


एअर इंडियात निर्गुंतवणुक करण्यासाठी मंजूरी

 1. आर्थिक विषयक मंत्रिमंडळाच्या समितीने एअर इंडिया आणि त्याच्या पाच उपकंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे.
 2. याशिवाय, वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडिया-विशिष्ट पर्यायी यंत्रणा तयार करण्यास मंजुरी दिली आहे.
 3. यामध्ये नागरी विमानन मंत्री आणि इतर मंत्री वेळोवेळी धोरणात्मक निर्गुंतवणूक प्रक्रियेचे मार्गदर्शन करतील.
 4. सरकारने वर्ष 2016-17 च्या अखेरीपर्यंत आधीच एयर इंडियामधून 24,745 कोटी रुपयांची भागीदारी काढून टाकलेली आहे.
 5. वर्ष 2021 पर्यंत 30,231 कोटी रुपयांची निर्गुंतवणूक करण्यात येणार आहे.


USIBC ने नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात भारतासाठी कार्यदल तयार केले

 1. भारत-अमेरिका व्यापार परिषद (USIBC) ने भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात संधी ओळखण्यासाठी एक कार्यदल तयार केले.
 2. दलाचे नेतृत्व प्रेट अँड व्हिटनी चे व्यवस्थापकीय संचालक (भारत) पलाश रॉय चौधरी आणि KPMG चे प्रमुख (अंतराळ व संरक्षण) अंबर दुबे यांच्याकडे दिले आहे
 3. ही समिती भारताच्या राष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक धोरण (NCAP) वर आधारीत कार्यान्वयनासाठी संधी शोधण्यास मदत करणार.


Top