UN's 'International Decade for Action: Water for Sustainable Development 2018-2028'

 1. शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 साध्य करण्यासाठी, प्रत्येकाला पाण्याची उपलब्धता, हे सर्वात महत्त्वपूर्ण उद्दिष्टांपैकी एक आहे, परंतु संपूर्ण जगातील वर्तमान सरकारांसाठी हे एक अत्यंत आव्हानात्मक कार्य आहे.
 2. पाण्याची समस्येवर अधिक लक्ष देण्याकरिता, संयुक्त राष्ट्रसंघाने UN चे ‘इंटरनॅशनल डिकेड फॉर अॅक्शन: वॉटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2018-2028’ कार्यक्रम अनावरीत केला आहे.
 3. हा जलस्त्रोतांच्या शाश्वत विकास आणि एकात्मिक व्यवस्थापनावर अधिक लक्ष देण्याची मागणी करतो.
 4. भारताला पाण्यासंबंधी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे हे 'जल दशक' कार्यक्रमाची मदत होणार आहे.

भारतामधील पाणी समस्या आणि शिफारशी

 1. 2050 सालापर्यंत भारतात पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता भासणार आहे. येणार्‍या दिवसांमध्ये सरासरी वार्षिक पाण्याच्या उपलब्धतेत कमतरता येणार आहे.
 2. शहरी भागात, जिथे दररोज 135 लिटर दरडोई (lpcd) एवढी मागणी आहे, जी की 40 lpcd एवढ्या ग्रामीण मागणीच्या तीन पट अधिक आहे, ती धोक्याच्या पातळीत मनाली जाते.
 3. भारतातील सुमारे 55% पाणीपुरवठा भूजलाचा स्रोताच्या माध्यमातून होतो, जी चिंतेचा एक कारण आहे.
 4. 60% भूजलच्या माध्यमातून होणारे सिंचन भारतातील एकूण पाण्याच्या वापराच्या 80% पेक्षा जास्त आहे.
 5. तर्कसंगत पाण्याची धोरणे नसल्यामुळे भूजल स्त्रोतांचा अविरत वापर केला जातो.
 6. भूजलाचा अविरत वापर आणि नियंत्रित पाण्यासंबंधी धोरण नसल्यामुळे भविष्यात भारतात पाणी सुरक्षेचा धोका संभवतो. वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारला आगामी काळात पाणी सुरक्षित करण्यावर अधिक दबाव आणला जाईल.
 7. शिफारशी:-
  1. वेगाने वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, भारताने आपल्या पृष्ठभागावरील पाणी आणि भूजल स्त्रोतांचे न्याय्य वापर करणे आवश्यक आहे.
  2. भूजलाचा वाढीचा उपयोग होण्यामागे हरित क्रांती होणे कदाचित हे कारण आहे. ठिबक सिंचन आणि इतर शाश्वत पद्धती वाढवण्याची गरज आहे.


Extremely thin organic layers can protect the Great Barrier Reef: Search

 1. ग्रेट बॅरियर रीफला खराब होण्यापासून आणि कोरल ब्लिचिंगपासून वाचविण्यासाठी एक अत्यंत पातळ असा जैविकदृष्ट्या नष्ट होणारा थर उपयोगात आणला जाऊ शकतो, असे ऑस्ट्रेलियाच्या इंस्टीट्यूट ऑफ मरीन बायोलॉजी येथील संशोधकांच्या अभ्यासामधून निष्कर्षास आले आहे.
 2. या थराची जाडी मानवी केसाच्या तुलनेत 50,000 पटीने पातळ आहे.
 3. प्रयोगाचे निष्कर्ष:-
  1. कोरल रीफ (पाण्याखाली जेमतेम बुडालेला सछिद्र प्रवाळ संरचना, जे सागरी जीवनास आवश्यक खाद्य पुरवतात) कॅल्शीयम कार्बोनेटपासून बनलेले असतात. हवामान बदलामुळे सागरी तापमान वाढल्यामुळे कोरल ब्लीचिंग होत आहे आणि ग्रेट बॅरियर रीफ खराब होत आहे.
  2. प्रयोगामधून असे दिसून आले आहे की, कॅल्शीयम कार्बोनेटपासून तयार करण्यात आलेला हा पातळ थर प्रवाळी प्रदेशाला रंगहीन होण्यापासून वाचवू शकतो.
  3. हा पातळ थर प्रवाळाच्या वरती एकदम लागून नसणार, तो थोड्या वरती पाण्यात तरंगत राहणार आणि सूर्याच्या सरळ संपर्कात येण्यापासून त्याला वाचविणार.
  4. प्रयोगादरम्यान सात वेगवेगळ्या प्रवाळी प्रजातींवर याचा वापर करण्यात आला. या थरामुळे प्रवाळावर पडणार्‍या सूर्याच्या प्रकाशात 30% पर्यंत कमी आणते आणि असे दिसून आले की, याच्या मदतीने बहुतेक प्रजातींमध्ये ब्लीचिंग प्रकियेत घट झाली.
 4. संबंधित चिंता:-
  1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या UNESCO ने ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरल समुद्रात स्थित ‘ग्रेट बॅरियर रीफ’ येथील प्रवाळी प्रदेश नष्ट होत असल्यासंबंधी "गंभीर चिंता" व्यक्त केली आहे. या प्रदेशाला वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत.
  2. या ठिकाणी मागील दोन दशकांत प्रवाळ प्रदेश नष्ट होण्याच्या तीन घटना आढळून आल्या आहेत आणि त्यामधून 91% क्षेत्रातील प्रवाळांचा मुळ रंग नष्ट झाला. माहितीनुसार, मुळ रंग नष्ट झाल्यामुळे अर्धा प्रवाळी प्रदेश आधीच नष्ट झालेला आहे.
ग्रेट बॅरियर रीफ
 1. 1400 मैल पसरलेळा ‘ग्रेट बॅरियर रीफ’ हा जगातील सर्वात मोठा रीफसमूह आणि जगातील सगळ्यात मोठे प्रवाळ बेट आहे. रीफ म्हणजे समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागाखाली तयार झालेली टेकडी होय.
 2. ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरल समुद्रात स्थित आहे आणि त्यामध्ये सुमारे 2900 रीफ व 900 बेटांचा समावेश होतो. याने समुद्राचा 344400 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे. हे UNESCO चे जागतिक वारसा ठिकाण व जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.
 3. येथे जगातील सर्वाधिक प्रवाळी प्रजाती पाहायला मिळतात. हा प्रदेश 1500 प्रकारच्या उष्णकटीबंधीय माशांच्या प्रजाती, 200 पक्ष्यांच्या प्रजाती आणि दुर्मिळ कासवांचे घर आहे.


 World stage Day: March 27

 1. 27 मार्च 2018 रोजी जगभरात जागतिक रंगभूमी दिन पाळला गेला आहे.
 2. UNESCO आणि नॅशनल थिएटर इंस्टीट्यूट (ITI) यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमाचे आयोजन करणात आले. कार्यक्रमाचे आयोजन पॅरिसमधील UNESCO सभागृहात करण्यात आले.
 3. यावर्षी 5 वेगवेगळ्या UNESCO खंडातील (आफ्रिका, अमेरिका, अरब प्रदेश, आशिया-प्रशांत आणि युरोप) प्रत्येकी एक याप्रमाणे पाच लेखकांनी आंतरराष्ट्रीय रंगभूमी संदेश दिला.
 4. आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिनाची स्थापना 1961 साली फ्रांसच्या पॅरिस स्थित नॅशनल थियेटर इंस्टीट्यूट (ITI) द्वारे केली गेली होती.
 5. 1962 सालापासून दरवर्षी 27 मार्चला जगभरात ITI च्या विविध केंद्रांवर तसेच संबंधित अनेक संस्था आणि गटांकडून रंगभूमी दिन साजरा केला जातो.
 6. 1962 साली पहिला आंतरराष्ट्रीय रंगभूमी संदेश फ्रांसच्या जीन काक्टे यांनी दिला होता.
 7. 2002 साली हा संदेश भारताचे प्रसिद्ध रंगकर्मी गिरीश कर्नाड यांनी दिला होता.
 8. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.
 9. या संघटनेची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. UNESCO मध्ये 195 सदस्य राज्ये/राष्ट्रे आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.


 Karnataka assembly elections to be held on May 12

 1. निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी 12 मे 2018 रोजी राज्यात मतदान होत असल्याची घोषणा केली आहे.
 2. कर्नाटकच्या वर्तमान 13 व्या विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ 3 जून 2018 रोजी संपुष्टात येत आहे.
 3. 225 सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक होणार आहे, त्यापैकी 1 जागावर अॅंग्लो-इंडियन समुदायापासून सदस्य नामीत केला जातो.
 4. नियोजनानुसार केवळ एकाच टप्प्यात निवडणूक पार पाडली जाणार. मतमोजणी 15 मे 2018 रोजी केली जाणार आहे. निवडणूक होईपर्यंत आता कर्नाटकमध्ये आचार संहिता लागू करण्यात आली आहे. उभे राहलेले उमेदवार 27 एप्रिल 2018 पर्यंत नाव परत घेऊ शकतात.
 5. भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो.
 6. ही निवडणुक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते.
 7. विधानसभा निवडणुका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत.
 8. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.


 BHEL to set up a 75 MW capacity solar plant in Gujarat

 1. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ला गुजरातमध्ये 75 मेगावॉट (MW) क्षमतेचा सौर फोटोव्होल्टेक (SPV) ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट मिळाले आहे.
 2. या संयंत्राला चरंकामध्ये गुजरात सोलर पार्कमध्ये स्थापित केले जाणार आहे.
 3. BHEL ला हे कंत्राट गुजरात इंडस्ट्रीज पॉवर कंपनी लिमिटेड (GIPCL) कडून प्राप्त झाले आहे.
 4. अवजड विद्युत उपकरणे तयार करणार्‍या BHEL या सार्वजनिक कंपनीचा हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.
 5. BHEL ला जवळपास एकूण 545 MW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे.


Top