MISSION SHAKTI

 1. रगिरी करणाऱ्या उपग्रहाचा नायनाट करणाऱ्या ‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची भारताने 27 मार्च रोजी यशस्वी चाचणी केली.

 2. मिशन शक्ती‘ या खास चाचणी मोहिमेद्वारे अवघ्या तीन मिनिटांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संशोधकांनी हे यश मिळवले, ही शुभवार्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास संदेशाद्वारे देशवासीयांना दिली.

 3. भारतीय अंतराळ संशोधकांनी पृथ्वीलगत असलेल्या ध्रुवीय कक्षेतील आपल्या एका नमुना उपग्रहाचा वेध घेत तो तीन मिनिटांत पाडून टाकला. या शोधाद्वारे आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केलेला नाही, तर केवळ स्वरक्षणार्थ हे पाऊल उचलले आहे, असे मोदी यांनी दूरदर्शनवरील संदेशात सांगितले.

 4. तसेच चीनने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 2005 आणि 2006 मध्येही केली होती. रशियाने मात्र आपल्या ‘ए-सॅट’ क्षेपणास्त्राची पहिली अधिकृत चाचणी 18 नोव्हेंबर 2015 मध्ये केली. मे 2016 मध्ये त्यांची दुसरी चाचणीही यशस्वी झाली. आता या श्रेणीत भारताने स्थान मिळवले आहे.


Savita Punia appointed as the captain of the Indian women's hockey team

 1. मलेशियाविरुद्ध 4 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व गोलरक्षक सविता पुनियाकडे सोपवण्यात आले आहे, अशी घोषणा ‘हॉकी इंडिया’ने केली आहे.
 2. नियमित कर्णधार राणी रामपाल दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्यामुळे प्रभारी नेतृत्वाची धुरा सविताकडे देण्यात आली असून, दीप ग्रेस एक्काकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
 3. 2020च्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेआधीच्या या दौऱ्याबाबत भारताचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन म्हणाले, ‘मलेशिया दौऱ्यावर आम्ही दोन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहोत.
 4. खेळाडूंच्या वैयक्तिक सातत्याकडे आम्ही गांभीर्याने पाहात आहोत.
 5. राणीच्या अनुपस्थितीत अनुभवी नमिता टोप्पो आणि ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कौर यांच्यावर भारताची भिस्त असेल.’


DIN VISHESH

 1. सन 1910 मध्ये हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

 2. रासबिहारी बोस यांनी सन 1942 मध्ये टोकियो येथे ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली.

 3. सन 1992 मध्ये उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

 4. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हन्स कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-10000 हा महासंगणक देशाला 1998 मध्ये अर्पण करण्यात आला.


Top