1. जगभरातील लष्कर दलांची 7 वी ‘लष्कर जागतिक खेळ’ स्पर्धा चीनच्या हुबेई प्रांतातील वूहान शहरात आयोजित केली जाणार आहे. 100 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशातून खेळाडू यात सहभाग घेतील.
 2. ‘बिंग बिंग’ हे स्पर्धेचे मॅस्कॉट आहे, जे चीनी खाण्यासाठी एक मोठा मासा (पाण्यातला पांडा म्हणून ओळखतात) याच्यावर आधारित आहे. "लष्करी वैभव, जागतिक शांतता (Military glory, world peace)" हे घोषवाक्य आहे.
 3. आंतरराष्ट्रीय लष्कर क्रीडा परिषद (CISM) कडून आयोजित लष्करी कर्मचार्‍यांसाठी ‘लष्कर जागतिक खेळ’ हा एक सर्वोच्च क्रीडा उत्सव आहे. यात 27 वर्गवारीत 329 स्पर्धा खेळल्या जातात.
 4. प्रथम ‘लष्कर जागतिक खेळ’ 1995 साली रोममध्ये खेळले गेले होते आणि दर चार वर्षांनी आयोजित केला जातो.


 1. 26 नोव्हेंबर 2017 रोजी बांग्‍लादेशमध्ये ‘आंतरराष्‍ट्रीय बहुपक्षीय सागरी शोध आणि बचाव सराव (IMMSAREX)’ ला सुरुवात झाली. हा सराव 28 नोव्हेंबर 2017 पर्यंत चालणार आहे.
 2. IMMSAREX-2017 हा इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम (IONS) च्या अखत्यारीत आयोजित करण्यात आलेला पहिला-वहिला क्रियान्वयन सराव आहे.
 3. 27 नोव्हेंबर 2017 रोजी कॉक्‍स बाजार येथे या सरावाचे उद्घाटन बांग्‍लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सरावात भारतीय नौदलाचे INS रणवीर, INS सहयाद्री, INS घडि़याल आणि INS सुकन्‍या ही जहाजे आणि P-8I हे सागरी गस्त विमान भाग घेणार आहे.
 4. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम (IONS) पुढाकाराची सुरुवात भारतीय नौदलाकडून 2008 साली करण्यात आली होती, जी आज 23 सदस्‍य देश आणि 9 पर्यवेक्षक देशांसह एक महत्त्वपूर्ण संघटना बनली आहे.
 5. हा हिंद महासागराची सीमा असलेल्या देशांचे एक प्रादेशिक मंच आहे, ज्यामध्ये सदस्य देशांचे नौसेनाप्रमुख आपापल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतात.
 6. बांग्‍लादेश IONS चा वर्तमान अध्‍यक्ष आहे. 2014 साली स्वीकारलेल्या ठरावानुसार IMMSAREX आयोजित केले गेले आहे.


 1. ‘आदित्‍य-1’ मोहीमेची संकल्‍पना दृष्य उत्‍सर्जन रेखा कोरोनाग्राफ (Visible Emission Line Coronagraph -VLEC) नामक मुख्य भार वाहून नेण्याकरिता 400 किलोग्रॅम श्रेणी उपग्रहाच्या रूपात केली गेली होती तसेच त्याला पृथ्वीपासून 800 किलोमीटर दूर खालच्या भू-कक्षेत पाठविण्याची योजना होती.
 2. मात्र आता ‘आदित्‍य-1’ मोहिमेत सुधारणा करून त्याला ‘आदित्‍य-L1 मोहीम’ हे नाव देण्यात आले आहे आणि आता याला L1 च्या आस-पास कोरोनाग्राफ कक्षेत पाठवले जाणार आहे, जे की पृथ्‍वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. ही मोहीम PSLV-XL प्रक्षेपकाद्वारा सन 2019-2020 च्या काळात अंतराळात पाठवली जाणार आहे.
 3. या मोहिमेमधून सूर्याचा बाह्य-थर (जो की डिस्‍क (फोटोस्फियर) च्या वरती हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे) तपासला जाणार आहे. तेथील तापमान दशलक्ष डिग्री केल्विन याहून अधिक आहे, जे की जवळपास 6000 केल्विनच्या सौर डिस्‍क तापमानापेक्षा अधिक आहे.
 4. सौर भौतिकशास्त्रामध्ये अजूनही या प्रश्नाचे उत्‍तर नाही मिळाले, की कश्याप्रकारे बाह्य चमकदार आवरणाचे तापमान इतके जास्त आहे. तसेच चुंबकीय क्षेत्र, भार असलेले कण अश्या अनेक बाबींचा यादरम्यान अभ्यास केला जाणार. या मोहिमेत दृष्य उत्‍सर्जन रेखा कोरोनाग्राफ (VELC) सह आणखी सहा भार आहेत.


 1. आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिने मानाचा मुकुट प्रदान केला. दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल पीटर्सला मिस जमाईका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाचं लौरा गोन्जालेज तगड आव्हान होते. या स्पर्धेत मिस जमाईकाने तिसरे स्थान मिळवले तर फर्स्ट रन अप मिस कोलंबिया झाली.
 2. मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करायला दुनियाभरातून 92 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. पण अंतिम फेरीत फक्त आफ्रिका, जमाईका आणि कोलंबियाने मजल मारली.
 3. 26 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार लास वेगास येथे सायंकाळी सात वाजता (भारतीय वेळेनुसार 27 नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता) ही स्पर्धा सुरू झाली होती.
 4. मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत श्रद्धा शशिधरने भारताचे नेतृत्व केले होते. पण टॉप 10 ची यादी श्रद्धाला गाठता न आल्याने भारताकडे मिस युनिव्हर्सचा किताब येण्याचे स्वप्न भंगले.


Top