Rotavax - The first vaccine made in the WHO certified India

 1. इतिहासात प्रथमच, पुर्णपणे भारतात विकसित केली गेलेली लस (रोटावॅक्स) जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ‘पूर्व-पात्र’ चाचणीत खरी उतरली आहे.
 2. गेल्यावर्षी हैदराबादमधील भारत बायोटेक लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या रोटावॅक्स लसला भारताच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले. 
 3. ‘पूर्व-पात्र’ होणे म्हणजे त्या लसीचा आफ्रिकेत आणि दक्षिण अमेरिका खंडातल्या बर्‍याच देशांना पुरवठा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विकली जाऊ शकते.
 4. रोटावॅक्स (Rotavac) लस रोटा विषाणूमुळे उद्भवणार्‍या बालपणातील अतिसारापासून संरक्षण देते.
 5. रोटा विषाणू हा जगभरात बालपणातील अतिसारामुळे अंदाजे 36% प्रकरणांना रुग्णालयात भरती करण्यास जबाबदार आहे आणि त्यामुळे कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अंदाजे 200,000 मृत्यूंला कारणीभूत आहे.
रोटावॅक्स (Rotavac) लस
 1. भारतात विकसित अनेक लसी ‘पूर्व-पात्र’ ठरल्या आहेत, परंतु हे पहिलीच वेळ आहे जी संपूर्णपणे देशातच विकसित केली गेली आहे.
 2. रोटावॅक्स लस 30 वर्षांपूर्वी अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे साठवून ठेवलेल्या विषाणूच्या नमुन्याच्या आधारावर तयार केली गेली आहे.
 3. भारतात या लसीच्या एका डोजला 55-60 रुपये या दराने खर्च येतो.
 4. वर्ष 2016 मध्ये सामील ही लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामधून आतापर्यंत देशभरात 9 राज्यांमध्ये सुमारे 90 लक्ष बालकांना दिली गेली आहे.
 5. पुणे स्थित सीरम इंटरनॅशनल कंपनीने देखील ‘रॅबीशील्ड’ नावाची रोटा विषाणू-रोधी लस विकसित केली आहे, ज्याला भारताच्या लसीकरण कार्यक्रमामध्ये समाविष्ट केले आहे.


Launch of the Pulse Polio Program in the country for the year 2018

 1. 27 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2018 साठी पल्स पोलिओ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
 2. देशभरात पाच वर्षाखालील बालकांना पोलियो-रोधी औषधी पाजण्याचा कार्यक्रम वर्षभरात राबवला जाणार आहे.
 3. देशभरातली 17 कोटी बालकांना या अभियानांतर्गत पोलियो-रोधी औषधी पाजली जाईल.
 4. 28 जानेवारी 2018 हा राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे.
 5. WHO वैश्विक पोलियो निर्मूलन प्रयत्नाच्या परिणाम स्‍वरूप 1995 साली भारताने पल्‍स पोलियो लसीकरण कार्यक्रम सुरू केला.
 6. या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलियोची लस दिली जाते.
 7. कार्यक्रमांतर्गत दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात तोंडावाटे पोलियो लस (OPV) दिली जाते.


Top