1. भारतीय संशोधकांनी त्रि-आयामी बायोप्रिंटेड कार्टिलेज विकसित केलेप्रथमच भारतीय संशोधकांनी अगदी शरीरातील दोन हाडांना जोडणार्या सांध्यात लवचिकता प्रदान करणारा भाग ‘कार्टिलेज (कूर्चा)’ प्रमाणेच  त्रि-आयामी बायोप्रिंटेड कार्टिलेज विकसित केले आहे.
  2. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्ली येथील टेक्सटाइल टेक्नोलॉजी विभागातील प्रा. सौरभ घोष यांच्या नेतृत्वात चमूने ‘बायोइंक’ चा वापर करून कार्टिलेजची त्रि-आयामी बायोप्रिंट विकसित केले आहे. IIT कानपूर येथील प्रा. बंडोपाध्याय यांच्या प्रयोगशाळेने अस्थिमज्जा स्टेम सेलपासून सेल लाइन विकसित करण्यास मदत केली.

बायोइंक म्हणजे काय ?
बायोइंकमध्ये अस्थि-मज्जा युक्त कार्टिलेज स्टेम सेल, सिल्क प्रोटीन आणि इतर काही घटकांचे घट्ट मिश्रण आहे. बायोइंकची रासायनिक संरचना पेशीच्या वाढीसाठी आणि दीर्घकालीन अस्तित्वासाठी समर्थन देते.

प्रयोगशाळेमध्ये विकसित कार्टिलेज सहा आठवड्यासाठी भौतिकस्वरुपात स्थिर राहिले. याविषयीचा अभ्यास जर्नल बायोप्रिंटिंग मध्ये प्रकाशित झाला आहे.
 

जगभरातील लाखो लोकांना हाडांची झीज होऊन संधिवात जडलेला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ गेल्या 30 वर्षांपासून प्रयोगशाळेत मानवी कार्टिलेज समान घटक विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या शोधामुळे शरीरात आढळणार्या विविध प्रकारच्या कार्टिलेजला पर्याय म्हणून हे मानवनिर्मित कार्टिलेज ऑपरेशन करून बसवता येणार आणि संधिवातापासून मुक्ति मिळणार.


  1. भारतीय तलवारबाज सी. ए. भवानी देवी हिने आइसलँडमधील रेक्जाविक येथे आयोजित टर्नोई सॅटलाइट फेन्सिंग चॅम्पियनशिप 2017 स्पर्धेच्या सॅब्रे प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
  2. यासोबतच भवानी देवी ही आंतरराष्ट्रीय फेन्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू आहे.


Top