Women are prohibited from entering the house: supreme court

 1. केरळमधील सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निकाल दिला.
 2. महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने सबरीमला मंदिरात महिलांनाही पूजा करण्याचा अधिकार दिला आहे.
 3. सबरीमला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेशबंदी होती. रजोनिवृत्ती झालेल्या महिलांना प्रवेश दिला जातो.
 4. याविरोधात इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात २००६ मध्ये याचिका दाखल केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते.
 5. अखेर शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने निर्णय दिला. घटनापीठात न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. चार विरुद्ध एक अशा फरकाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला.
 6. सुप्रीम कोर्टाने सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश देत स्पष्ट केले की आता प्रत्येक वयोगटातील महिला मंदिरात प्रवेश करु शकते.
 7. भारतीय संस्कृतीत महिलांना आदराचे स्थान आहे. त्यांची मंदिरात देवी म्हणून पूजा केली जाते आणि याच महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले जाते, असे नमूद करत मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
 8. धर्माच्या नावावर पुरुषी मानसिकतेने विचार करणे अयोग्य आहे. वयाच्या आधारे मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखणे हा धर्माचा भाग नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
 9. अयप्पा देवाचे भक्त हिंदू आहेत, त्यामुळे नवीन धार्मिक संप्रदाय निर्माण करण्याची आवश्यकता नाही.
 10. संविधानाच्या कलम २६ नुसार प्रवेशावर बंदी आणता येणार नाही. संविधानात पुजेत भेदभाव करता येणार नाही, असा उल्लेख असल्याचे कोर्टाने आदेशात नमूद केले.


Cancellation of penal code for adultery, historical result of Supreme Court

 1. व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
 2. पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. व्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली तर ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.
 3. अनिवासी भारतीय असलेले जोसेफ शाइन यांनी वकील सुविदुत सुंदरम यांच्या मार्फत कलम ४९७ च्या वैधतेला आव्हान दिले होते.
 4. यात गुन्हेगारी दंडसंहिता कलम १९८(२) चाही समावेश आहे. व्यभिचारात केवळ पुरूषांनाच दोषी ठरवून शिक्षा केली जाते, याबाबत स्त्रियांचाही विचार समान पातळीवर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
 5. जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या तीन सदस्यीय पीठाने ही लोकहिताची याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी दिली होती.
 6. १९५४, १९८५ व १९८८ या तीन निकालात कलम ४९७ वैध ठरवण्यात आले होते.
 7. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने गुरुवारी या याचिकेवर निर्णय दिला.
 8. न्या. ए एम खानविलकर, न्या. आर एफ नरिमन, न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा घटनापीठात समावेश होता.
 9. सुप्रीम कोर्टाने व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे आयपीसीतील कलम ४९७ रद्द करण्याचा निर्णय दिला. व्यभिचार हा घटस्फोटासाठी कारण म्हणून गृहित धरता येईल, मात्र तो गुन्हा ठरत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
 10. जगातील बहुतांशी देशांमध्ये व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम रद्द करण्यात आले. भारतीय दंड विधानातील हे कलमच असंवैधानिक असल्याचे कोर्टाने सांगितले.
 11. सध्या काय होते ?
  1. भादंवि कलम ४९७ नुसार एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या पुरूषाच्या पत्नीशी त्याच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही, तर त्याला व्यभिचाराचा गुन्हा म्हणतात.
  2. यात पाच वर्षे तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होते, पण यात जी स्त्री असे लैंगिक संबंध ठेवते तिला दोषी धरले जात नाही किंवा शिक्षाही दिली जात नाही.
  3. यात केवळ विवाहित महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे हा व्यभिचार ठरतो. विधवा, वेश्या किंवा अविवाहित महिलांना हे कलम लागू होत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिज लाल विरूद्ध राज्य सरकार (१९९६) खटल्यात स्पष्ट केले होते.


Lata Mangeshkar Award 2018 to be conferred on Vijay Patil, of music director duo Raam-Laxman

 1. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लतामंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण यांना प्रदान करण्यात येणार आहे.
 2. ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असा हा पुरस्कार लतादीदींच्या वाढदिवशी प्रदान करण्यात येतो. मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है सिनेमाला रामलक्ष्मण यांनी दिलेली गाणी हिट झाली होती.
 3. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा वाढदिवस त्यांचे चाहते एखाद्या सणासारखा साजरा करतात. खरं तर दीदींच्या संगीत विश्वातील प्रवासाबाबात जितकं बोलावं तितकं थोडंच आहे.
 4. दीदींच्या ९०व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांची बहीण मीना खडीकर यांनी लिहिलेल्या 'मोठी तिची सावली' या पुस्तकाचं मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात प्रकाशन होणारे.
 5. या पुस्तकाचं प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते होणार असल्याने या कार्यक्रमाला संपूर्ण मंगेशकर कुटुंब आवर्जून उपस्थित राहील.
 6. प्रकाशनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दीदींच्या गाण्यांचा एक खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आलाय. या पुस्तकाबद्दल दीदींना अद्याप कल्पना देण्यात आलेली नसल्याने हे पुस्तक त्यांच्यासाठी वाढदिवसाचं अनोखं सरप्राईज ठरेल.
 7. गानकोकीळा लता मंगेशकरांचा आवाज आणि स्वभाव हा जरी मृदू, मुलायम आणि शांत असला तरी त्यांचा स्वभाव मात्र अत्यंत बाणेदार आहे. या बाणेदारपणाचा अनुभव प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनाही आला होता.
 8. गायकांच्या हितासाठी भांडणाऱ्या लता दीदींनी याच कारणांवरून रफी साहेबांसोबत गायला चक्क नकारही दिला होता. याचं नेमकं कारण काय होतं याचा किस्सा लता दीदींनीच 'न्यूज18 लोकमत'ला काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितला होता.
 9. दीदी म्हणाल्या, त्या काळात पार्श्वगायकांना फार काही किंमत दिली जात नव्हती. गाण्यांची रॉयल्टीही मिळत नसे. मला हे पटलं नाही.
 10. गायकांनाही रॉयल्टी मिळाली पाहिजे अशी मी मागणी केली. त्यासाठी इतर गायकांनाही तयार केलं. याच कारणांमुळे आम्ही एचएमव्ही कंपनीसोबत गाणी करणं थांबवलं होतं.


India is ranked 158th in terms of 'human capital': The Lancet

 

 1. द लँसेट या नियतकालिकेमध्ये प्रकाशित सिएटल येथील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनकडून केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार, शिक्षण आणि आरोग्य सेवेत करण्यात येणार्या गुंतवणूकीच्या बाबतीत भारत जगात 158व्या क्रमांकावर आहे.
 2. भारत आरोग्य सेवा क्षेत्रात GDPच्या केवळ 1% खर्च करतो आणि शिक्षणावर केवळ 2.7% खर्च करतो.
 3. जगभरातल्या 195 देशांच्या सर्वेक्षणानुसार, शिक्षण आणि आरोग्य सेवा या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीच्या बाबतीत फिनलंड हा देश अव्वल ठरला आहे.
 4. 1990 साली भारत या बाबतीत 162 व्या क्रमांकावर होता.
 5. हा अहवाल अपेक्षित मानवी भांडवलाच्या सात वर्षांतून तयार केला गेला आहे, ज्यात सर्वोच्च उत्पादकता असलेल्या वयात एखाद्या व्यक्तीने किती वर्षे काम करावे, वयोमर्यादा, कार्यशील असतांनाचे आरोग्य, शाळेमधील आणि शिक्षणातला कालावधी अश्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. 

 


Famous writer Kavita Mahajan dies in Pune

 1. ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. 
 2. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या.
 3. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना गेल्या महिन्याभरापासून फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता. 
 4. कविता महाजन या महिनाभरापूर्वीच पुण्याला मुलीकडे गेल्या होत्या. मुलीला ताप येत असल्याने त्यांनी तिला चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
 5. मात्र, त्यांनाही ताप आणि फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागल्याने बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
 6. कविता महाजन यांचा जन्म नांदेडमध्ये झाला होता. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या मुली होत.
 7. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयामध्ये एम.ए. ही पदवी मिळविली होती.
 8. त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (२००८) मध्ये मिळाला होता.
 9. याचबरोबर कवयित्री बहिणाबाई पुरस्कार (२००८), साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला, २०११), मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
 10. कविता महाजन यांचा कुहू हा लेखसंग्रह लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता.
 11. तसेच म्रृगजळीचा  हा काव्यसंग्रह, ब्र आणि भिन्न या कादंबऱ्याही गाजल्या होत्या. उर्दू भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते.


Top