1. प्रख्यात व्यंग्यचित्रकार बळी लवंगारे ( वय 67 वर्षे ) यांचे कुर्ला-नेहरूनगर येथील राहत्या घरी  निधन झाले.
 2. काळाचौकी परिसरात वाढलेल्या लवंगारे यांनी मा सिक, दैनिकां पासून ते दिवाळी अंकांद्वारे खुसखुशीत आणि ठसकेबाज व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाचकांच्या मना वर अधि राज्य गाज विले. 
 3. महापालि केच्या शि क्षण विभागातही त्यांनी काम केले. सुरुवातीला चित्रकलेची आवड असलेल्या लवंगारे यांनी पुढे कलेला हास्याचा तडका देत, प्रसिद्धीला गवसणी घातली.
 4. हा स्य  व्यं गचित्रकारांनी सुरुवात केलेल्या लवंगारे यांच्या राजकी   णि सामा जिक विषयांवर भाष्य करणार्या व्यंगचित्रांनीही राजकीय पुढार्यांना चांगलेच चिमटे काढले. 


 1. धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे ख्यातनाम गायक उस्ताद सईदुद्दीन डागर (वय ७८) यांचे निधन  झाले.
 2. हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धृपद गायकीला समृद्ध करण्यात डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
 3. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफल रंगून जात असे, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
 4. देश-विदेशात त्यांच्या अनेक मैफली झाल्या आहेत. अनेक शिष्यांनाही त्यांनी घडवले आहे. धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे खास कौशल्य त्यांच्याकडे होते. 


 1. झेक प्रजासत्ताक येथे आयोजित 48 व्या ‘ग्रँड प्रिक्स उस्ती नाद लाबेम 2017’ स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धानी (boxers) भारताला पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 8 पदके मिळवून दिली आहेत.
 2. शिवा थापा (60 किलो), मनोज कुमार (69 किलो), अमित फांगल (52 किलो), गौरव बिधुरी (56 किलो) आणि सतीश कुमार (+91 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. काविंदर बिष्ट (52 किलो) आणि मनीष पनवार (81 किलो) यांनी रौप्य पदक तर सुमित सांगवान (91 किलो) याने कांस्यपदक पटकावले.
 3. स्पर्धेतील विजेते अमित, कविंदर, गौरव, शिव, मनोज, सुमीत आणि सतीश हे हॅम्बर्ग (जर्मनी) येथे होणार्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत खेळतील.
   
 4. ग्रँड प्रिक्स उस्ती नाद लाबेम ही स्पर्धा युरोपियन बॉक्सिंग कन्फेडरेशन द्वारा आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.


Top