1. माजी संसदीय सभासद आणि महसूल सचिव एन. के. सिंह यांना १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले आहे. त्यांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत असेल.
  2. आयोगाचे अन्य सभासद म्हणजे वित्त मंत्रालयाचे माजी सचिव शक्तिकांत दास, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिडी, NITI आयोगाचे सदस्य रमेश चंद आणि जॉर्जटाऊन विद्यापीठामधील प्रा. अनूप सिंह. आयोग आपला अहवाल ऑक्टोबर २०१९ पर्यंत सादर करतील.
  3. १५ वा वित्त आयोग १ एप्रिल २०२० पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी आपल्या शिफारसी प्रदान करणार.
  4. वित्त आयोगाची स्थापना हे संविधानाच्या कलम २८० (१) नुसार एक नियतकालिक कायदेशीर बंधन आहे.
  5. यापूर्वी १९ एप्रिल २०१५ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करण्यासाठी १४ वे वित्त आयोग स्थापन केले गेले. आयोगाने १५ डिसेंबर २०१४ पर्यंत आपला अहवाल सादर केला. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी आर्थिक वर्ष २०१९ पर्यंत वैध आहेत.


  1. ऑक्सफर्ड सिटी कौन्सिलने म्यानमारच्या नेत्या औंग सन सु की यांना दिलेला 'फ्रीडम ऑफ ऑक्सफर्ड' सन्मान काढून घेण्यात आला आहे.
  2. म्यानमारमधील हिंसाचारामुळे रोहिंग्या लोकांना त्यांचे घर सोडून शेजारी बांग्लादेशात पळावे लागलेल्याच्या पार्श्वभूमीवर सु की यांनी दिलेल्या अपुर्‍या प्रतिसादाला प्रतिक्रिया म्हणून ऑक्सफर्ड सिटी कौन्सिलने हा निर्णय घेतला.
  3. १९९७ साली 'लोकशाहीसाठी दीर्घ लढा' दिल्याबद्दल सु की यांना ऑक्सफर्ड सिटी कौन्सिलकडून 'फ्रीडम ऑफ ऑक्सफर्ड' हा सन्मान दिली गेला होता.


Top